१ ऑगस्ट चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams
१ ऑगस्ट चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 1 August 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

ऑगस्ट चालू घडामोडी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण पदक; वेटलिफ्टर अचिंताची गोल्डन कामगिरी!

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्ण पदक; वेटलिफ्टर अचिंताची गोल्डन कामगिरी!
 1. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. 20 वर्षीय अचिंता शेऊलीने 73 किलो वजनी वेटलिफ्टींग पुरूष गटात हे पदक जिंकले आहे.
 2. अचिंता शेऊलीने स्नॅचमध्ये विक्रमी 143 किलो वजन उचलले,तर क्लीन अँन्ड जर्कमध्ये तो 170 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरला.एकंदरीत त्याने एकुण 313 किलो वजन उचलून विक्रम केला आणि सुवर्णपदक जिंकले.

सुशिला देवीने 48 किलो वजनी गटात ज्युडो क्रिडाप्रकारात रौप्यपदक पटकावले आहे

सुशिला देवीने 48 किलो वजनी गटात ज्युडो क्रिडाप्रकारात रौप्यपदक पटकावले आहे
 1. विजय कुमारने 60 किलो वजनी गटात ज्युडो क्रिडाप्रकारात कांस्यपदक पटकावले
 2. हरजिंदर कौरने 71 किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये कांस्य पदक पटकावले
 3. भारताने 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत 9 पदके जिंकली

सेमीकंडक्टर पॉलिसी 2022-27 लाँच करणारे गुजरात हे पहिले भारतीय राज्य ठरले

सेमीकंडक्टर पॉलिसी 2022-27 लाँच करणारे गुजरात हे पहिले भारतीय राज्य ठरले
 1. पाच वर्षांच्या कालावधीत किमान 2,00,000 नवीन रोजगार संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने समर्पित ‘गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-27’ जाहीर केले आहे.
 2. गजरात सरकारने धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजनचा एक भाग असणारे “सेमीकॉन सिटी” विकसित करण्याचा निर्णयही घेतला आहे.
 3. भारत सरकारच्या डिझाईन-लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प नवीन धोरणांतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र राहणार नाहीत, असे राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सजॉय लाल थाओसेन यांच्याकडे ITBP च्या DG चा अतिरिक्त कार्यभार आहे

सजॉय लाल थाओसेन यांच्याकडे ITBP च्या DG चा अतिरिक्त कार्यभार आहे
 1. नवी दिल्लीतील सशस्त्र सीमा बलचे महासंचालक डॉ. सुजॉय लाल थाओसेन यांनी भारत-तिबेट सीमा पोलीस महासंचालक म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली .
 2. डॉ. थाओसेन हे 1988 च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
 3. डॉ. थाओसेन यांना आयपीएस संजय अरोरा यांच्याकडून प्रभार व पारंपारिक दंडुका स्वीकारण्यात आला.
 4. 1962 मध्ये स्थापन झालेली ITBP भारत-चीन सीमेवर गस्त घालते. याव्यतिरिक्त, छत्तीसगडमधील नक्षलविरोधी कारवायांसारख्या अनेक अंतर्गत सुरक्षा कार्यांसाठी याचा वापर केला जातो.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

Q.1 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक कोणी मिळवून दिले?
उत्तर:- जेरेमी लालरिनुंगाने

Q.2 खालीलपैकी कोणत्या संघटनेला केंद्र सरकारचा आत्मनिर्भर संघटन पुरस्कार जाहीर करण्यात आला?
उत्तर:-नवप्रभा महिला प्रभाग संघ उस्मानाबाद

Q.3 अलीकडेच नरेंद्र मोदी यांचा कोणता काव्यसंग्रह इंग्रजीतही उपलब्ध होणार आहे?
उत्तर:- ‘आंख या धन्या छे’

Q.4 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…. येथे देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे उद्घाटन केले?
उत्तर:-गांधीनगर

Q.5 यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा ही खालीलपैकी कितव्या क्रमांकाची आहे?
उत्तर:-22

Q.6 विद्या राणी देवीने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणते पदक जिंकले?
उत्तर:-रोप्य पदक

Q.7 पाकिस्तानात पहिल्या महिला हिंदू डीएसपी म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर:- मनीषा रुपेता

Q.8 सर्वाधिक एक दिवसीय क्रिकेट सामने खालीलपैकी कोणत्या देशाने खेळले आहे?
उत्तर:-भारत

Q.9 94 वे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘ द पावर ऑफ द डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक किती मानांकन मिळाली?
उत्तर:- 11

Q.10 केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF), 27 जुलै 2022 रोजी कितवा स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर:- 84 वा

Q.11 कोणत्या राज्य सरकारने पोलिसांसाठी ‘स्मार्ट ई-बीट’ प्रणाली सुरू केली?
उत्तर:- हरियाणा

ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.