९ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
९ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |9 December 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

९ डिसेंबर चालू घडामोडी

महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव कधी आणि कुठे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार? जाणून घ्या

  • महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा लिलाव आज म्हणजेच ९ डिसेंबर रोजी होणार आहे. पाच संघ असलेली ही स्पर्धा पहिल्या सत्रात खूप लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर आता दुसऱ्या सत्राकडे वाटचाल करत आहे. पहिल्या सत्रात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. आता स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातसाठी एकूण १६५ महिला खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत.

हे पाच संघ लावतील बोली –

  • विशेष म्हणजे या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होत आहेत. २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रातही पाच संघ सहभागी झाले होते. आता पुन्हा एकदा पाच संघ मैदानात उतरतील, ज्यात दिल्ली कॅपिटल्स महिला, यूपी वॉरियर, रॉयल चॅलेंजर्स महिला, गुजरात जायंट्स आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स महिला संघांचा समावेश आहे.
  • तथापि, पाच संघांकडे बोली लावण्यासाठी फक्त ३० स्लॉट आहेत. १६५ पैकी १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. एकूण खेळाडूंपैकी ५६ कॅप्ड आणि १०९ अनकॅप्ड खेळाडू आहेत, ज्यांच्यासाठी पाच फ्रँचायझींकडे एकूण १७.६५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आता हा लिलाव केव्हा, कुठे आणि कसा लाइव्ह पाहता येणार याबद्दल जाणून घेऊया.

लिलाव कधी होणार?

  • महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी म्हणजेच डब्ल्यूपीएल २०२४ साठी लिलाव आज, शनिवार, ९ डिसेंबर रोजी होणार आहे.

लिलाव कुठे होणार?

  • महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव मुंबईत होणार आहे.

कधी सुरू होणार?

  • मुंबईत होणाऱ्या महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे.

टीव्हीवर लाइव्ह कुठे बघता येणार?

  • महिला प्रीमियर लीग २०२४ साठीचा लिलाव स्पोर्ट्स १८ नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर लाइव्ह प्रसारित केला जाईल.

मोफत लाइव्ह कुठे बघता येणार?

  • डब्ल्यूपीएल २०२४ चा लिलाव जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटद्वारे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार आहे.

७५ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच; अनेक विभागांच्या परीक्षांचे निकाल प्रलंबित; परीक्षार्थीकडून संतापाची भावना

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून राज्यात १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार सरळसेवेची पदभरती करण्याची सरकारने घोषणा केली असली तरी सर्व पदे अद्याप भरलेली नाहीत. डिसेंबर महिना सुरू असताना काही विभागांच्या परीक्षांचे निकालही अद्याप जाहीर झालेले नाहीत.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी करून ७५ हजार नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. त्यानुसार शासनाच्या ३२ विभागांपैकी काही विभागांनी आवश्यक  रिक्त जागांची माहिती गोळा करणे, भरती कशा रीतीने करणे, भरती प्रक्रियेचे निकष, भरतीसाठी खासगी संस्थांची निवड करणे आदीविषयी कार्यवाही राबविण्यास सुरुवात केली. त्यानुसार गृह विभागाने १८ हजार पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली.
  • सहकार विभागाने जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्टमध्ये ३०९ पदांसाठी परीक्षा घेतली. पशुसंवर्धन विभागाची जुलैमध्ये जाहिरात आणि ऑगस्टमध्ये ४४९  पदांची, महसूल विभागाने जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ४७९३ पदांची ऑगस्टमध्ये परीक्षा घेतली. वन विभागाने २४१७  पदांसाठी ऑगस्टमध्ये परीक्षा, कृषी विभागाने २१८ पदासाठी सप्टेंबरमध्ये तर, अर्थ व सांख्यिकी २६० जागांसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतल्या आहेत. मात्र, या सर्व ८४४६ जागांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत. ते कधी लागणार याकडे या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे डोळे लागले आहेत. याशिवाय ग्रामविकास विभागाने ४ ऑगस्ट रोजी १९,४६० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, काहीना काही कारणांमुळे या पदांची परीक्षा झालेली नाही. या परीक्षेचीही उमेदवार वाट पाहात असून ही परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थी लक्ष वेधत आहेत.

काही जागांच्या जाहिरातीकडे लक्ष..

  • सामाजिक न्याय, वित्त व लेखा कोषागार विभाग, पुरवठा निरीक्षम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगर परिषद, नगरपंचायत गट-‘क’ व  ‘ड’ यातील जागांची जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाही. यामुळेच ७५ हजार पदे भरण्याचा मुहूर्त चुकला आहे.
  • रशियाच्या अध्यक्षपदासाठी पुतिन यांची पुन्हा दावेदारी! देशावरील पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न 
  • व्लादिमीर पुतिन यांनी आगामी वर्षांत मार्चमध्ये होत असलेल्या रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आपली उमेदवारी जाहीर केली. आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुतिन यांनी शुक्रवारी क्रेमलिन पुरस्कार सोहळय़ानंतर १७ मार्च रोजी होत असलेल्या रशियन अध्यक्षीय निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला.
    • युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या अनेक ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पुतिन यांना ही निवडणूक लढवण्याची विनंती केली. या अधिकाऱ्यांच्या विनंतीला प्रतिसाद देताना पुतिन यांनी उत्स्फूर्तपणे होकार दिल्याचे ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी नमूद केले.
  • यक्रेन युद्धावर रशियाचा प्रचंड खर्च होत आहे. पुतिन यांच्या जवळपास २५ वर्षांच्या कारकिर्दीनंतरही रशियात त्यांना अद्यापही व्यापक पाठिंबा असल्याचे चित्र आहे. त्यांच्या कारकीर्दीत रशियात अंतर्गत हल्ले झाले. रशियन सत्ताकेंद्र ‘क्रेमलिन’वरही हल्ला झाला. पुतिन यांचाच एके काळी निकटवर्तीय मानल्या गेलेल्या येवगेनी प्रिगोझिन याच्या भाडोत्री लष्कराने जूनमध्ये अल्पकालीन बंडखोरीनंतर पुतिन यांची रशियावरील पकड कायम आहे.

Aditya L1 चं मोठं यश, पाठवले सूर्याचे जवळून काढलेले फोटो, भास्कराचं हे रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल

  • चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सौरमोहीम हाती घेतली आहे. इस्रोने आदित्य एल-१ हे यान सूर्याच्या दिशेनं पाठवलं आहे. भारताच्या या मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. आदित्य-एल१ ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो काढून इस्रोला पाठवला आहे. हे सर्व फोटो २०० ते ४०० नॅनोमीटर व्हेवलेन्थमधील आहेत. याद्वारे तुम्हाला सूर्याचं ११ वेगवेगळ्या रंगांमधलं रूप पाहायला मिळेल.
  • सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने आदित्य एल-१ हे अवकाशयान २ सप्टेंबर रोजी लाँच केलं. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवलं आहे. यासाठी आदित्य एल-१ मध्ये वेगवेगळी उपकरणं (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही सौरमोहीम हाती घेतली आहे.
  • दरम्यान, आदित्य-एल१ चा SUIT पेलोड २० नोव्हेंबर रोजी चालू करण्यात आला होता. या टेलिस्कोपने सूर्याच्या फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयरचे फोटो काढले आहेत. फोटोस्फेयर म्हणजेच सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फेयर म्हणजे सूर्याच्या बाह्य वातावरणातील पातळ थर, जो पृष्ठभागापासून २००० किलोमीटर दूर आहे. आदित्य-एल१ ने याआधी ६ डिसेंबर रोजी सूर्याचे काही फोटो क्लिक केले होते. ते पहिलेच लाईट सायन्स फोटो होते. परंतु, यावेळी फुल डिस्क फोटो क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये सूर्यावरील डाग आणि त्याचं शांत रूप दिसतंय. या फोटोंच्या माध्यमातून इस्रोचे वैज्ञानिक सूर्याचा अभ्यास करू शकतील.
  • पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, मनिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडियन, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर ऑब्जर्व्हरी, तेजपूर युनिव्हर्सिटी आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी मिळून हा SUIT बनवला आहे.

“भारतातच करा डेस्टिनेशन वेडिंग”, पंतप्रधानांचं धनाढ्यांना आवाहन; म्हणाले, “जोड्या देव बनवतो, मग तुम्ही…”

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (८ डिसेंबर) उत्तराखंडमध्ये आयोजित दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारतासह जगभरातील गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या परदेशी गुंतवणुकीवर भाष्य केल. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, आम्ही या परिषदेसाठी आलेल्या गुंतवणूकदारांबरोबर २.५ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापर्यंत ४४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर यशस्वी बोलणी झाली आहे.
  • दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देवभूमी उत्तराखंड तुम्हा सर्वांसाठी नवे दरवाजे उघडत आहे. भारताचा प्रगतीचा मंत्र घेऊन उत्तराखंड पुढे सरकत आहे. या महत्त्वकांक्षी भारताला स्थिर सरकार हवं आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आपण तेच पाहिलं आहे. लोकांनाही स्थिर आणि मजबूत सरकर हवं आहे. हीच गोष्ट उत्तराखंडच्या जनतेने आधीच दाखवून दिली आहे.
  • रम्यान, नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडला परफेक्ट वेडिंग डेस्टिनेशन (विवाह करण्यासाठीचं उत्तम ठिकाण) म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी या देशातल्या धनाढ्य लोकांना सांगू इच्छितो की, लोकांची लग्न होतात, तेव्हा त्यांच्या जोड्या ईश्वराने बनवलेल्या असतात, असा आपला समज आहे. परंतु, मला एक गोष्ट कळत नाही की, देव लोकांच्या जोड्या बनवतो तर मग या जोड्या त्यांच्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी (डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी) परदेशात का जातात? ते इथे देवभूमीवर लग्न का करत नाहीत? देवाच्या दारात लग्न करण्याऐवजी परदेशात का जातात?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मला असं वाटतं की, आपल्या देशांमधील तरुणांसाठी ‘मेक इन इंडिया’ योजना आहे. त्याचप्रमाणे ‘वेड इन इंडिया’ ही चळवळ सुरू व्हायला हवी. आपल्या देशातले धनाढ्य तरुण जगभरातल्या इतर देशांमध्ये जाऊन लग्न का करतात? आपल्या देशातल्या धनाढ्य लोकांमध्ये परदेशात जाऊन लग्न करण्याची फॅशन सुरू झाली आहे.

कोणावर सर्वाधिक बोली? ‘डब्ल्यूपीएल’साठी आज १६५ क्रिकेटपटूंचा लिलाव

  • महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी शनिवारी मुंबईत क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. या वेळी एकूण १६५ महिला क्रिकेटपटू लिलावात सहभाग नोंदवणार असून, सर्वाधिक बोली कोणावर लागणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.
  • क्रिकेटपटूंच्या लिलावाबरोबरच या वेळी लीग विविध शहरांत खेळवली जाणार की पुन्हा एकदा एकाच केंद्रावर पार पडणार या विषयीचा निर्णयदेखील घेतला जाणार आहे. पहिल्या हंगामात गेल्या वर्षी केवळ मुंबईत ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामने पार पडले होते. या वेळी विविध शहरांत सामने खेळविण्याचा विचार असून, यासाठी प्रामुख्याने मुंबई आणि बंगळूरु या शहरांची नावे चर्चेत आहेत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या पाच संघांमध्ये क्रिकेटपटूंसाठी रस्सीखेच चालेल.   या रकमेतून संघांना १८ खेळाडूंची निवड करायची असून, संघात ६ परदेशी खेळाडू अनिवार्य असतील.
  • पहिल्या पर्वात भारताची स्मृती मनधाना सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली होती. बंगळूरुने तेव्हा मुंबई इंडियन्सला टक्कर देत ३.४ कोटी रुपयांची बोली मनधानावर लावली होती. या वेळी नव्या लिलावासाठी वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन आणि ऑस्ट्रेलियाची किम गार्थ या खेळाडूंसाठी सर्वाधिक ५० लाख रुपये मूळ  किंमत निश्चित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल, इंग्लंडची एमी जोन्स यांच्यासाठी ४० लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. भारताकडून वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, सुषमा वर्मा, एकता बिश्त, गौहर सुलताना, मोना मेश्राम यांच्यासाठी ३० लाख आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

 डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.