चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्युनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन या क्रांतीकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशिएशन या नवीन नावाखाली पुनर्बाधणी केली. त्याचप्रमाणे त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते.
जन्म: | २३ जुलै १९०६ |
मृत्यु: | २७ फेब्रुवारी १९३१ |
वडील | सीताराम तिवारी |
आई | जागरणी देवी |
जन्मगाव | मध्य प्रदेशातील भवरा गावातील |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना | हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन |
जन्म आणि बालपण:
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ‘सिताराम तिवारी’ व आईचे नाव ‘जगरानी देवी’ असे होते . त्यांचे पृर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.
त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.
डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता . त्यासाठी त्याला अटक झाली होती.
तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव ‘आझाद’ असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
मृत्यु:
दिनांक २७ फेब्रुवारी इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला.
चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले
FAQs
काकोरी कटात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली जिथे त्याने ब्रिटीश खजिन्यातील रोकड घेऊन जाणारी ट्रेन लुटली. आझादने आत्महत्या केली कारण पोलिस त्याला जिवंत पकडणार नाहीत अशी प्रतिज्ञा त्याने केली होती.
चंद्रशेखर सीताराम तिवारी