महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियान
महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियान

सुरुवात – 2008 – 2009

उद्देश – पाणी टंचाई व पाण्याच्या वाढत्या मागणीवर मात करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व स्वच्छता विषयक सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे

महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियानांतर्गत राज्याने पाणीपुरवठा व स्वच्छतेसंदर्भात तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय सुधारणा करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र व गुणवत्तापूर्ण सुविधा सेवा शुल्क तत्त्वावर उपलब्ध केली आहे. या योजनेच्या सुरुवातीपासून पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या 719, 14 कोटी रुपये इतक्या खर्चाच्या 198 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून 341,34 कोटी रुपये निधी वितरित केला आहे.

सन 2012 – 13 मध्ये जानेवारीअखेरपर्यंत 86.26 कोटी रुपये खर्च झाला आहे. तर 2013 – 14 महाराष्ट्र अंदाजपत्रकात (बजेट) सुजल निर्मल अभियानासाठी 145 कोटी 45 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.


MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.