बीड जिल्हा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय बीड येथे आहे. बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्चिमेच्या मध्यभागी आहे
1 नोव्हेंबर 1956 ला व्दिभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यानंतर बीड जिल्हा या राज्याचा एक भाग बनला.
पुढे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला.
बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोर्यात बिळासारख्या किंवा खळग्यासारख्या ठिकाणी हे शहर बसले असल्याने ‘बीळ’ या शब्दावरून या जिल्ह्याचे नाव ‘बीड’ असे पडले असावे अशी उपपत्ती आहे.
हा ऐतिहासिक जिल्हा आहे. भारतातील प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य हे बीडचेच होते. उस कामगारासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.
विभाग | औरंगाबाद विभाग (मराठवाडा) |
क्षेत्र | 10,693 km² |
तालुके | 11 – गेवराई, आष्टी, माजलगांव, पाटोडा, केज, अंबाजोगाई, धारूर, परळी, बीड, शिरूळ-कासार, वडवणी. |
तहसील | 11 बीड गेवराई माजलगाव धरूर वडवानी परळी पाटोदा आष्टी शिरूर कासार अंबाजोगाई कैज |
गाव | 1360 |
प्रमुख नद्या | गोदावरी, मांजरा, सीना नदी, सिंदेफना नदी |
प्रमुख पिके | बाजरा मका ज्वारी गहू हरभरा तूर शेंगदाणा कापूस ऊस |
पिनकोड | 431122 |
आर टी ओ कोड | MH-23 |
महामार्ग | MH MSH 1, MH MSH 3, MH MSH 6, MH MSH 9, MH MSH 10. |
पर्यटन स्थळे | परळी वैजनाथ योगेश्वरी मंदिर कंकालेश्वर मंदिर माजलगाव डॅम खोलेश्वर मंदिर |
सीमा | उत्तरेस जालना व औरंगाबाद हे दोन जिल्हे, पूर्वेस लातूर जिल्हा, दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस अहमदनगर जिल्हा, ईशान्येस परभणी जिल्हा असून आग्नेयेस कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा आहे. |
वेबसाईट | beed.gov.in |
बीड जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
- बीड – शहरात कंकालेश्वराचे जलमंदिर आहे. शहराजवळ ‘खजाना’ ही प्रसिद्ध विहीर असून तिचे पाणी कधीच आटत नाही. येथील औष्णिक विधुत केंद्र राष्ट्रीय पातळीवरही महत्वाचे गणले जाते.
- मांजरशुभा – जवळच ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे.
- राक्षसभुवन – 10 ऑगस्ट 1763 रोजीची पेशवा व निजाम यांच्यातील निर्णायक युद्धाची जागा येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे.
- आष्टी – येथील हजारतशाह बुखारी यांचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
- आंबेजोगाई- जोगाई व खोलेश्वर यांची प्राचीन मंदिरे, आधकवी मुकुंदराज व संतकवी दासोपंत यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध.
- परळी – येथील बैजनाथाचे मंदिर प्रसिद्ध असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
बीड जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी गोदावरी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते.
- बीड येथे चर्मोधोग प्रकल्प मराठवाडा विकास महामंडळातर्फे राबविण्यात येते.
बीड जिल्हा नकाशा
FAQs
11- गेवराई, आष्टी, माजलगाव, पाटोडा, केज, अंबाजोगाई, धारूर, परळी, बीड, शिरूळ-कासार, वडवणी.