Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 16 August 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
१६ ऑगस्ट चालू घडामोडी
महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन वूमन – अश्विनी देवरे
- नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक अश्विनी देवरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आर्यनमॅन वूमन होण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे.
- कझाकस्तानमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धेतील 3.8 किलोमीटर स्विमिंग, सायकलिंग 180 किलोमीटर व 42.2 किलोमीटर धावणे अशी स्पर्धा असून एकूण 17 तासांमध्ये पूर्ण करावे लागते.
- मात्र हे तीन टप्पे अश्विनी देवरे यांनी 14 तास 24 मिनिटे 46 सेकंदात पूर्ण केले. यात दोन तास एक मिनिट 42 सेकंदात स्विमिंग, सात तास नऊ मिनिटे 30 सेकंदात सायकलिंग व चार तास 53 मिनिटे 32 सेकंदात रनिंग पूर्ण करत आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला.
- आर्यनमॅन किताब जिंकणारे महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले अधिकारी – कृष्णप्रकाश
ब्रिटन देशात ओमिक्रॉन लशीला मान्यता.
- कोविड 19 च्या ओमायक्रॉन प्रकारासाठीच्या लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातला पहिला देश ठरला आहे.
- बरिटनमधे येत्या हिवाळ्यापूर्वीच्या लशीकरण मोहिमेत या मॉडर्ना लशीचा अंतर्भाव केला जाईल.
- कोविडचे मूळ विषाणू आणि ओमायक्रॉन बी ए 1 प्रकार या दोन्ही वर ही लस परिणामकारक ठरत असल्याचं ब्रिटनच्या औषधी आणि आरोग्यविषयक उत्पादन नियामक प्राधिकरणाने म्हटलं आहे.
- 18 वर्षावरच्या सर्वांना ही लस देता येणार आहे, तथापि हिवाळ्यात ज्येष्ठांना या आजाराचा धोका जास्त असल्याने 50 वर्षावरच्या नागरिकांना ती प्राधान्याने देण्याची सरकारची योजना आहे.
फिफाकडून भारतीय फुटबॉल फेडरेशनचं सदस्यत्व निलंबित.
- बाहेरून अनावश्यक दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जागतिक फुटबॉल नियामक फिफानं अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला निलंबित केलं आहे.
- यामुऴ 17 वर्षाखालील युवतींच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद भारताला गमवावं लागलं आहे.
- 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार होती.
- फडरेशनच्या कार्यकारी समितीवर प्रशासक नेमण्याचा आदेश मागे घेतला जाईल आणि फेडरेशनचं प्रशासन दैनंदिन कारभार हाती घेईल, तेव्हा हे निलंबन मागे घेतलं जाईल, असं फिफानं म्हटलंय.
- फडरेशनचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल त्यांच्या कार्यकाळापेक्षा अधिक काळ पदावर राहिले होते.
- सर्वोच्च न्यायालयानं याला अवैध ठरवलं होतं आणि मे महिन्यात प्रशासकांची नियुक्ती केली होती.
- फडरेशनच्या कार्यकारी समितीची निवडणूक तत्काळ घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतरही फिफानं हे सदस्यत्व निलंबित केलं आहे.
निसर्ग निर्देशांक 2022
- नचर इंडेक्स 2022 नुकताच प्रसिद्ध झाला. निर्देशांकासाठी सर्वेक्षण रसायनशास्त्र, जीवन विज्ञान, भौतिक विज्ञान आणि पृथ्वी आणि पर्यावरण या विषयांवर प्रकाशित झालेल्या संशोधन लेखांवर आधारित होते.
- 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 दरम्यान सुरक्षित केलेल्या माहितीच्या आधारे क्रमवारी प्रदान करण्यात आली.
- िर्देशांकात, हैदराबाद विद्यापीठाने भारतीय विद्यापीठांमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे तर शैक्षणिक क्षेत्रातील सर्व संस्थांमध्ये 16 व्या स्थानावर आहे.
- हदराबाद 72 शोधनिबंधांसह प्रथम क्रमांकावर होते आणि शैक्षणिक क्षेत्रात 19.46 वाटा होता.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
१६ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी :
- १५ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- १४ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- १३ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- १२ ऑगस्ट२०२२ चालू घडामोडी
- ११ ऑगस्ट२०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |