औरंगाबाद जिल्हा हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी एक आहे. याच्या पश्चिमेस नाशिक, उत्तरेस जळगाव, पूर्वेस जालना आणि दक्षिणेस अहमदनगर जिल्ह्यांची सीमा आहे. औरंगाबाद हे मुख्यालय आणि मुख्य शहर आहे.
या शहराचे पुवीचे नाव ‘खडकी’ होते.
मलीक अंबर याने 1604 मध्ये या शहराची स्थापना केली व पुढे 1626 मध्ये या शहराचे नाव ‘फत्तेहपूर’ असे ठेवले गेले.
1653 मध्ये औरंगाजेब सुभेदार म्हणून आल्यानंतर त्यांनी या शहराला ‘औरंगाबाद’ असे नाव दिले.
औरंगाबाद जिल्हा अंजिंठा आणि वेरूळ लेण्यामुळे प्रसिद्ध आहे.
प्रशासकीय विभाग | औरंगाबाद विभाग (मराठवाडा) |
मुख्यालय | औरंगाबाद शहर |
क्षेत्र | 10,100 चौ कि |
गाव | 1341 |
तालुके | 9 औरंगाबाद (ग्रामीण & औरंगाबाद अप्पर तहसील सिल्लोड सोयेगाव वैजापूर गंगापूर पैठण फुलंब्री कन्नड खुलताबाद |
नगरपालिका | औरंगाबाद महानगरपालिका गंगापूर नगरपरिषद सिल्लोड म्युनिसिपल काउन्सी वैजापूर नगरपरिषद कन्नड नगरपरिषद खुलताबाद नगरपरिषद पैठण नगर परिषद |
एस टी डी कोड | 1 औरंगाबाद 0240 2 कन्नड 2435 3 खुलताबाद 2437 4 पैठण 2431 5 फुलंब्री 2430 6 गंगापूर 2433 7 वैजापूर 2436 8 सिल्लोड 2430 9 सोयेगाव 2438 |
पिनकोड | 1 औरंगाबाद 431001 2 कन्नड 431103 3 खुलताबाद 431101 4 पैठण 431107 5 फुलंब्री 431111 6 गंगापूर 431109 7 वैजापूर 423701 8 सिल्लोड 431112 9 सोयेगाव 431120 |
आर टी ओ कोड | MH-20 |
प्रमुख नद्या | गोदावरी, पूर्णा, शिवाना, मनिअद, सुखाना, खाम आणि प्रसिद्ध शाहबाज नदी |
प्रमुख पिके | ज्वारी, मोत्याची बाजरी, गहू आणि हरभरा |
तेलबिया | सोयाबीन |
नगदी पिके | कापूस |
पर्यटन स्थळे | एलोरा लेनी आणि गृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरूळ दौलताबाद किल्ला बीबी का मकबरा पद्मपणी चित्रकला अजिंठा लेणी |
सीमा | उत्तरेस जळगाव जिल्हा, पूर्वेस जालना जिल्हा, दक्षिणेस गोदावरी नदीच्या पलीकडे बीड, पश्चिमेस नाशिक जिल्हा आहे. |
वेबसाईट | https://aurangabad.gov.in/ |
औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख स्थळे:
- औरंगाबाद – येथील ‘बीबी का मकबरा’ दख्खनचा ताजमहाल म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथील पाणचक्की पाहण्याजोगी आहे. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठाचे मुख्य कार्यालय आहे.
- दौलताबाद – ‘देवगिरी’ हा यादवकालीन किल्ला आहे. देवगिरी ही यादवाजी राजधानी होती. पुढे दिल्लीचा सुलतान महंमद तुगलकाने देवगिरीचे नाव ‘दौलताबाद’ ठेवले.
- खुलताबाद – येथे मोगल सम्राट औरंगजेबाची कबर आहे.
- वेरूळ – खुलताबाद तालुक्यात वेरूळची लेणी किंवा गुंफा मंदिरे आहेत. तेथील कैलास लेणी जगप्रसिद्ध आहेत. श्री घृष्णेश्वर हे बारावे व शेवटचे ज्योतिर्लिंग येथे आहे.
- अजिंठा – सिल्लोड तालुक्यात अजिंठ्याचा जगप्रसिद्ध लेणीसमूह आहे.
- पैठण – येथे एकनाथांची समाधी आहे. जायकवाडी प्रकल्पातील ‘नाथसागर’ जलाशय येथेच आहे.
- आपेगांव – संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थळ.
- पितळ्खोरा – बौद्धकालीन लेणी ही भारतातील सर्वात प्राचीन लेणीगणली जाते.
औरंगाबाद जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- पाणी व जमिन व्यवस्थापन संस्था (WALMI)- औरंगाबाद
- घुष्णेश्वर हे पवित्र ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
- जायकवाडी वनोध्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
- औरंगाबाद जिल्ह्यातून कोणकोणत्या नद्या वाहतात?
- – गोदावरी, दूधना, खाम, येळगंगा, पूर्णा, वाघूर, केळणा, अंजना, गिरजा, शिवणा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठ कोठे आहे? – औरंगाबाद
- औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रमुख शेतकी उत्पादने कोणकोणती होतात? – बाजारी, ज्वारी, करडई, उस, केळी, द्राक्ष.
- पैठण्या व शालूसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध शहर कोणते? – पैठण
- हिमरू शालीसाठी प्रसिद्ध शहर कोणते? – औरंगाबाद
- औरंगाबाद जिल्ह्यातील औधोगिक वसाहती कोणत्या?- औरंगाबाद, चिखलठाणा, पैठण, वाळूंज
- पैठण-जायकवाडी जलविधुत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
- प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे? – औरंगाबाद
- महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता? औरंगाबाद
- औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? – जायकवाडी धरण
- पितळ्खोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? – औरंगाबाद
- म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
- कैलास लेणे कोठे आहे? – वेरूळ
- देवगिरी- दौलताबाद किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? – औरंगाबाद
- औरंगाबाद जवळ चिखलठाणा येथे विमानतळ आहे.
- भारतात अलाहाबादनंतर खुलताबाद येथे हनुमानाची मूर्ती निद्रिस्त अवस्थेत आहे. या ठिकाणाला भद्रा मारुती म्हणून ओळखल्या जाते.
- जायकवाडी हा राज्यातील सर्वात मोठा बहुद्देशीय प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या धरणाच्या जलाशयास नाथसागर म्हणून ओळखले जाते.
- औरंगाबाद शहर हे बावन्न दरवाजांचे शहर ओळखले जाते.
औरंगाबाद जिल्हा नकाशा
FAQs
औरंगाबाद जिल्ह्यात किती तालुके आहेत
9 – कन्नड, सिल्लोड, सोय गाव, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद, पैठण, फुलंब्री.
औरंगाबादमधील सर्वात मोठा तालुका कोणता आहे?
औरंगाबाद