२१ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२१ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |21 August 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२१ ऑगस्ट चालू घडामोडी

सप्टेंबर महिन्यात खगोल प्रेमींसाठी पर्वणी, C/2023 P1 Nishimura नावाचा धूमकेतू दुर्बिणी शिवाय बघता येणार

  • ग्रहांप्रमाणेच सूर्यमालेचाच सदस्य असलेले धूमकेतू हे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार प्रवास करणारे अनेक धूमकेतू असून ते ठराविक कालवधीनंतर सूर्याला वळसा घालत असतात. यापैकी काहीच धूमकेतू हे आत्तापर्यंत माहित झाले असून अनेक धूमकेतू अज्ञात आहेत, काही धूमकेतूंचे अस्तित्व तर सूर्याच्या जवळ जातांनाच लक्षात येते. यापैकीच एक धूमकेतू म्हणजे C/2023 P1 Nishimura. हा धूमकेतू सध्या पृथ्वीपासून दूर आहे. असं असलं तरी पृथ्वी ज्या कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते ती कक्षा ओलांडत त्याने सूर्याजवळून जाण्यासाठी प्रवास सुरु केला आहे.

_

  • या धूमकेतूचा शोध जपानमधील हौशी खगोल अभ्यासक हिदेओ निशिमुरा यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणजे ११ ऑगस्टला लावला. त्यांनी शोध लावला म्हणून त्यांच्या नावावरुन या धूमकेतूला C/2023 P1 Nishimura असे नाव आता देण्यात आले आहे. तेव्हा आता जगभरातून या नव्या धूमकेतू बद्दल निरिक्षणे सुरु झाली आहेत. याचा नेमका आकार अजुनही समजू शकलेला नाही. सूर्याच्या जवळ जात असल्याने उष्णतेमुळे या धूमकेतूच्या शेपटाचा पसारा आणखी वाढणार आहे.
  • सध्या खगोलीय दुर्बिणीतून हा धूमकेतू न्याहाळता येत आहे. येत्या ११ सप्टेंबरला तो पृथ्वीपासून सर्वात जवळच्या अंतरावर असेल आणि सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितीजावर हा धूमकेतू साध्या डोळ्यांनीही बघता येईल. त्यानंतर पुढील साधारण दोन दिवस त्याचे दर्शन होईल आणि मग दुर्बिणीतूनच त्याला बघता येईल.

तब्बल १२ वर्षानंतर विश्वचषकात ‘शुभंकर’चे पुनरागमन! भारताच्या ‘या’ दोन युवा खेळाडूंनी केले अनावरण

  • आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ (ICC World Cup 2023) यावेळी भारतीय भूमीवर आयोजित करण्यात येणार असून त्याची तयारी सुरू आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या महाकुंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गतविजेता संघ इंग्लंड आणि उपविजेता संघ न्यूझीलंड यांच्यातील लढतीने ५ ऑक्टोबरला स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान शुभंकराचे अनावरण करण्यात आले, ज्याचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.
  • १२ वर्षांनंतर शुभंकर पुन्हा एकदा विश्वचषकात परतला आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात स्टंपी (हत्ती) नावाने शुभंकर लाँच करण्यात आले होते. यानंतर २०१५ आणि २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात शुभंकर लाँच करण्यात आले नाहीत. मात्र, त्यानंतर आयसीसी यावर्षीच्या विश्वचषकात पुन्हा एकदा शुभंकर घेऊन आले आहे.
  • आयसीसीने १९ ऑगस्ट रोजी गुरुग्राम येथे एका कार्यक्रमादरम्यान दोन शुभंकरांचे अनावरण केले. एक महिला गोलंदाज आहे, तर दुसरा पुरुष फलंदाज आहे. मात्र, अद्याप त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. आयसीसीने चाहत्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मतदानाद्वारे त्यांची नावे निवडण्यास सांगितले आहे. महिला आणि पुरुष दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येकी ३ पर्याय दिले आहेत. २७ ऑगस्टनंतर त्यांची नावे निवड करून कळवणार आहेत.

वीज, आरोग्य, शिक्षण मोफत देण्याचे ‘आप’चे आश्वासन; ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी?

  • आम आदमी पक्ष विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सामील झालेला असला तरी काँग्रेसशी अद्याप त्यांचे मनोमिलन झालेले नाही. काँग्रेसने दिल्ली विधेयकाच्या विरोधात संसदेत भूमिका घेऊन ‘आप’ला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर त्यांनी दिल्ली लोकसभेच्या जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता आम आदमी पक्षही काँग्रेसशासित राज्यात ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहे.
  • छत्तीसगढमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. छत्तीसगढमध्ये ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा शनिवारी (दि. १९ ऑगस्ट) कार्यक्रम झाला. यावेळी बोलत असताना त्यांनी मोफत वीज, महिलांना प्रति महिना सन्मान निधी आणि बेरोजगारांना तीन हजार रुपयांचा महागाई भत्ता देणार असल्याचे आश्वासन दिले. छत्तीसगडमध्ये काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीप्रमाणेच अनेक सोयी-सुविधा मोफत देण्याच्या घोषणांचा फॉर्म्युला ‘आप’ने छत्तीसगढमध्ये राबविल्याचे दिसून येते. केजरीवाल यांनी यावेळी दहा आश्वासने दिली आहेत.
  • २४ तास अखंडीत पाणीपुरवठा, प्रत्येकाला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, नोव्हेंबर २०२३ पर्यंत थकीत असलेले वीज बिल माफ करणे, १८ वर्षांवरील प्रत्येक महिलेला प्रति महिना रुपये १००० सन्मान राशी (सन्मानवेतन) आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.. अशी अनेक लोकप्रिय आश्वासने केजरीवाल यांनी दिली.
  • दिल्लीप्रमाणेच छत्तीसगढमधील प्रत्येक नागरिकाला मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या जातील, प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक वॉर्डात मोहल्ला क्लिनीक, प्रत्येक बेरोजगाराला रोजगार आणि रोजगार मिळेपर्यंत प्रति महिना रुपये ३००० भत्ता, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा, भ्रष्टाचार मुक्त छत्तीसगढ बनविण्याचा प्रयत्न, छत्तीसगढमधून भारतीय सैन्य दलात असलेले जवान आणि राज्यातील पोलीस शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रुपये एक कोटींचा निधी ‘सन्मान राशी’ म्हणून दिला जाईल आणि कंत्राटी कामगारांना सामावून घेतले जाईल, असेही इतर आश्वासने केजरीवाल यांनी दिली.

रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा धक्का, लुना २५ यान चंद्रावर कोसळलं

  • रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळलं आहे. लुना-२५ हे यान २१ ऑगस्टला चंद्रावर अलगदपणे उतरण्याचा प्रयत्न करणार होतं. पण, त्यापूर्वीच हे यान कोसळलं आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कोसमॉसने ही माहिती दिली आहे.
  • जगात चंद्राबाबत दोन मोहिमा सुरु होत्या. त्यात इस्रोची चांद्रयान-३ आणि रशियाची लुना-२५ यांचा समावेश होता. इस्रोच्या यानाने १४ जुलैला चंद्राकडे कूच केलं होतं. यानंतर २६ दिवसांनी म्हणजेच १० ऑगस्टला रशियाच्या लुना-२५ यानाचं प्रक्षेपण झालं होतं. चांद्रयान-३ २३ ऑगस्टला, तर दोन दिवस आधी २१ ऑगस्टला लुना-२५ हे यान चंद्रावर उतरणार होते.
  • २० ऑगस्टला रात्री लुना-२५ हे यान कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. यासाठी यानावरील इंजिन सुरु करत दिशा बदल करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र, इंजिनाचे प्रज्वलन झालं नसल्याची माहिती रशियाने जाहीर केली होती. यातच आता लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती रशियन अंतराळ संस्थेने दिली आहे.

पाच दशकानंतर चांद्रयान मोहिम

  • दरम्यान, पन्नास वर्षानंतर रशिया चंद्रावर संशोधन करत आहे. रशियाने १० ऑगस्ट १९७६ साली लुना-२५ हे यान पाठवलं होतं. पाच दशकाच्या कालावधीनंतर प्रथमच लुना-२५ हे यान पाठवण्यात आलं आहे. पण, रशियाच्या चांद्रयान मोहिमेला अपयश आल्याचं दिसत आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२१ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.