Budget 2020
Budget 2020

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे थोडक्यात
2025 पर्यंत दुध उत्पादन दुप्पट करणार
– आयुषमान भारत योजनेअंतर्गत 20 हजार रुग्णालये
– टीबी हारेगा, देश जितेगा हे मिशन राबविण्यात येणार
– 2025 पर्यंत टीबी हटविण्याचा सरकारचा उद्देश
– 12 आजारांसाठी मिशन इंद्रधनुष योजना
– पंचायत व ग्रामविकासासाठी 2.83 कोटी रुपयांची तरतूद
– प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा होणार
– क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार
– नवे शिक्षण धोरण लवकरच आमलात येणार
– शैक्षणिक धोरणासाठी 2 लाख सूचना आल्या
– गरिबांसाठी ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण राबविणार
– नव्या अभियंत्यांना 1 वर्षाची इंटर्नशिप सुरु करणार
– शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इंटर्नशिप करता येणार
– गरिबांना दर्जेदार शिक्षण पुरविणार
– शिक्षण क्षेत्रातही थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आणणार
– उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणार
– चांगले डॉक्टर तयार करण्यासाठी विद्यापीठ सुरु होणार
– पीपीपी मॉडेलद्वारे विद्यापाठ सुरु करणार
– आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतूद
– शिक्षणासाठी 99 हजार 300 कोटींची तरतूद
– मार्च 2025 पर्यंत डिप्लोमासाठी 150 संस्था सुरु करणार
– राष्ट्रीय पोलिस विद्यापीठाचा प्रस्ताव
– नॅशनल फॉरेन्सिक विद्यापीठ सुरु करणार
– आघाडीच्या १०० मध्ये असणाऱ्या शिक्षण संस्थांकडून डिजीटल शिक्षण उपलब्ध करणार
– पीपीपी तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जोडणे शक्य आहे, केंद्र सरकार यासाठी पुढाकार घेईल
– 3 हजार कौशल्य शिक्षण विकास केंद्रे सुरु करणार
– इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढीवर भर देणार
– मोबाईल उत्पादन वाढीसाठी विशेष तरतूद
– 5 नवी स्मार्ट शहरे बनविणार
– गुंतवणूक मंजुरीसाठी नवा कक्ष उभारणार
– निर्यातीसाठी नवी निर्विक योजना सुरु करणार
– वाणिज्य क्षेत्रासाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद
– स्कील इंडियासाठी 3 हजार कोटींची तरतूद
– वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी 4 वर्षांत 1480 कोटी दिले
– सर्व जिल्ह्यांमध्ये स्वस्त औषध केंद्र उभारणार
– चेन्नई-बंगळूर, दिल्ली-मुंबई दरम्यान एक्स्प्रेस हायवे सुरु करणार
– तेजससारख्या आणखी नव्या रेल्वे सुरु करणार
– तेजससारख्या रेल्वेगाड्या पर्यटन स्थळांशी जोडणार
– नॅशनल लॉजिस्टिक धोरण सुरु करणाऱ
– रेल्वेच्या रिकाम्या जागांवर सौरउर्जा प्रकल्प सुरु करणार
– 27 हजार किमी रेल्वे मार्ग इलेक्ट्रिक करणार
– 550 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुर करणार
– 2024 पर्यंत 6 लाख किमीचे रस्ते बनविणार
– पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार
– सागरी किनारी दोन हजार किमीचे रस्ते उभारणार
– चांगल्या सुविधा देण्यासाठी आता रेल्वेमध्ये खासगी सहभाग वाढणार
– जल जीवन योजनेसाठी सुमारे 3.6लाख कोटी रुपयांची तरतूद. प्रत्येक घरात पाणी पोचवणार
– आर्थिक दळणवळण वाढीसाठी नद्यांचा वापर होणार
– मुंबई-अहमदाबाद गाड्या वाढविण्यात येणार
– भारतनेट योजनेसाठी 6 हजार कोटींची तरतूद
– 1 लाख ग्रामपंचायतींनी इंटरनेट सुविधा पुरविणार
– देशात डेटा सेंटर पार्क सुरु करणार
– भारत नेटद्वारे देश जोडणार, 6 हजार कोटींची तरतूद
– क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी 8 हजार कोटींची तरतूद
– खाजगी क्षेत्राला डेटा सेंटर पार्क निर्मिती करण्यासाठी आवाहन
– प्रत्येक घरातील वीज मीटर 3 वर्षांत बदलण्यात येणार
– घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार
– वीज क्षेत्रासाठी 22 हजार कोटींची तरतूद
– 2024 पर्यंत नवी शंभर विमानतळे उभारण्यात येणार
– 6 लाख अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले
– अंगणवाडी वर्कर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहार
– पोषण आहार योजनेसाठी 35 हजार 600 कोटींची तरतूद
– आंगणवाडी योजनेंतर्गत 10 लाख नागरिकांना लाभ
– बेटी बचाओ, बेटी पढाओचा फायदा झाला
– महिलांसाठी 28 हजार 600 कोटींची तरतूद
– शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या वाढली
– अनुसुचित जाती व जमातीसाठी (एससी, एसटी) 85 कोटींची तरतूद
– संस्कृती मंत्रालयासाठी 3 हजार 150 कोटी रुपयांची तरतूद
– 5 पुरातत्व ठिकाणांचा विकास करणार
– 4 संग्रहालयांचे नुतनीकरण करणार
– रांचीमध्ये आदिवासी संग्रहालय स्थापन करणार
– अहमदाबादेत समुद्री संग्रहालय उभारणार
– संस्कृती रक्षणासाठी अभिमत विद्यापीठ सुरु करणार
– स्टार्ट अपसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करणार
– ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांसाठी 95 हजार कोटींची तरतूद
– कार्बन सोडणारे थर्मल प्लान्ट बंद करणार
– पर्यटन विभागासाठी 2500 कोटींची तरतूद
– स्वच्छ हवेसाठी 4 हजार 400 कोटींची तरतूद
– कंपनी कायद्यामध्ये काही दुरुस्त्या करू
– करदात्यांचा कसलाही छळ होणार नाही
– बँकांमधील नोकरभरतीत बदल होणार
– देशात कायद्यानुसार टॅक्स पेयर चार्टर आणणार
– टॅक्स भरणाऱ्यांच्या अडचणी दूर करणार
– राष्ट्रीय नोकरभरती संस्था सुरु करणार

– सर्व CAT संगणकाद्वारे घेतल्या जाणार
– कर चोरी करणाऱ्यांविरोधात कायदा आणणार

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.