१९ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१९ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |19 December 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१९ डिसेंबर चालू घडामोडी

कोणते तीन आयपीएल संघ आहेत जे भारतीय यष्टीरक्षकाच्या शोधात आहेत? जाणून घ्या

1. गुजरात टायटन्स

  • गुजरातने भरत आणि उर्विल रिलीज केले. संघाकडे मॅथ्यू वेड आणि साहा यांच्या रूपाने दोन यष्टिरक्षक आहेत. साहा ३९ वर्षांचा असून विल्यमसनचे पुनरागमन निश्चित आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन साहाला इच्छा नसतानाही मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठवेल. साहा हा मधल्या फळीतील चांगला फलंदाज मानला जात नाही आणि आयपीएलमध्ये सलामी करताना त्याचा विक्रम चांगला आहे.
  • मॅथ्यू वेड गेल्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळला नाही आणि मागील हंगामातही तो बेंचवर बसलेला दिसला. अशा स्थितीत गुजरातला मधल्या फळीसाठी स्फोटक यष्टिरक्षक फलंदाजीच्या शोधात असेल. यासाठी भरत आणि उर्विल हे सर्वोत्तम पर्याय असतील. संघ यापैकी एक पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न करेल, हे पाहणे गरजेचे असेल.

2. दिल्ली कॅपिटल्स

  • ऋषभ पंत पुढील मोसमात पुनरागमन करू शकतो. मात्र, त्याच्या यष्टिरक्षणाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळणार हे निश्चित मानले जात आहे. या संघाने गेल्या मोसमात फिलिप सॉल्ट किंवा अभिषेक पोरेल यापैकी एकाला खेळवले होते. यावर्षी फिलिप सॉल्टला सोडण्यात आले आहे. आता जबाबदारी पोरेल याच्यावर असेल.
  • पोरेल जखमी झाल्यास दिल्लीला पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत संघ लिलावात भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला विकत घेऊ शकतो. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करू शकणाऱ्या यष्टिरक्षकाकडे दिल्लीची नजर असेल. हार्विक, भरत आणि मोहित अहलावत सारखे खेळाडू सर्वोत्तम पर्याय असतील.

3. कोलकाता नाईट रायडर्स

  • कोलकाताला बऱ्याच दिवसांपासून यष्टिरक्षक फलंदाजाची समस्या भेडसावत आहे. २०२१ मध्ये दिनेश कार्तिक गेल्यापासून संघ या प्रकरणात संघर्ष करत आहे. गेल्या मोसमात त्याने रहमानउल्ला गुरबाज खेळला पण त्याचा फॉर्म अनियमित होता. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याकडे साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे गुरबाजला सलामीला पाठवावे लागले. अशा स्थितीत यावेळी संघाला भारतीय यष्टीरक्षकावर लक्ष केंद्रित करायला आवडेल. आंद्रे रसेल आणि सुनील नरेन खेळणार हे निश्चित. अशा स्थितीत गुरबाजही खेळत असल्याने फ्रँचायझींना परदेशी खेळाडूंसाठी जागा मिळण्यात अडचण येत होती. संघाला लिलावात युवा यष्टिरक्षक फलंदाज विकत घ्यायचा आहे.

दुसरीपर्यंतची शाळा सकाळी नऊनंतरच !शिक्षणमंत्र्यांची घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

  • येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केली होती.
  • बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते. राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.
  • पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू असेल, असेही ते म्हणाले. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

नवा पूर्व प्राथमिक विभाग

  • बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ‘आयुष्यमान भारत’चे नऊ लाख लाभार्थी; लाभार्थी राज्यांमध्ये महाराष्ट्र १२ व्या स्थानावर

  • आरोग्य सेवा नागरिकांच्या आवाक्यात यावी, तसेच त्यांच्यावर स्वस्तात उपचार व्हावेत यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून नावारुपाला आली असून या योजनेंतर्गत मागील चार वर्षांमध्ये तब्बल चार कोटी ९८ लाख २ हजार ९५९ नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त ९ लाख ४९ हजार ३२९ नागरिकांनीच लाभ घेतला असून, या योजनेचा लाभ घेण्यामध्ये महाराष्ट्र देशात १२ व्या स्थानकावर आहे.
  • देशातील मध्यम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १२ कोटी नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत मधुमेह, कर्करोग, हृदय रोग यासह विविध आजारांवर उपचार करण्यात येतात. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाखांपर्यंतच आरोग्य सुरक्षा पुरविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मागील चार वर्षांमध्ये लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०२०-२१ मध्ये देशामध्ये ७० लाख ६ हजार नागरिकांनी लाभ घेतला होता. तर २०२३-२४ मध्ये लाभार्थ्यांची संख्या १ कोटी १९ लाखावर पोहोचली.
  • देशातील लाभार्थ्यांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेत फारच धीम्या गतीने वाढत आहे. तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. महाराष्ट्रामध्ये मागील चार वर्षांमध्ये ९ लाख ४९ हजार ३२९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लाभार्थ्यांची संख्या फक्त १ लाख ३३ हजार ९२६ इतकी झाली आहे. २०२३-२४ मध्ये आसाम, छत्तीसगड, तेलंगणा व जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधील लाभार्थ्यांची संख्या अडीच लाख ते ९ लाखांपर्यंत होती. त्याच वेळी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या १ लाख ३३ हजार इतकी आहे. महाराष्ट्रातील २०८ सरकारी रुग्णालयांसह ८३६ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र असे असताना आजही अनेक नागरिक या योजनेपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे.

करोनाच्या JN1. व्हेरिएंटचा धोका वाढला? कर्नाटकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मास्कसक्ती!

  • गेल्या दोन वर्षांपासून देशात करोनानं माघार घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होत असून जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. मात्र, आता पुन्हा एकदा करोना डोकं वर काढतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरला केरळमध्ये सापडलेला करोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटचा रुग्ण. चीनमध्ये या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळले असून आता भारतातही केरळमध्ये या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून आता केरळमुळे कर्नाटकमधील आरोग्य यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आता कर्नाटकमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मास्कसक्ती करण्यात आली आहे.
  • केरळमध्ये जेएल १ व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यानंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सोमवारी कर्नाटकमधी उपाययोजनांची माहिती दिली. मंगळवारी यासंदर्भात कर्नाटक आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक होत असून त्यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मास्कसक्ती करण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच, या बैठकीत जेएन १ व्हेरिएंट नेमका किती धोकादायक आहे? त्याचा किती प्रभाव पडू शकतो? त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे? अशा मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

“लोकांनी घाबरण्याचं कारण नाही”

  • दरम्यान, नव्या व्हेरिएंटचा रुग्ण केरळमध्ये आढळला असून कर्नाटकमध्येही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली. मात्र, यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “आत्ता सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांसाठी मास्कसक्ती लागू करण्यात आलेली नाही. पण जर करोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तर आपल्याला अशा नियमावली लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मात्र, सध्या तशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये”, असं राव म्हणाले.

रुग्णालयांना बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर्सबाबत आदेश

  • “मी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये यासंदर्भात चर्चा केली आहे. यासंदर्भातील समितीने ज्येष्ठ नागरिक व हृदयाशि निगडित आजार असणाऱ्या व्यक्तींना मास्कसक्ती करण्याची शिफारस केली आहे”, अशी माहिती राव यांनी दिली. “कर्नाटक-केरळ सीमेवर या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. कुणालाही ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास त्याची करोना चाचणी केली जाईल. राज्यातील रुग्णालयांना चाचण्यांची संख्या वाढवण्याबरोबरच अतिरिक्त बेड, ऑक्सिजन सिलेंडर, पीपीई किट्स व इतर आवश्यक सामग्रीसंदर्भात तयारी करण्याचेही निर्देश दिले आहेत”, असंही राव म्हणाले.

काळजी घ्या! देशात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढले, एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू; ‘या’ राज्याला सर्वाधिक धोका

  • देशात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. करोनाचा सब व्हेरियंट JN.1 चा प्रसार वेगाने पसरू लागल्यानं करोनाचाही संसर्ग होऊ लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ३३५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, रविवारी पाच करोनाबाधितांचा मृत्यूही झाला आहे. गेल्यावर्षीपासून करोनाच्या रुग्णासंख्येत घट होत असताना आता पुन्हा एकदा करोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
  • पाच मृत्यूंपैकी चार मृत्यू एकट्या केरळमध्ये आहेत. तसंच, JN.1 हा सब व्हेरियंटसुद्धा केरळमध्येच आढळून आला आहे. त्यामुळे केरळ राज्यात सर्व उपाययोजना आखल्या जात आहेत. तर एक मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. दरम्यान, रविवारी ३३५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या १७०१ झाली आहे.
  • २०१९ पासून देशात करोनाचा संसर्ग पसरू लागला. तेव्हापासून देशात आतापर्यंत ४.५० कोटी लोकांना करोनाची लागण झाली. यापैकी, ४.४६ करोना बाधितांनी यशस्वी मात केली. तर, ५ लाख ३३ हजार ३१६ बाधितांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ देशात करोनापासून बरे होण्याचं प्रमाण ९८.८१ टक्के असून मृत्यूचं प्रमाण १.१९ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केरळमध्ये करोनाच्या नव्या ‘जेएन१’ विषाणूचा रुग्ण

  • करोनाचे विषाणू सातत्याने स्वत:मध्ये बदल घडवून आणत आहेत. त्यामुळे नवनव्या विषाणूंची उत्पत्ती होत आहे. करोनाचा नवा विषाणू असलेल्या ‘जेएन १’चे रुग्ण चीन आणि अमेरिकेमध्ये सापडत असून त्याचा पहिला रुग्ण भारतामधील केरळमध्ये सापडला आहे. भारतीय सार्स करोना जिनोमिक कर्न्‍सोटियम अंतर्गत सुरू असलेल्या करोना चाचणीदरम्यान ७९ वर्षीय महिलेला ‘जेएन १’ची बाधा झाल्याचे आढळले.
  • केरळमधील थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे ८ डिसेंबर रोजी एका वृद्ध महिलेला ‘जेएन १’ची बाधा झाल्याचे निदर्शनास आले.या महिलेची १८ नोव्हेंबर रोजी करोनाविषयक (आरटीपीसीआर) चाचणी करण्यात आली. तिला सौम्य प्रकारची लक्षणे आढळली होती. तसेच तिला थोडासा अशक्तपणाही जाणवत होता. मात्र आता तिची प्रकृती उत्तम असल्याची मााहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महाव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव बहल यांनी दिली.

‘काळजी करण्याचे कारण नाही’

  • ‘‘केरळमध्ये आढळलेल्या ‘कोविड-१९’च्या विषाणूचा ‘जेएन.१’ या उपप्रकार चिंताजनक नाही,’’ असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रविवारी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर तपासणी केलेल्या भारतीय प्रवाशांमध्ये हा उपप्रकार सापडला. मात्र, यामुळे घाबरून जाण्याचे, काळजीचे कारण नाही, असे जॉर्ज यांनी सांगितले.

मुद्दा गंभीर, वाद नको! संसदेतील घुसखोरीप्रकरणी पंतप्रधानांचे आवाहन

  • संसदेमध्ये झालेली घुसखोरी हा गंभीर मुद्दा असून त्यावरून वादावादी व भांडणे करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. लोकसभेमध्ये बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर आक्रमक विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी करत संसदेचे कामकाज रोखून धरले असताना पंतप्रधानांनी यावर प्रथमच जाहीर वक्तव्य केले आहे. 
  • एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, की या प्रकरणाची चौकशी सुरू असून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. या घटनेच्या मुळाशी जाऊन आणि यामागे असलेल्यांचे हेतू जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे प्रकरण ‘वेदनादायी आणि चिंताजनक’ असल्याचे ते म्हणाले. मनोरंजन डी आणि सागर शर्मा यांनी १३ डिसेंबरला लोकसभेमध्ये घुसखोरी करून पिवळा वायू सोडला होता. त्यांचे अन्य दोन साथीदार नीलमा देवी आणि अमोल शिंदे यांनी संसदेच्या आवारात पिवळा धूर सोडत घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री निवडीबाबत पंतप्रधान म्हणाले, की या नेत्यांना भरपूर अनुभव आहे आणि त्यांनी कठोर परिश्रम केले आहेत.

संसदेतील घुसखोरीच्या

  • घटनेवर उपाय शोधण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. अशा मुद्दय़ांवर भांडणे प्रत्येकाने टाळले पाहिजे. संसदेत घडलेल्या घटनेचे गांभीर्य कमी लेखू नये. लोकसभेचे अध्यक्ष संपूर्ण गांभीर्याने आवश्यक पावले उचलत आहेत.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१९ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.