७ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
७ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 07 August 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

७ ऑगस्ट चालू घडामोडी

CSIR ने नल्लाथंबी कलैसेल्वी यांची पहिली महिला महासंचालक म्हणून नियुक्ती केली

CSIR ने नल्लाथंबी कलैसेल्वी यांची पहिली महिला महासंचालक म्हणून नियुक्ती केली
  1. जयेष्ठ इलेक्ट्रोकेमिकल शास्त्रज्ञ, नल्लाथंबी कलैसेल्वी या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत .
  2. तयांची नियुक्ती या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
  3. कलाईसेल्वी शेखर मांडे यांची जागा घेतील, जे एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले.
  4. कलाईसेल्वी यांनी CSIR मधील रँकमधून वाढ केली आहे आणि फेब्रुवारी 2019 मध्ये सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-CECRI) चे प्रमुख म्हणून काम करणारी पहिली महिला शास्त्रज्ञ बनून काचेची कमाल मर्यादा तोडली आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा :-१६ वर्षांनी महिला हॉकीत पदक.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा :-१६ वर्षांनी महिला हॉकीत पदक.

बर्मिंगहॅम(इंग्लंड)

  1. भारतीय महिला हॉकी संघाने तब्बल १६ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची करामत करून दाखवली.
  2. १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये न्यूझीलंडवर २-१ अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला आणि ब्राँझपदक पटकावले.
  3. याआधी २००६ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

महिला हॉकी आतापर्यंत ची कामगिरी :-
2002 – मँचेस्टर – सुवर्णपदक
2006 – मेलबर्न – रौप्यपदक
2022 – बर्मिंगहॅम – कांस्यपदक

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

Q.1 जागतिक वनीकरण काँग्रेस परिषद दर किती वर्षांनी आयोजित केली जाते?
उत्तर:-६

Q.2 कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारताच्या पॅडलर्सनी टेबल टेनिसमध्ये भारताला कोणते पदक मिळाले ?
उत्तर:-सुवर्णपदक

Q.3 खालीलपैकी कोणते विधेयक राज्यसभेत अलीकडे मंजूर करण्यात आलेली आहे?
उत्तर:- कौटुंबिक न्यायालय सुधारणा विधेयक

Q.4 खालीलपैकी कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे?
उत्तर:- मध्य प्रदेश

Q.5 भारताच्या उपराष्ट्रपती कोणाची निवडणूक झाली आहे?
उत्तर:- जगदीप धनखड

Q.6 ‘आंख आ धन्या छे’ या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत?
उत्तर:-नरेंद्र मोदी

Q.7 बंगालचे वन रुपी डॉक्टर म्हणून कोणाला ओळखले जात असे नुकतेच त्यांचे निधन झाले?
उत्तर:- सुशोवन बंदोपाध्याय

Q.8 भारताच्या विकास ठाकूर ने वेटलिफ्टिंग मध्ये किती किलो वजनी गटात रजत पदक जिंकले?
उत्तर:-96 किलो

Q.9 कोणत्या राज्याने चिराग योजना सुरू केली आहे?
उत्तर:- हरियाणा

Q.10 द लाईन नावाचे जगातील पहिले व्हर्टिकल शहर कुठे स्थापित केले जाणार आहे?
उत्तर:- सौदी अरेबिया

Q.11 केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर:-सुरेश कुमार पटेल

_

दिनविशेष

७ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi



MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.