२४ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२४ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |24 September 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२४ सप्टेंबर चालू घडामोडी

भारतीय महिला संघाने नेमबाजीत १० मीटर रायफलमध्ये पटकावले रौप्यपदक

  • आशियाई खेळांची रंगतदार सुरुवात झाली आहे. २४ सप्टेंबर हा दिवस भारतासाठी संस्मरणीय ठरत आहे. एकीकडे भारत आणि बांगलादेशच्या महिला संघांमध्ये क्रिकेटमध्ये चुरशीची स्पर्धा पाहिला मिळाली. दुसरीकडे भारताला रौप्यपदक मिळाले आहे. तसेच भारताने महिला नेमबाजीत पहिले रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी पुरुषांच्या हलक्या वजनाच्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक पटकावले. दुसरीकडे भारतानेही बांगलादेशवर मात करत अंतिम फेरी गाठली आहे. आतापर्यंत भारताने एकूण ५ पदके जिंकली आहेत.
  • भारतीय महिला संघात मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी १० मीटर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले. या काळात भारताची एकूण गुणसंख्या १८८६.० होती. यानंतर रोईंगमध्ये भारताने बाजी मारली, भारताच्या अरविंद सिंग आणि अर्जुन लाल यांनीही लाइट वेट डबल स्कलमध्ये रौप्यपदक जिंकले. त्यांनी ६:२८:२८ वेळेसह रौप्य पदक जिंकले. याशिवाय भारताकडे अजून पदके जिंकण्याची मोठी संधी आहे. भारताची बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीनवरही सर्वांच्या नजरा असतील. त्याच वेळी, पुरुष आणि महिला फुटबॉल संघ देखील गट सामन्यांमध्ये सहभागी होतील.

बाबूलाल यादव आणि लेख राम या जोडीला मिळाले कांस्यपदक –

  • भारताच्या बाबूलाल यादव आणि लेख राम यांना कॉक्सलेस जोडीमध्ये कांस्यपदक मिळाले, ज्यांनी ६:५०.४१ सेकंदाची वेळ नोंदवली. चीनने सुवर्णपदक तर उझबेकिस्तानने रौप्यपदक जिंकले. भारताने रोइंगमध्ये ३३ सदस्यीय संघ पाठवला आहे. आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण ५ पदके जिंकली आहेत. ३ रौप्य आणि २ कांस्यपदक आले आहेत. बांगलादेशचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. म्हणजे क्रिकेटमध्येही पदक निश्चित झाले आहे.

चीनचा दबदबा –

  • चीनने आशियाई क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. महिलांच्या नेमबाजीत चीनचा दबदबा दिसून आला. रमिता, मेहुली आणि चौकसे या त्रिकुटाने १८८६ गुण मिळवून रौप्यपदक जिंकले आणि चीनच्या (१८९६.६) मागे दुसरे स्थान गाठले. त्याच वेळी, लाइटवेट पुरुष दुहेरी स्कल्समध्ये चीन देखील पुढे राहिला, यजमानांनी अर्जुन आणि अरविंदपेक्षा ५:०२ सेकंद वेगवान राहून सुवर्णपदक जिंकले.

आजपासून आणखी नऊ ‘वंदे भारत एक्स्प्रेस’; ११ राज्यांतील धार्मिक-पर्यटन स्थळांसाठी सुविधा 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ११ राज्यांच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या नऊ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरातमधील स्थळांचा यात समावेश आहे.
  • यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे, की पंतप्रधान दूरदृश्यप्रणालीद्वारे या रेल्वेगाडय़ांना हिरवा झेंडा दाखवतील. या वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा, आणि जामनगर-अहमदाबाददरम्यान धावतील. देशभरातील रेल्वे दळणवळण व्यवस्थेत सुधारणा आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने या गाडय़ा एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यात म्हटले आहे.

वेळेची मोठी बचत

  • ’राउरकेला-भुवनेश्वर-पुरी आणि कासारगोड-तिरुवनंतपुरम मार्गावरील सध्याची सर्वात वेगवान रेल्वेगाडीच्या तुलनेत वंदे भारत एक्सप्रेस संबंधित गंतव्य स्थानांतील प्रवासाचा वेळ सुमारे तीन तासांनी कमी करेल.
  • ’हैदराबाद-बंगळुरू मार्गावर अडीच तासांपेक्षा जास्त, तर तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई मार्गावरील प्रवासात दोन तासांपेक्षा जास्त वेळेची बचत होईल.
  • ’रांची-हावडा, पाटणा-हावडा आणि जामनगर-अहमदाबाद दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान रेल्वेगाडीच्या तुलनेत सुमारे एक तासाने कमी होईल. ’उदयपूर-जयपूरदरम्यान या रेल्वेप्रवासात अर्धा तास कमी लागेल.

भारताविरुद्धच्या आरोपाला गुप्तचर माहितीचा आधार? कॅनडातील माध्यमांचे वृत्त

  • खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या घडविण्यात भारताचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाने केला असून त्याला गुप्तचरांनी दिलेली माहिती, संदेशवहन यंत्रणांकडून मिळालेले पुरावे आणि कॅनडाच्या फाईव्ह आय इंटेलिजन्स नेटवर्कमधील सहकारी देशाकडून मिळालेल्या माहितीचा आधार आहे, असे वृत्त कॅनडातील माध्यमांनी तेथील सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
  • खलिस्तानवादी निज्जर याच्या हत्येत भारताच्या गुप्तचरांचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर उभय देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. निज्जर याची हत्या ब्रिटिश कोलंबियात झाली १८ जून रोजी झाली होती. निज्जर याला भारताने २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. ट्रुडो यांनी केलेले आरोप भारताने फेटाळून लावले असून अशा बिनबुडाच्या आरोपांबद्दल संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातून कॅनडाने एका भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्यास सांगितल्यानंतर भारतानेही कॅनडाच्या एका अधिकाऱ्याला भारत सोडण्यास सांगितले.
  • कॅनडातील सीबीसी न्यूजने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार, निज्जर याच्या हत्येचा काही महिने तपास केल्यानंतर कॅनडा सरकारच्या हाती गुप्तचर तसेच गोपनीय तांत्रिक माहिती आली. यात कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांसह अन्य भारतीय अधिकाऱ्यांतील संभाषणाचा समावेश आहे, असा दावा कॅनडा सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे. ही माहिती केवळ कॅनडातून मिळालेली नाहीत, तर फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्समधील एका अनामिक सहकारी देशानेही कॅनडाला ही माहिती पुरविली आहे. फाईव्ह आय नेटवर्कमध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझिलंडचा समावेश आहे.
  • निज्जर याच्या हत्येच्या तपासासाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा भारतात जाऊन सहकार्याची विनंती केली होती, असेही या वृत्तात म्हटले आहे. ऑगस्टच्या मध्यात कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार जोडी थॉमस हे चार दिवस भारतात होते. त्यानंतर ते पुन्हा सप्टेंबरमध्ये भारतात गेले होते. याच दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तणावपूर्ण चर्चा झाली, असे येथील माध्यमांनी म्हटले आहे.
  • याबद्दल कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टीया फ्रीलॅन्ड यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, तपासकामावर परिणाम होऊ नये, तसेच फाईव्ह आय पार्टनरबाबतच्या कटिबद्धतेतून यावर काही बोलणे योग्य होणार नाही. परंतु कायद्याच्या प्रक्रियेत हे पुरावे उघड केले जातील, असे सीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.

हिटमॅनला मागे टाकत शुबमन गिल बनला २०२३ चा सिक्सर किंग, जाणून घ्या किती मारलेत षटकार?

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूर येथे खेळला जात आहे. होळकर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकली. ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतक झळकावले. तसेच शुबमन गिलने रोहित शर्माचा एक विक्रम मोडला.
  • भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या वनडेतही तो या संघाविरुद्ध फॉर्ममध्ये दिसला. त्याने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला. गिलने या सामन्यात ३७ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या होत्या. या षटकारांच्या जोरावर तो या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत आपला कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले.

शुबमन गिलने रोहित शर्माला टाकले मागे –

  • कांगारू संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, शुबमन गिलने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ३ षटकार मारले. या षटकारांच्या मदतीने तो यावर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या दोन षटकारांनंतर २०२३ मध्ये गिलच्या एकूण षटकारांची संख्या ४४ झाली, तर हिटमॅन रोहित शर्माने आतापर्यंत ४३ षटकार मारले आहेत.
  • २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
  • शुबमन गिल – ४५ (वृत्त लिहूपर्यंत)
  • रोहित शर्मा – ४३

भारताची धावसंख्या १५० धावा पार –

भारतीय संघाने एका विकेटच्या नुकसानावर २० षटकांनंतर 150 धावा केल्या आहेत. श्रेयस आणि शुबमनमध्ये शानदार शतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत आहेत आणि टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. भारताकडून श्रेयय अय्यरनेही ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२४ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.