५ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
५ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |5 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

५ एप्रिल चालू घडामोडी

Defamation Law आहे तरी काय? अब्रुनुकसानी नेमकी केव्हा होते?

  • गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी सूरत न्यायालयाने दिलेल्या एका निकालानंतर भारतीय राजकारणाला एक नवीन वळण मिळाल्याचे चित्र आहे. त्या निकालानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचल्याचे देशभर अनुभवास येत आहे.
  • कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक सभेदरम्यान, ‘सर्व चोरांना मोदी हे नाव का आहे?’ असे वक्तव्य केले होते.
  • या वादग्रस्त वक्तव्यानंतर तब्बल दोन वर्षांनी अब्रूनुकसानीच्या (डीफेमेशन) या कायद्यांतर्गत फौजदारी गुन्ह्याखाली त्यांना दोन वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. यानिमित्ताने या कायद्याच्या अनेक पैलूंचा घेतलेला हा आढावा.
  • भूतानच्या राजांशी पंतप्रधान मोदींची चर्चा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भूतानचे राजे जिग्मे घेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. उभय देशांतील आर्थिक सहकार्यासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी या चर्चेत भर दिला.
  • भूतानचे राजे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. चीनने भूतानवर आपला प्रभाव वाढवण्याची
  • चिन्हे दिसत असताना हा दौरा सुरू आहे.
  • भारत-चीन-भूतान या तीन देशांच्या डोकलाम सीमाभागासंदर्भत भूतानचे पंतप्रधान लोटे छिरिंग यांनी केलेले काही वक्तव्ये भूतान चीनला अनुकूल भूमिका घेत असल्याचे संकेत देत आहेत. मात्र, भूतानने सीमावादावर आपल्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
  • NCERT च्या १२वीच्या पुस्तकांमधून मुघलांचा इतिहास हद्दपार; भाजपानं केलं निर्णयाचं स्वागत
  • उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४ तासांच्या आता NCERT अर्थात नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रीसर्च अँड ट्रेनिंगनं आपल्या १२वीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास सांगणारे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं भाजपानंही स्वागत केलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
  • भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी यासंदर्भात इंडिया टुडेच्या वृत्ताचा एक व्हिडीओ ट्वीट करून त्यावर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. “एनसीईआरटीनं मुघलांचा खोटा इतिहास हटवण्याचा एक चांगला निर्णय घेतला आहे. चोर, पाकिटमार आणि क्षुल्लक सडकछाप लोकांना मुगल साम्राज्य आणि भारताचे बादशाह म्हटलं जायचं. अकबर, बाबर, शाहजहान, औरंगजेब यासारख्या लबाड लोकांची जाहा इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर कचरापेटीत आहे”, असं कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे
  • इतिहास हटवला, आता पुढे काय?
  • दरम्यान, बारावीच्या पुस्तकातून इतिहास हटवल्यानंतर आता पुढे काय? यासंदर्भात कपिल मिश्रा यांनी अजून एक ट्वीट मंगळवारी केलं आहे. यामध्ये “मुघलांचं असत्य इतिहासातून हटवण्यात येत आहे. आता पुढच्या टप्प्यात त्यांचं सत्य सांगितलं जाईल. मुघलांची लूट, व्याभिचार, अत्याचार, घाबरटपणा, मंदिर-मूर्तींचा द्वेष, आपल्याच मुलींशी त्यांचे असणारे नातेसंबंध, त्यांची नशेच्या आहारी गेलेली मुलं, कला-साहित्य-संगीताशी त्यांचं असलेलं शत्रुत्व अशा सर्व गोष्टींबाबतचं सत्य उघड होईल”, असं कपिल मिश्रांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
  • कोणता हिस्सा वगळला?
  • एनसीईआरटीकडून वगळण्यात आलेल्या भागामध्ये १६व्या आणि १७व्या शतकातील मुघल साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश आहे. ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्टरी पार्ट टू’ या पुस्तकातील हा भाग वगळण्यात आला आहे.
  • PhonePe ने लॉन्च केले Pincode App; शेजारच्या दुकानातूनही ऑनलाईन मागवता येणार ‘हे’ सामान
  • हल्ली पानटपरी, फेरीवाल्याची गाडीर, चहाचा स्टॉल, मोठ्या हॉटेलपासून स्टेशनरीच्या दुकानांपर्यंत सगळीकडे यूपीआय व्यवहार केले जात आहेत. कुठेही काहीही खरेदी करा? ग्राहक दुकानदाराकडे स्कॅनर कोड मागतात. विविध यूपीआय कंपन्यांनी दुकानदारांना कोडसाठी छानसे कार्ड बनवून दिलेली आहेत.
  • पेमेंटसाठी UPI Apps चा वापर सातत्याने वाढत आहे. भारतात बहुतेक लोकं पेमेंटसाठी पेटीएम, फोन पे, गुगल पे इत्यादी वापरतात. UPI द्वारे केलेल्या एकूण व्यवहारांपैकी सुमारे ५० टक्के व्यवहार फोन पेद्वारे केले जातात.
  • दरम्यान , PhonePe ने Pincode नावाचे नवीन App लॉन्च केले आहे. ओएनजीसीचा एक भाग आहे. ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स हा सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे जिथे वस्तू आणि सेवांची डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर देवाणघेवाण केली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणाहून कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मवरून सामान खरेदी किंवा विक्री करू शकता. परंतु वेबसाइट देखील ONDC चा एक भाग आहे.
  • सध्या कंपनीने हे नवीन App सध्या बंगळुरूमध्ये सुरु करण्यात आले आहे. या App च्या माध्यमातून लोक सुरुवातीला किराणा, औषधे आणि खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकतील. म्हणजेच आता तुम्हाला शेजारील दुकानातूनसुद्धा ऑनलाइन स्वरूपात सामान मंगवता येणार आहे. कंपनीने म्हटले आहे की ते हळूहळू इतर शहरांमध्येही हे अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असून या वर्षाच्या अखेरीस दररोज १ लाख ऑर्डर घेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
  • आयपीएलचा ‘हा’ नियम पुढील वर्षी डब्ल्यूपीएलमध्ये लागू होणार, पण संघांची संख्या वाढणार नाही
  • डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्राचे आयोजन शानदारा पार पडले होते. या यशाने आनंदित झालेले आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी मंगळवारी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रापासून होम आणि अवे फॉरमॅट लागू करण्याचा विचार करत आहोत. परंतु पुढील हंगामासाठी तीन वर्षे संघाची संख्या पाच राहील. डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम चाहत्यांना आणि खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय होता, परंतु ही स्पर्धा महिला टी-२० विश्वचषकानंतर लगेचच व्यस्त वेळापत्रकात आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे बीसीसीायने सर्व सामने दोन ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
  • डब्ल्यूपीएलचे आयोजन हे आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगून धुमल म्हणाले की, होम आणि अवे स्वरूप संघाला चाहता वर्ग तयार करण्यात खूप मदत करेल. बोर्ड पुढील वर्षीच त्याची अंमलबजावणी करू इच्छित आहे. धुमल यांनी पीटीआयला सांगितले, “चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण झाले. डब्ल्यूपीएलने चांगली सुरुवात केली आहे आणि आम्ही आतापर्यंत जे पाहिले आहे, त्यापेक्षा भविष्य खूप चांगले असेल. आम्ही पाच संघांसह सुरुवात केली. परंतु खेळाडूंचा पूल लक्षात घेता भविष्यात अतिरिक्त संघांना वाव आहे.”
  • धुमल म्हणाले, “आम्हाला संघांची संख्या वाढवण्याची आशा आहे, परंतु पुढील तीन हंगामात केवळ पाच संघ असतील. आम्ही निश्चितपणे आमच्या होम आणि अवे सामन्यांचे स्वरूप पाहत आहोत, भारताच्या आंतरराष्ट्रीय बांधिलकी लक्षात घेता, कोणाकडे वेळ आहे ते आम्ही पाहू आणि नंतर निर्णय घेऊ. चाहत्यांच्या व्यस्ततेच्या दृष्टीकोनातून हे खूप महत्वाचे आहे की आम्ही स्वतः आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर सामन्याचे स्वरूप स्वीकारवे.”

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.