३ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
३ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |3 August 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

३ ऑगस्ट चालू घडामोडी

भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

  • एकदिवसीय विश्वचषक २०२३ यावर्षी ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. आता या वेळापत्रकात थोडा बदल केल्याची बातमी समोर येत आहे. हा बदल पाकिस्तानच्या दोन सामन्यांमध्ये झाला असला, तरी याचे मुख्य कारण म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना होता.
  • मात्र १५ ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने, आता या मोठ्या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला प्रस्ताव दिला होता, ज्यावर त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धेचे अपडेटेड वेळापत्रक लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.

आता या तारखेला खेळला जाईल सामना –

  • पीटीआयच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपचा हाय व्होल्टेज सामना आता अहमदाबादमध्ये १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला होणार आहे. यासह पीसीबीने त्यांच्या दोन सामन्यांच्या तारखा बदलण्याच्या आयसीसी आणि बीसीसीआयच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. याशिवाय पाकिस्तान संघ आता १२ ऑक्टोबर ऐवजी १० ऑक्टोबरला हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळेल, जो भारताविरुद्धच्या सामन्याच्या तीन दिवस आधी येईल

आयसीसी अपडेटेड वेळापत्रक जारी करेल –

  • अहवालात असे सांगण्यात आले आहे की, आयसीसी लवकरच नवीन अपडेटेड वेळापत्रक जारी करेल, ज्यामध्ये आणखी काही सामन्यांचे वेळापत्रक देखील बदलले जाईल. सध्या आयसीसीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण रिपोर्टनुसार, भारत-पाकिस्तान आणि पाकिस्तान-श्रीलंका या दोन सामन्यांच्या तारखा बदलू शकतात. १२ तारखेला होणारा श्रीलंका-पाकिस्तान सामना १० तारखेला गेला, तर १० तारखेला होणाऱ्या इंग्लंड-बांगलादेश सामन्याचे वेळापत्रकही बदलू शकते. दुसरीकडे या सामन्याऐवजी १२ तारखेला कोणता सामना होणार हे चित्र आयसीसीच्या अंतिम वेळापत्रकातच स्पष्ट होणार आहे.

‘फिच’ने अमेरिकी अर्थव्यवस्थेबाबत नेमके काय केले? त्याचा भारतावर परिणाम काय?

  • ‘फिच’कडून अमेरिकेच्या पतमानांकनात घट करण्यात आली आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेचे पतमानांकन कमी करणे हे त्या अर्थव्यवस्थेविषयी दीर्घावधीसाठी अनिश्चिततेच्या दृष्टिकोनालाच दर्शविणारे असते. त्यामुळे हे चिंतेचे कारण आहे. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने तिचेच पतमानांकन कमी केल्याने जगासह भारतावर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

पतमानांकनाचे निकष काय असतात? ते कशावरून निश्चित करतात?

  • १) देशाची आर्थिक स्थिती – आयात-निर्यात, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय कर्ज, व्याजाच्या रकमेचे राष्ट्रीय सकल उत्पन्नाशी असणारे प्रमाण, देशाचे ऋणको कोण आहेत इ.
  • २) आर्थिक धोरणे – आर्थिक समानता, व्यवसाय करण्यातील सहजसुलभता, ऋण उपलब्धता, परकीय चलनाची उपलब्धता
  • ३) अर्थराजकीय वातावरण – देशातील चळवळी, कामगार क्षेत्रातील अस्वस्थता
  • ४) सरकारविरुद्ध असंतोष – राजकीय विरोध, विकास प्रकल्पांना मिळणारा पाठिंबा अथवा विरोध
  • ५) आर्थिक धोरणाची अंमलबजावणी – नोकरशाहीची उत्पादकता, भ्रष्टाचाराचा नायनाट, सरकारी खात्यातील समन्वय
  • ६) परराष्ट्र संबंध – शेजारी देशांशी शांततापूर्ण संबंध, सौहार्द
  • ७) मानवी विकासासाठी केले जाणारे प्रयत्न – शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात होणारी प्रगती

या सर्व घटकांचा मानांकन देताना विचार केला जातो.

‘आय फ्लू’ म्हणजे काय?

  • मागील काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) दररोज अंदाजे १०० रुग्ण सापडत आहेत, तर मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे २० ते २५ रुग्ण सापडत आहेत. त्याचप्रमाणे नागपूरमधील जिल्हा रुग्णालयातही दररोज जवळपास २५ रुग्ण येत आहेत. त्यामुळे जुलैत राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे.

आय फ्लू होण्याचे कारण ?

  • आय फ्लू म्हणजेच एक प्रकारे डोळे येणे. साधारणपणे दरवर्षी पावसाळ्यात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरते. पावसाळ्याव्यतिरिक्त वातावरणात होणारे बदल, वाढलेली आर्द्रता यामुळे ही साथ झपाट्याने पसरताना दिसते. डोळे येणे म्हणजेच आय फ्लूमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होतो. आर्द्रता आणि दूषित पाण्यामुळे या हंगामात बरेच जीवाणू आणि विषाणू वाढतात, त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्याचा सामान्यतः प्रौढांपेक्षा लहान मुलांवर अधिक परिणाम होतो.

प्रादुर्भाव झाल्यास काय करावे?

  • वेदना, लालसरपणा, अंधुक दृष्टी, डोळे सूजणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापणी चिकट होणे, डोळ्यातून चिकट द्रव्य स्रवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. कधीकधी अंधूक दिसते. हा आजार साधारणपणे पाच ते सात दिवसांत बरा होत असला तरी डोळे येतात त्यावेळी होणारा त्रास हा अत्यंत वेदनादायक असतो. त्यामुळे त्यावर स्वत:च्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. डोळ्यांच्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर चिन्हे आणि लक्षणांच्या आधारे त्याचे निदान केले जाते. ज्यामध्ये प्रतिजैविक, दाहक-विरोधी आणि स्नेहक आयड्रॉप्स आणि मलमांचा समावेश आहे.

आय फ्लू कसा पसरतो ?

  • आय फ्लूचा प्रतिबंध आणि प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी. संक्रमित व्यक्ती वापरत असलेल्या कोणत्याही वस्तू न वापरणे. हा आजार थेट संपर्कात आल्याने किंवा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या वस्तूंच्या संपर्कात आल्याने होते. साधारणपणे टॉवेल, उशाचे अभ्रे, नळ, दाराच्या कड्या इत्यादी वस्तूंच्या स्पर्शाने हा आजार पसरतो. संसर्गजन्य व्यक्ती जेव्हा संपर्कात येते तेव्हा संक्रमण होते. संक्रमित हात डोळ्यांना लागल्यास संसर्ग होतो.

पद्मश्री अरविंद गुप्ता यांची प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयात भेट

  • आपल्या देशातील तरुण मुलांपर्यंत आपल्या खऱ्या संस्कृतीचे वाङ्मय पोहोचावयास हवे त्यासाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा ही सर्व संस्कृती पुस्तकात किंवा कपाटात बंद होईल. त्यांचा वापर व्यवहारात केला गेला नाही, तर देश प्रगतीपथावर जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी कशी करेल ? असे मत पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.
  • येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयास श्री.गुप्ता यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. गुप्ता हे वैज्ञानिक खेळणी तयार करण्यामध्ये निष्णात असून त्यांनी वाई येथे आल्यानंतर प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयास भेट देऊन येथे सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेमध्ये ६०० वर्षांपूर्वीच्या संस्कृत भाषेतील हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह असून त्यांच्या आधारे ‘धर्मकोशा’ची निर्मिती करण्यात येथे ही गोष्ट स्पष्ट होताच श्री. गुप्ता म्हणाले, ‘धर्म माणसाच्या दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम करत असतो. आहार-विहार, धार्मिक स्थळांच्या रचना इतकेच नव्हे तर खूप वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती ही संस्कृतीशी निगडीत असते. त्यामुळे देवधर्म न मानणाऱ्या अथवा नास्तिक असणाऱ्या लोकांनी या गोष्टींचा विचार केलेला नाही तर ते एका विशिष्ट प्रकारच्या आनंदालाही मुकलेले आहेत. ‘
  • यानंतर गुप्ता म्हणाले,जुन्या प्रथा व परंपरा या सर्वच त्याज्य न मानता अथवा त्यांचा अनावश्यक आग्रह न धरता व नवीन प्रथा व परंपरा सर्वच्या सर्व न स्वीकारता योग्य व चांगले स्वीकारून कालानुरूप त्यामध्ये बदल केला जाणे आवश्यक आहे. अन्यथा जीवन निरस व जड होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. श्री. गुप्ता यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे सचिव अनिल जोशी यांनी सन्मान केला. यावेळी सहसचिव भालचंद्र मोने व संचालक नंदकुमार बागवडे हे उपस्थित होते.

निसर्गात कविता शोधणारा कवी काळाच्या पडद्याआड, ना. धों. महानोर यांचं निधन

  • ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचं स्थान प्राप्त केलं होतं. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत.

प्रसिद्ध कवितासंग्रह!

  • ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले.

चित्रपटांसाठी गीतलेखन

  • ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर अक्षरश: गारूड केलं. पण याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक (१९९), जैत रे जैत (१९७७), दोघी (१९९५), मुक्ता (१९९४), सर्जा (१९८७), उरूस (२००८), मालक (२०१५), अजिंठा (२०११) आणि यशवंतराव चव्हाण (२०१२) अशा काही चित्रपटांमधील गाण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी छेत्री, झिंगन, गुरप्रीत भारतीय संघात

  • तारांकित आघाडीपटू सुनील छेत्री, अनुभवी बचावपटू संदेश झिंगन आणि गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू यांचा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या २२ सदस्यीय पुरुष फुटबॉल संघात समावेश करण्यात आला आहे. हांगझो येथे २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी छेत्रीच्या नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या पसंतीचा संघ पाठविण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) प्रयत्नशील होता.
  • मात्र, त्यांनी या तिघांची नावे भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे (आयओए) पाठवली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागाबाबत साशंकता होती. परंतु, आता प्रमुख खेळाडूंच्या निवडीस आशियाई क्रीडा स्पर्धेचे संयोजक आणि आशियाई ऑलिम्पिक समितीकडून मान्यता मिळाली आहे. आशियाई क्रमवारीतील अव्वल आठ संघांनाच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठविण्याची क्रीडा मंत्रालयाची योजना होती. त्यामुळे भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा या स्पर्धेतील सहभागाबाबत अनिश्चितता होती. मात्र, ‘एआयएफएफ’च्या प्रयत्नांनंतर दोन्ही संघांना हांगझो येथील स्पर्धेसाठी पाठविण्याचा क्रीडा मंत्रालयाने निर्णय घेतला.

भारतीय संघ

  • ९ गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, गुरमीत सिंग, धीरज सिंह मोइरांगथेम.
  • ९ बचावपटू : संदेश झिंगन, अन्वर अली, नरेंद्र गहलोत, लालचुंगनुंगा, आकाश मिश्रा, रोशन सिंह, आशीष राय.
  • ९ मध्यरक्षक : जॅक्सन सिंह थौनाओजम, सुरेश सिंह वांगजाम, अपुया राल्टे, अमरजीत सिंग कियाम, राहुल केपी, नौरेम महेश सिंग.
  • ९ आक्रमकपटू : शिवा शक्ती नारायणन, रहीम अली, सुनील छेत्री, अनिकेत जाधव, विक्रम प्रताप सिंह, रोहित दानू.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.