५ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
५ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |5 September 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

५ सप्टेंबर चालू घडामोडी

भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला पुन्हा भिडणार; नेपाळच्या पराभवानं झालं शिक्कामोर्तब!

  • भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषकादरम्यान झालेला पहिला सामना पावसानं धुवून नेला. त्यामुळे दोन्ही देशांमधल्या क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. या सामन्यात भारताची फलंदाजी झाल्यानंतर झालेल्या पावसामुळे पूर्ण सामनाच रद्द करून दोन्ही संघांना एकेक गुण बहाल करण्यात आला. यावेळी पाकिस्तान तीन गुणांसह सुपर फोरमध्ये दाखल झालं. मात्र, सोमवारी दुबळ्यानेपाळ संघाला लीलया पराभूत करत भारतानं आपलं सुपर ओव्हरचं तिकीट कन्फर्म केलं. मात्र, याचबरोबर पाकिस्तानशी पुन्हा एकदा सामना होण्यावरही शिक्कामोर्तब केलं!

भारताचा नेपाळवर दणदणीत विजय

  • सोमवारी नेपाळविरोधात झालेल्या सामन्यामध्ये भारतानं तब्बल १० विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. भारतानं गोलंदाजी स्वीकारून नेपाळला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत नेपाळच्या फलंदाजांनी अत्यंत चिवट खेळ करत बलाढ्य भारतासमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं. भारताची दिग्गज सलामीवीरांची जोडी, अर्थात कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी डावाला सावध सुरुवात केली खरी. मात्र, पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. पावसामुळे तब्बल दीड तासाचा खेळ वाया गेल्यामुळे सामना थेट २३ षटकांचा झाला. विजयासाठीचं आव्हानही कमी होऊन १४५पर्यंत खाली आलं.
  • पावसाच्या ब्रेकनंतर मैदानावर उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीने नेपाळच्या एकाही गोलंदाजाला यश मिळू दिलं नाही. रोहित शर्मा (नाबाद ७४) व शुबमन गिल (नाबाद ६७) या दोघांनी १४७ धावांची अभेद्य सलामी देत भारताला लीलया विजय मिळवून दिला.

आशिया चषकाचं वेळापत्रक!

  • दरम्यान, आशिया चषकाच्या नियोजनानुसार लीग स्तरावरील ग्रुपमधील पहिल्या दोन संघांमध्ये सुपर फोर स्तरावर पुन्हा सामना होतो. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातच सुपर फोरमधला पहिला सामना होणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या १० सप्टेंबर रोजी हा सामना श्रीलंकेत होणार आहे. पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी सुपर फोरमधील सर्व सामने आता श्रीलंकेतील हंबनटोटामध्ये खेळवले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सातारा : डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर पुरस्कार

  • देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान आदी ठिकाणी ठोस कामगिरी करून उत्तुंग यश मिळणाऱ्या डॉ. डी. वाय पाटील यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • या पुरस्काराचे यंदाचे २७ वे वर्षे आहे. यापूर्वी राज्यातील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कोल्हापूर येथे जन्म झालेले ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे डॉ डी. वाय. पाटील नावाने सर्वांना परिचित आहेत. त्यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली.
  • कार्यकर्ता, महापौर, आमदार ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा थक्क करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे. त्यांच्या कार्याचा ठसा हा देशातच नव्हे तर परदेशातही उमटवलेला आहे. याची दखल घेत भारत सरकारने डॉ. डी. वाय. पाटील यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केलेले आहे. पुरस्कार वितरण विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद आबा पाटील हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
  • आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराचे वितरण गोकुळाष्टमीस बुधवार (दि. ६) रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मार्गदर्शक संचालक नितीन पाटील, व संचालक मंडळाने केले आहे.

अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास देहाचं काय केलं जातं? जाणून घ्या…

  • अमेरिकन अंतराळ संस्था नासाकडून विविध अंतराळ मोहिमा काढल्या जातात. २०२५ साली चंद्र आणि मंगळवार अंतळावीर पाठवण्याची नासाची योजना आहे. यापूर्वीही नासाने अनेकदा मानवाला अवकाशात पाठवलं आहे. पण, मानवाला अंतराळात पाठवणं धोकादायक काम आहे. गेल्या ६० वर्षात २० अंतराळवीरांचा अवकाशात मृत्यू झाला आहे.
  • १९८६ ते २००३ दरम्यान नासा स्पेस शटल दुर्घटनांमध्ये १४, १९६७ साली अपोलो लाँच पॅड फायरमध्ये ३ आणि १९७१ साली सोयुझ मोहिमेत ३ अशा २० अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अवकाशात, चंद्रावर किंवा मंगळवार अंतराळवीरांचं मृत्यू झाला, तर त्यांच्या देहाचं काय केलं जातं? याबद्दल नासाच्या ‘द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉप स्पेश हेल्थ’चे प्रोफेसर इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी माहिती दिली आहे.
  • इमॅन्युएल उर्क्विएटा म्हणाले, “जर एखाद्या अंतराळवीराचा अवकाशात किंवा पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मृत्यू झाला असेल, तर काही तासांतच त्याचा मृतदेह कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत पाठवता येतो.”
  • “जर हे चंद्रावर घडले तर बाकीचे अंतराळवीर काही दिवसांत मृतदेह घेऊन येऊ शकतात. यासाठी नासाने प्रोटोकॉल तयार केले आहेत. घाईत कोणताही मृतदेह पृथ्वीवर आणला जात नाही. बाकीचे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित येण्यास नासाचं प्राधान्य आहे,” असं इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी सांगितलं.
  • “समजा मंगळ मोहिमेवर ( ३०० दशलक्ष किलोमीटर ) जाताना एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला, तर गोष्ट वेगळी असेल. तेव्हा अंतराळवीरांचा मृतदेह वेगळ्या चेंबरमध्ये किंवा बॉडी बॅगमध्ये ठेवतात,” अशी माहिती इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी दिली. ‘एनडीटीव्ही वर्ल्ड’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

मागण्या मान्य झाल्याशिवाय धान्य करार नाही ; रशिया

  • पाश्चात्त्य देशांनी आपल्या मागण्या केल्याशिवाय नवीन धान्य करार केला जाणार नाही असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी जाहीर केले. सहा आफ्रिकी देशांना मोफत धान्यपुरवठा करण्याविषयीचा करार अंतिम टप्प्यात आहे असेही पुतिन यांनी सांगितले.
  • तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी सोमवारी रशियाच्या दौऱ्यात अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यावेळी एर्दोगन यांनी धान्य कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुतिन यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
  • गेल्या वर्षी तुर्कस्तान आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने हा करार करण्यात आला होता. त्यामुळे, युद्धादरम्यान युक्रेनला काळय़ा समुद्रातील तीन बंदरांमधून धान्य आणि इतर वस्तूंची निर्यात करणे शक्य झाले होते. जुलैमध्ये या कराराची मुदत संपल्यानंतर रशियाने त्यातून माघार घेतली. आपल्या धान्य आणि खतांच्या निर्यातीतील अडथळे दूर करण्याचे आश्वासन देणाऱ्या समांतर कराराचे पालन झाले नाही, अशी रशियाची तक्रार आहे.

पोटनिवडणुकांमध्ये ‘इंडिया’ची आज कसोटी

  • झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल या सहा राज्यांतील ७ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून विरोधकांच्या ‘इंडिया’ची ही पहिला परीक्षा असेल. झारखंड, त्रिपुरा व उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये ‘इंडिया’चा संयुक्त उमेदवार असून केरळ व पश्चिम बंगालमध्ये घटक पक्षांमध्ये लढत होत आहे.
  • झारखंडमधील डुमरी मतदारसंघामध्ये झारखंड मुक्ती मोच्र्याचा उमेदवार रिंगणात असून काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्रिपुरामध्ये बोक्सानगर व धनपूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘माकप’ने उमेदवार उभे केले असून काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये घोसी मतदारसंघामध्ये सप उमेदवाराविरोधात काँग्रेस तसेच अन्य प्रादेशिक पक्षांनी उमेदवार दिला नाही. या विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचे पारडे जड आहे.
  • केरळमध्ये पुथुपल्ली मतदारसंघामध्ये काँग्रेस व माकप एकमेकांविरोधात लढतील. ही जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. उत्तराखंडमध्ये बागेश्वर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असतानाही समाजवादी पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये धुपगुडी मतदारसंघामध्ये माकपला काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

५ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.