८ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
८ जानेवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 8 January 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

८ जानेवारी चालू घडामोडी

अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी मॅकार्थी:

  • अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदी केव्हिन मॅकार्थी यांची निवड झाली.
  • या पदासाठी शनिवारी झालेल्या मतदानाच्या ऐतिहासिक 15 व्या फेरीत त्यांना हे यश मिळाले.
  • मॅकार्थीनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या 82 वर्षीय नॅन्सी पलोसी यांच्याकडून सूत्रे घेतली.
  • 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीनंतर पलोसी यांनी सभागृहातील आपले बहुमत गमावले होते.

चेतन शर्मा निवड समिती अध्यक्षपदी कायम:

  • ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संपूर्ण निवड समिती बरखास्त केल्याच्या दोन महिन्यांनंतर चेतन शर्मा यांना शनिवारी वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा देण्यात आली.
  • शर्मा यांनी निवड झाली असली तरीही त्यांच्या समितीत नवीन चेहरे पाहण्यास मिळतील.
  • दक्षिण विभागातून कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष एस.शरथ यांना स्थान देण्यात आले आहे.
  • समितीत पूर्व विभागातून माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी, पश्चिम विभागातून सलिल अंकोला आणि मध्य विभागातून कसोटी सलामी फलंदाज शिव सुंदर दास यांना स्थान देण्यात आले आहे.
  • दासने ओदिशाकडून खेळल्यानंतर विदर्भचे प्रतिनिधित्व केले.

दुबई स्पर्धेनंतर सानियाची निवृत्ती:

  • भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस स्पर्धेनंतर आपल्या टेनिस कारकीर्दीचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • दुबई टेनिस स्पर्धा ही आपल्या कारकीर्दीमधील अखेरची स्पर्धा असेल, असे सानियाने ‘डब्ल्यूटीए’ला कळवले आहे.
  • गेल्या हंगामाच्या अखेरीस सानियाने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण, कोपराच्या दुखापतीमुळे तिला अमेरिकन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
  • सानियाने कारकीर्दीत तीन महिला आणि तीन मिश्र दुहेरी अशी सहा प्रमुख स्पर्धेत विजेतेपद मिळविली आहेत.
सानिया मिर्झा

श्रेयस अय्यरला एक नव्हे तर मिळाले पाच पुरस्कार:

  • भारत आणि श्रीलंका संघांत 10 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.
  • या मालिकेत तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे.
  • श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत स्थान मिळवणाऱ्या श्रेयस अय्यरला या मालिकेपूर्वी पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
  • भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला वार्षिक मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) पुरस्कार कार्यक्रमात पाच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
  • मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी रात्री आयोजित केलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात (एमसीए वार्षिक पुरस्कार) त्याला 8 पुरस्कार मिळाले.
  • त्याचबरोबर युवा खेळाडू पृथ्वी शॉला 9 पुरस्कार मिळाले.
  • सरफराज आणि त्याच्या भावाने डझनाहून अधिक पुरस्कारांवर कब्जा केला.
  • याशिवाय श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज धवन कुलकर्णी यांच्याशिवाय भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही सन्मान करण्यात आला.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

८ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.