mpsc today logo
mpsc today logo

भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतामध्ये १५ वेळा लोकसभा निवडणुका झाल्या त्यापैकी १० वेळा कॉंग्रेस ही राज्यकर्ता पक्ष होता.

१) पहिल्या लोकसभा निवडणुका, १९५१ – देशातील पहिल्या लोकसभा निवडणुका १९५१ मध्ये झाल्या. त्यामध्ये कॉंग्रेसने ४८९ पैकी ३६४ जागांवर विजय मिळविला. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. कॉंग्रेसला निवडणुकांमध्ये ४४.९% मते मिळाली

२) दुसऱ्या लोकसभा निवडणुका, १९५७ – देशातील दुसऱ्या लोकसभा निवडणुका १९५७ मध्ये झाल्या, त्यामध्ये नेहरूंनी दुसर्यांदा विजय मिळविला. कॉंग्रेसला ४९४ पैकी ३७१ जागांवर विजय मिळाला. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला ४७.७८% मते मिळाली.

 ३) तिसऱ्या लोकसभा निवडणुका, १९६२ – देशातील तिसऱ्या लोकसभा निवडणुका १९६२ मध्ये झाल्या. त्यामध्ये कॉंग्रेसला ४९४ पैकी ३६१ जागांवर विजय मिळविला. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला ४४.७२% मते मिळाली

४) चौथ्या लोकसभा निवडणुका, १९६७ – पंडित नेहरूचे निधन झाल्यावर देशामध्ये इंदिरा गांधी रूल सुरु झाला. देशातील चौथ्या लोकसभा निवडणुका १९६७ मध्ये झाल्या. ज्यामध्ये कॉंग्रेसने पुन्हा एकदा निवडणुका जिंकल्या आणि इंदिरा गांधी देशातील पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. १९६७ मध्ये काँग्रसने ५२० जागांपैकी २३८ जागांवर विजय मिळविला. त्या निवडणुकांमध्ये ४०.७८% मते मिळाली.

५) पाचव्या लोकसभा निवडणुका, १९७१ – भारतीय राजकारणातील पाचव्या लोकसभा निवडणुका १९७१ मध्ये झाल्या. या निवडणुकांमध्ये सलग पाचव्यांदा कॉंग्रेसने आपला विजय मिळविला. इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने ५१८ जागांपैकी ३५२ जागांवर विजय मिळविला. 


६) सहाव्या लोकसभा निवडणुका, १९७७ – देशातील सहाव्या लोकसभा निवडणुका १९७७ मध्ये झाल्या. सहाव्या लोकसभा निवडणुका भारतीय राजकारणामध्ये एक मोठा फेरबदल घेऊन आल्या. देशामध्ये पहिल्यांदा युती सरकार तयार झाले. त्यावेळी जनता पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) ह्या दोन पक्षांनी मिळून हे युती सरकार तयार केले होते. मोरारजी देसाई हे ह्या युती सरकारचे पंतप्रधान निवडले गेले. देशातील पहिल्या युती सरकारने ५४२ जागांपैकी ३४५ जागांवर विजय नोंदविला आणि त्यांना ५१.८९% मते मिळाली. 

७) सातव्या लोकसभा निवडणुका – सातव्या लोकसभा निवडणुकामध्ये पुन्हा एक वेळ इंदिरा गांधींची लहर आली आणि त्यांनी जबरदस्त वापसी करत ५४२ जागांपैकी ३७४ जागांवर विजय मिळविला ज्यामध्ये कॉंग्रेसला ४२.६९% मत मिळाली.

८) आठव्या लोकसभा निवडणुका, १९८० – लोकसभेच्या आठव्या निवडणुका १९८० मध्ये झाल्या. ज्यामध्ये कॉंग्रेसने ५१५ जागांपैकी ४१६ जागांवर विजय मिळविला आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. यादरम्यान कॉंग्रेसला ४९% मते मिळाली. 

९) नवव्या लोकसभा निवडणुका, १९८९ – नवव्या लोकसभेच्या निवडणुका १९८९ मध्ये पार पडल्या. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला हरवून नैशनल फ्रंट आणि जनता दल ह्यांनी मिळून युती सरकार स्थापन केले. आणि देशाला वीपी सिंह यांच्या हवाली केले. या निवडणुकांमध्ये युती सरकारला ५१.८९% मते मिळाली.

 १०) दहाव्या लोकसभा निवडुका, १९९१ – दहाव्या लोकसभा निवडणुका १९९१ मध्ये पार पडल्या. ह्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने पलटवार केला आणि पीव्ही नारासिम्हराव भारताचे नवीन पंतप्रधान झाले. यावेळी देशाने इंदिरा गांधींप्रमाणे राजीव गांधीना ही हरविले होते. कॉंग्रेसने या निवडणुकांमध्ये ५४५ पैकी २४४ जागांवर विजय मिळविला. कॉंग्रेसला या निवडणुकांमध्ये ३५% मत मिळाली.

११) अकराव्या लोकसभा निवडणुका, १९९६ – अकराव्या लोकसभेच्या निवडणुका १९९६ साली झाल्या.


१२) बाराव्या लोकसभा निवडणुका, १९९८ – लोकसभेच्या बाराव्या निवडणुका १९९८ मध्ये झाल्या आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार निवडून आलं. या निवडणुकांमध्ये भाजपला ५४५ जागांपैकी २५४ जागांवर विजय मिळाला. या निवडणुकांमध्ये एनडीएला ३७.२१% मते मिळाली.


१३) तेराव्या लोकसभा निवडणुका, १९९९ – लोकसभेच्या तेराव्या निवडणुका १९९९ मध्ये पार पडल्या, त्या निवडणुकांमध्ये भाजप आणि एनडीएचं सरकार निवडूक आलं. ह्यावेळी त्यांना ५४५ पैकी २७० जागांवर विजय मिळाला आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. सलग दुसऱ्या विजयामध्ये त्यांना ३७.०६% मते मिळाली.


१४) लोकसभेच्या चौदाव्या निवडणुका, २००४ – २००४ मध्ये लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये कॉंग्रेस आणि युपीएने सरकार बनविले. ह्या सरकारला ३५.४०% मते मिळाली. कॉंग्रेस आणि युपिए सरकारने मिळून ५४३ पैकी २१८ जागांवर विजय मिळविला. यादरम्यान मनमोहन सिंह हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान झाले.


१५) पंधराव्या लोकसभा निवडणुका, २००९ – लोकसभेच्या १५व्या निवडणुका २००९ साली झाल्या, पुन्हा एकवेळ कॉंग्रेस आणि मित्र पक्षांना ३७.२२% मते मिळाली आणि ५४३ जागांपैकी २६२ जागांवर विजय मिळाला. पुन्हा एकवेळ मनमोहन सिंह हे पंतप्रधान झाले. 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.