Veto Power
Veto Power

नकाराधिकार (Veto Power)

आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकार यांचे चार प्रकार पडतात…
1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार
2) गुणात्मक नकाराधिकार
3) निलंबनात्मक नकाराधिकार
4) पॉकेट नकराधिकर

1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार-
याचा अर्थ संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे असा होतो.

2) गुणात्मक नकाराधिकार-
याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्राध्यक्षांना त्यासंबंधी द्यावीच लागेल.

3) निलंबनात्मक नकाराधिकार-
याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचार पाठवलेल्या विधेयकास संशोधने पुन्हा साध्या बहुमताने पारित केले तरी राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावी लागेल.

4) पॉकेट नकाराधिकार-
याचा अर्थ संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता ते तसेच पडून देणे.

वरील चार प्रकारांपैकी भारतीय राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार उपलब्ध नाही.
(अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांना मात्र प्राप्त आहे)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.