६ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
६ मे चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |6 May 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

६ मे चालू घडामोडी

कसा होणार राजे चार्ल्स (तृतीय) यांचा राज्याभिषेक?

 • ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक शनिवारी ६ मे रोजी होणार आहे. ब्रिटनमध्ये तब्बल ७० वर्षांनी हा सोहळा होत आहे. त्यामुळे ब्रिटिश जनतेला त्याचे जितके कौतुक आहे, तितकेच कुतूहल जगभरातही आहे. आपण थोडक्यात त्याची माहिती करून घेणार आहोत.

राज्याभिषेकाचे स्वरूप कसे असेल?

 • बकिंगहॅम राजप्रासादाने दिलेल्या माहितीनुसार, राजे चार्ल्स (तृतीय) यांची वर्तमानकाळातील भूमिका आणि भविष्याबद्दलचा दृष्टिकोन याचे प्रतिबिंब या सोहळ्यात उमटेल. त्याच वेळी अनेक शतकांचा इतिहास असलेल्या परंपरा आणि दिमाख यांचे प्रदर्शनही घडेल. ब्रिटनचे शाही चर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्टमिन्स्टर ॲबे येथे राज्याभिषेकाचा सोहळा पार पडेल. तब्बल ९०० वर्षांपासून याच चर्चमध्ये ब्रिटनच्या राजा आणि राणीचा राज्याभिषेक केला जातो. त्यापूर्वी राजे चार्ल्स (तृतीय) आणि राणी कॅमिला यांची बकिंगहॅम राजप्रासादापासून वेस्टमिन्स्टर ॲबेपर्यंत मिरवणूक निघेल. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता ही मिरवणूक सुरू होईल आणि दुपारी १ वाजता संपेल. कँटरबरीचे आर्चबिशप त्याचे आधिपत्य करतील. त्यानंतर लढाऊ विमानांनी नवीन राजाला मानवंदना दिली जाईल. या वेळी शाही कुटुंब बकिंगहॅम राजवाड्याच्या बाल्कनीत उपस्थित राहून ही मानवंदना स्वीकारतील.

सोहळ्यानंतर कोणते कार्यक्रम असतील?

 • विंडसर किल्ल्यामध्ये रविवारी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कॅटी पेरी, अँड्रे बोचेली, लियोनेल रिची आणि इतर कलाकारांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याशिवाय रविवारी सामुदायिक भोजन सोहळे आयोजित करण्यात आले आहेत, तर सोमवारी काही स्वयंसेवी कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजे चार्ल्स यांची सामाजिक कार्यांची आवड लक्षात घेऊन हा कार्यक्रम कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे.

कोणत्या परंपरांचे पालन केले जाईल?

 • राजघराण्याच्या परंपरांचा उचित मान राखला जाईल. तसेच काही ऐतिहासिक वस्तूंचाही पुनर्वापर केला जाईल. उदाहरणार्थ, संपूर्ण सोहळ्यादरम्यान राजे चार्ल्स (तृतीय) हे सहा निरनिराळे पोशाख परिधान करणार आहेत. त्यापैकी एक पोशाख राजे जॉर्ज (सहावे) यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरलेला पोशाख असेल. तसेच सोहळ्यासाठी काही आधीच्या खुर्च्यांचाही वापर केला जाईल. राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी वापरलेली आणि १९५३ मध्ये घडवलेली चेअर्स ऑफ इस्टेट राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी वापरली जाईल.

राज्याभिषेक कसा करतात?

 • राज्याभिषेकाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राजाला तेल लावून पवित्र केले जाते आणि त्यामुळे राजा हा प्रजेपेक्षा वेगळा असल्याचे मानले जाते. या वेळी राजे चार्ल्स (तृतीय) यांच्याभोवती पडदा असेल. तेल लावण्याचा विधी दूरचित्रवाणीवर किंवा ॲबेमध्ये उपस्थित असलेल्या बहुसंख्य लोकांना दिसणार नाही. केवळ काही वरिष्ठ पाद्रीच हा सोहळा पाहू शकतील. यानंतर राजाला राजवस्त्रे तसेच इतर काही पवित्र वस्तू प्रदान केल्या जातील. यानंतर राजाचा राज्याभिषेक जाहीर केला जाईल आणि गॉड सेव्ह द किंग या पारंपरिक गीताचा जयघोष केला जाईल. त्यानंतर राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक केला जाईल. मात्र त्यांच्याभोवती पडदा असणार नाही.

करोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेची मोठी घोषणा

 • तब्बल चार वर्ष संपूर्ण जगभरात ज्यामुळे मोठी उलथापालथ झाली. ज्यामुळे संपूर्ण जग त्रस्त झालं होतं, त्या करोनाला जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीच्या वर्गवारीतून वगळलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अद्यनोम गेब्रेयसस म्हणाले, “काल (गुरवार, ४ मे) आपत्कालीन समितीची १५ वी बैठक पार पडली. यावेळी, माझ्याकडे शिफारस करण्यात आली की, मी जगभरात कोव्हिड-१९ आता जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही याबाबतची घोषणा करावी. मी त्यांचा सल्ला स्वीकला असून याबाबतची घोषणा करत आहे.”
 • जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की, ३० जानेवारी २०२० रोजी कोव्हिड-१९ ला त्यांनी जागतिक आणीबाणी जाहीर केलं होतं. ही घोषणा केली तेव्हा चीनमध्ये केवळ १०० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तोवर करोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. परंतु तीन वर्षांनंतर ही संख्या ७० लाखांच्या पुढे गेली. आमच्या अंदाजानुसार या रोगामुळे आतापर्यंत जगभरात २ कोटींहून अधिक लोकांनी प्राण गमावले असावेत.
 • यावेळी डॉ. टेड्रोस यांनी हेदेखील स्पष्ट केलं की, करोना या रोगाला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेतून वगळलं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, करोना संपला आहे. गेल्या आठवड्यात करोनामुळे दर तीन मिनिटाला एका व्यक्तीचा जीव जात होता. आताही करोनाबाधित रुग्ण आढळत आहे. तसेच या रोगाचे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहिलं पाहिजे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारपदी भारतीय वंशाच्या महिलेची नियुक्ती, जो बायडेन यांच्या कोअर टीममध्ये समावेश!

 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारमध्ये आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची देशांतर्गत धोरणविषयक सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. त्या विद्यमान सल्लागार सुसान राइस यांची जागा घेतील. या निर्णयानंतर नीरा टंडन या व्हाईट हाऊसच्या सल्लागार समितीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अधिकारी असतील.
 • यासंदर्भात बोलताना जो बायडेन म्हणाले, मला हे जाहीर करताना आनंद होतो आहे की यापुढे नीरा टंडन या अमेरिकेच्या देशांतर्गत धोरणविषयक समिमीच्या सल्लागार असतील. नीरा टंडन यांचं ज्ञान, चिकाटी आणि राजकीय बाबींवर असलेल्या अभ्यासाचा देशाला फायदा होईल.
 • पुढे बोलताना त्यांनी विद्यमान सल्लागार सुसान राइस यांचे आभारही मानले. गेल्या दोन वर्षांत सुसान राइसने देशांतर्गत धोरणाचा अजेंडा तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या सेवेबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीग जिंकली

 • भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्राने ५ मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेकत डायमंड लीगवर आपले नाव कोरले.
 • टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. एक महिन्यापूर्वी, तो लुझने येथे डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. नीरजने गेल्या महिन्यात सांगितले होते की, या क्षणी त्याला शारीरिक आणि तांत्रिकदृष्ट्या बरे वाटत आहे, परंतु गेल्या वर्षी येथील अत्यंत खडतर स्पर्धा लक्षात घेता सीझन-ओपनिंग डायमंड लीगमध्ये सर्वोच्च पारितोषिक जिंकणे त्याच्यासाठी सोपे नव्हते.
 • नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग मीटमध्ये ८८.६७ मीटर फेक करून पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. भारतीय खेळाडूने पहिल्याच थ्रोमध्ये सर्वोत्तम आकडा गाठला. यासह नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने ८८.६७ मीटर फेक करून पहिले, झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजने ८८.६३ मीटर फेकसह दुसरे, तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८५.८८ मीटर फेकसह तिसरे स्थान पटकावले. गतविजेत्या नीरजने पहिल्या प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेक करताना ग्रेनाडाचा पीटर अँडरसन व झेक प्रजासत्ताकचा व्हॅल्देच याकुब या कट्टर स्पर्धकांना मागे टाकले.
 • दुसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजचा भाला ८६.०४ मीटर लांब जाऊ शकला, परंतु तो अव्वल स्थानावरच होता. तिसऱ्या प्रयत्नात गोल्डन बॉय नीरज चोप्राचा भाला आणखी कमी दूर गेला अन् त्याला ८५.४७ मीटर पर्यंतच भालाफेकता आला. दुसऱ्या प्रयत्नात याकुब ८८.६३ मीटर भालाफेकून नीरजच्या जवळ पोहोचला होता. मात्र, अजूनही भारताचा नीरज चोप्रा हा वर्ल्ड लीडसह आघाडीवरच होता.

नीरज हा सध्याचा डायमंड लीग चॅम्पियन आहे

 • नीरज हा सध्याचा डायमंड लीग चॅम्पियन आहे. नीरजची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी ८९.९४ मीटर आहे, जो राष्ट्रीय विक्रमही आहे. २०१८ मध्ये दोहा डायमंड लीगमधील त्याच्या एकमेव सहभागामध्ये २०१८ मध्ये ८७.४३ मीटरसह चौथे स्थान मिळवले. ‘एकूण फिटनेस आणि ताकद’ नसल्यामुळे नीरज गेल्या वर्षी दोहा डायमंड लीगला मुकला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये झुरिचमध्ये २०२२ ग्रँड फिनाले जिंकल्यानंतर डायमंड लीग चॅम्पियन बनणारा तो पहिला भारतीय ठरला. एक महिन्यापूर्वी, तो लुझने येथे डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता.

आशिया चषक तिरंदाजी स्पर्धा – कम्पाऊंड प्रकारात भारताचे निर्विवाद वर्चस्व

 • कम्पाऊंड प्रकारातील भारतीय तिरंदाजांनी दुसऱ्या आशियाई चषक जागतिक मानांकन तिरंदाजी स्पर्धेत ५ सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी १० पदके मिळवून निर्विवाद वर्चस्व राखले. रीकव्‍‌र्ह प्रकारात २ सुवर्ण आणि तीन रौप्यपदके पटकावून भारताने या टप्प्यात एकूण १४ पदकांची कमाई केली.
 • स्पर्धेत एकूण दहा सुवर्णपदकांचा निर्णय लागला. रीकव्‍‌र्ह प्रकारात भारतीय तिरंदाजांना तीन अंतिम फेरीत अपयश आल्याने स्पर्धेतील सुवर्णपदके मिळवण्यापासून भारतीय संघ दूर राहिला. ही तीनही सुवर्णपदके चीनने पटकावली. यानंतरही बलाढय़ कोरियाच्या गैरहजेरीत भारताने पदकतालिकेत आघाडीचे स्थान राखले.
 • रीकव्‍‌र्हच्या वैयक्तिक प्रकारात पुरुष विभागात भारताच्या मृणाल चौहानला वँग बाओबीनकडून २-६ असा पराभव पत्करावा लागला. महिला विभागात संगीताला वू जियाझिनकडून १-३ अशी हार पत्करावी लागली. संगीता, मधून वेदवान, तनिशा वर्मा या संघाला रिकव्‍‌र्ह सांघिकचेही सुवर्णपदक गमवावे लागले. चीनच्या संघाने भारतीय संघाचा ५-१ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मृणाल आणि संगीताने चीनच्या जोडीवर ५-४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
 • ऑलिम्पिक प्रकार नसलेल्या कम्पाऊंड विभागात परणीत कौर, रजनी मार्को, प्रगती या तिघींनी सांघिक सुवर्ण मिळवताना कझाकस्तानच्या संघावर २३१-२२३ असा विजय मिळवला. अभिषेक वर्मा, कुशल दलाल, अमित या पुरुष संघाने हाँगकाँगचा २३३-२२६ असा पराभव केला. वैयक्तिक प्रकारात रजनीने आपली सहकारी प्रगतीचा १४४-१४४ अशा बरोबरीनंतर ‘शूट-ऑफ’मध्ये पराभव केला. परणीतने कझाकस्तानच्या अदेल हेझेनबिनोवाचे आव्हान १४३-१४१ असे संपुष्टात आणून कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात अभिषेकने आपलाच सहकारी अमितचा १४३-१४३ अशा बरोबरीनंतर ‘शूट-ऑफ’मध्ये पराभव केला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

६ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.