७ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
७ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |7 December 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

७ डिसेंबर चालू घडामोडी

भारतीय लष्कराच्या बढतीसंदर्भातल्या नियमावलीत बदल, १ जानेवारीपासून नवीन धोरण होणार लागू

 • भारतीय लष्कराने बढतीसंदर्भातल्या नियमावलीत बदल केला असून नवीन सर्वसमावेशक पदोन्नती धोरण तयार केलं आहे. याबाबतची नियमावली १ जानेवारी २०२४ पासून लागू केली जाणार आहे. नवीन पदोन्नती धोरण सैन्यदलाच्या सतत बदलत्या आवश्यकतांशी सुसंगत तयार केलं आहे. कर्नल आणि त्यावरील रँकच्या अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पदोन्नती धोरणाचा सर्वसमावेशक नियमावली अंतिम करण्यात आली आहे.
 • नवे धोरण अनेक अर्थांनी चांगलं आहे. लष्कराच्या अंतर्गत तसेच बाहेरही अनेक आव्हानं असतात. ही व्यवस्था सध्या अस्तित्त्वात असलेल्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या आव्हानांना पेलण्याची क्षमता असलेलले योग्य नेतृत्व देण्यासाठी मदत करेल, असं भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 • ‘एएनआय’ला दिलेल्या प्रतिक्रियेत लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, नवीन धोरणात बढतीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मेजर जनरल रँकमधील अधिकार्‍यांना पुढील पदोन्नतीच्या संधीही यातून प्रदान करण्यात आल्या आहेत. स्टाफमधून नियुक्त झालेले अधिकारी स्टाफमधील पुढील रँकवर बढतीसाठी पात्र असतील. नवीन धोरण पदोन्नती मंडळांमध्ये जवळजवळ समान नियमावली प्रदान करते.
 • सध्या भारतीय सैन्याचे एचआर व्यवस्थापन विविध धोरणे आणि तरतुदींद्वारे नियंत्रित केले जाते. जे विविध निवड मंडळांसाठी एकसमान नाहीत. हे नवीन धोरण सर्व निवड मंडळांच्या धोरणांमध्ये समानता आणते, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.

भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने मंगळवारी (५ डिसेंबर) एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणलं. आता या प्रोपल्शन माड्यूलचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. पृथ्वी परिक्रमा करत हे मॉड्यूल पृथ्वीवर परतणर आहे. इस्रोने अलिकडेच भारताचं अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून मोठा पराक्रम गाजवला होता. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला. इस्रोची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी ठरली. हे प्रोपल्शन माड्यूल त्याच चांद्रयान-३ चा एक भाग आहे.
 • इस्रोने २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. त्यानंतर या चांद्रयानातील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरने चंद्रावर फिरून तिथल्या तापमानापासून ते पृष्ठभागाबाबतची बरीचशी माहिती इस्रोला दिली. तिथे काढलेले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओदेखील इस्रोला पाठवले. १४ दिवस चंद्रावर संशोधन केल्यानंतर इस्रोची ही मोहीम संपुष्टात आली. कारण हे चांद्रयान सौरऊर्जेवर काम करत असल्यामुळे आणि चंद्रावर रात्र झाल्याने (सूर्यप्रकाशाअभावी) इस्रोचं संशोधनकार्य संपलं. दरम्यान, चांद्रयान मोहिमेच्या उत्तरार्धात इस्रोने आणखी एक यश मिळवलं आहे. चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांना यश मिळालं आहे.
 • चांद्रमोहिमेच्या उत्तरार्धातील या महत्त्वाच्या टप्प्याची माहिती देताना इस्रोनं म्हटलं आहे की, “आता चंद्रावरून पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया सोपी असणार आहे. आम्ही आता अशा प्रकारच्या मोहिमांवर काम करत आहोत. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे.” चांद्रयान मोहीम फत्ते करून चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत आलं आहे. हे मॉड्यूल लवकरच पृथ्वीवर उतरेल. ही गोष्ट केवळ चांद्रयान मोहिमेपुरती मर्यादित नाही. कारण यामुळे आता कोणतंही यान अथवा अंतराळवीरास अवकाश मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परत आणण्याची क्षमता इस्रोने सिद्ध करण्याचा पहिला टप्पा इस्रोने पार केला आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या यशाचं कौतुक केलं आहे. मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इस्रोची पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे की, “इस्रोचं अभिनंदन! आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांमधील आणखी एक तांत्रिक मैलाचा दगड आपण गाठला आहे. या ध्येयांमध्ये २०४० पर्यंत चंद्रावर भारतीयाला पाठवण्याचं आपलं ध्येयदेखील समाविष्ट आहे.”

भारतासाठी २०११-२० दशक अतिवृष्टीचे आणि उष्ण!, हवामान बदलाचा फटका, जागतिक हवामान संघटनेचा अहवाल

 • भारतासाठी २०११ ते २०२० हे दशक हवामान बदलामुळे भारतासाठी अतिवृष्टीचे (पुरांचे) किंवा उष्णतेचे ठरले. या काळात हवामान बदलाचा वेग चिंताजनकरित्या वाढला. त्यामुळे भारतासाठी सर्वात उष्ण दशकाची नोंद झाली. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (सीओपी-२८) मंगळवारी जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) सादर केलेल्या ‘२०११ ते २०२० च्या दशकातील पर्यावरणीय स्थिती’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
 • संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेत (यूएन सीओपी २८) सादर झालेल्या २०२३ च्या अंतरिम वार्षिक अहवालात असे नमूद करण्यात आले आहे, की २०२३ची सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद होईल. हवामान, जागतिक तापमानवाढ आणि जलस्रोतांवर काम करणाऱ्या ‘डब्ल्यूएमओ’ने म्हटले आहे की, वायव्य भारत, पाकिस्तान, चीन आणि अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीसाठी हे ‘अतिपावसाचे दशक’ ठरले.
 • या अहवालात नमूद केले, की २०११ ते २०२० या दशकात आग्नेय आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको आणि पूर्व ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत १९६१ ते १९९० च्या सरासरीपेक्षा तापमानापेक्षा सुमारे दुप्पट तापमान होते. २०११ ते २०२० या दशकात पडलेल्या दुष्काळांमुळे महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक आणि मानवी जीवनावर दुष्परिणाम घडले. भारतातच, २८ पैकी ११ राज्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यामुळे अन्न आणि पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले.
 • पाणी उपलब्धता आणि पुरवठय़ातील तफावतीमुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार जगभरातील हिमनद्या दरवर्षी सुमारे एक मीटरने वितळत आहेत, ज्यामुळे लाखो लोकांच्या पाणीपुरवठय़ावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत. २००१-२०१० च्या तुलनेत २०११-२०२० दरम्यान अंटाक्र्टिकच्या हिमाच्छादित भागातून ७५ टक्क्यांहून अधिक हिम वितळले आहे. त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होऊन सखल किनारी प्रदेश-बेट आणि देशांचे भविष्यातील अस्तित्व धोक्यात येईल.

राज्याला नऊ भौगोलिक मानांकने; तुळजापूरची कवडी, जालन्याची ज्वारी,कास्तीच्या कोथिंबिरीचा समावेश

 • राज्यातील वैशिष्टय़पूर्ण बाबीसाठी देण्यात येणाऱ्या भौगोलिक मानांकनामध्ये या वेळी बदलापूर, बाहडोळीची जांभळे, पेणच्या गणेशमूर्ती, लातूर जिल्ह्यातील कास्ती या गावाची कोथिंबीर, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील चिंच आणि बोरसुरी येथील तुरीचा समावेश करण्यात आला आहे. जालनाची  दगडी ज्वारी, धाराशीव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा आणि तुळजापूरच्या कवडीला यामध्ये स्थान देण्यात आले आहे. राज्यातून पाठवलेल्या १८ प्रस्तावांना भौगोलिक मानांकन मिळावे, असे प्रयत्न सुरू होते.
 • कास्तीची कोथिंबीर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कास्ती भागातील कोथिंबिरीला एक प्रकारचा वेगळा सुगंध आहे. बासमती तांदूळ जसा असतो तसेच या कोथिंबिरीला वेगळा वास आहे. मुंबई, नागपूर या मोठय़ा शहरांसह अन्य देशातही कोथिंबीर निर्यातही करण्यात येते. 
 • बोरसुरी डाळ :  निलंगा तालुक्यात बोरसुरी हे गाव आहे. येथील वरण प्रसिद्ध आहे. या भागात बोरसुरी वरणाची मेजवानी करण्यात येते. त्याला डाळ असे संबोधले जात असले तरी या गावातील वरणात टाकल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे याला नामांकन मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 • पानचिंचोली चिंच : पानचिंचोली या गावातील चिंचेचा आकार सहा ते आठ इंचांपर्यंत असतो. गेल्या ३०० वर्षांपासून या गावातील चिंच प्रसिद्ध आहे. या वेळी त्याची वैशिष्टय़े मांडण्यात आली. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी या कामासाठी विशेष लक्ष घातले होते. येथील पातडी चिंच उत्पादक संघाच्या वतीने व बोरसुरी येथील तूर डाळ उत्पादक संघाने बोरसुरी तूर डाळ विशेष भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे या तीन वाणाला आता देशभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
 • कुंथलगिरीचा खवा :  धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूध उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. कुंथल या शब्दाचा अर्थ कुरळा असा होतो.  हा भाग डोंगराळ आणि कुरळय़ा केसाच्या आकाराचा असल्याने येथे जनावरांची संख्या अधिक आहे. 
 • तुळजापूरची कवडी : तुळजापूरला येणारे भाविक कवडय़ांची माळ घालतात.  कवडी स्त्री देवतांचे उपासक आवर्जून वापरतात. शिवाजी महाराज हे गळय़ात कवडय़ांची माळ घालत. 
 • जालन्याची ज्वारी : ही ज्वारी टणक असून, पक्ष्यांना सहजपणे फोडता येत नाही. या भागातील ज्वारी वैशिष्टय़पूर्ण आहे. ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी पुणे येथील गणेश हिंगमिरे जीआय नामांकन क्षेत्रात काम करतात.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.