किरण (Rays) | वारंवारता (Frequency) (Hz मध्ये) | तरंगलांबी (Wavelength) |
1.रेडिओ लहरी | 104 Hz | 1 मीटर ते103 मीटर |
2.सूक्ष्म लहरी (Microwave) | 108 Hz | 10−2 मीटर |
3. अवर क्त किरणे (Infrared) | 1012 Hz | 10−5 मीटर |
4. दृश्य प्रकाश (Visible Light) | 1015 Hz | 0.5 * 10−6 मीटर ( 400 ते 700) नॅनोमीटर |
5. अतिनील किरणे (Ultra Violet) | 1016 Hz | 10−8 मीटर (100 नॅनोमीटर ) |
पृथ्वीला ऊर्जा, उष्णता, व प्रकाश देण्याचे काम सूर्याचे असते. |
सूर्य केंद्रकीय संमीलनाद्वारे (Nuclear Fusion) द्वारे प्रचंड ऊर्जा तयार करतो त्यापैकी काही भाग पृथ्वीवर जाणवतो. |
या प्रकाशापैकी काही प्रकाशकिरणे हे आपल्या डोळ्याला दिसतात. तर उर्वरित किरणे डोळ्याला दिसत नाहीत. |
यानुसार विद्युत चुंबकीय किरणांच्या वारंवारतेनुसार आणि तरंगलांबीनूसार जो पट्टा तयार होतो त्यास विद्युत चुंबकीय पट्टा असे म्हणतात. |
1.रेडियो लहरी (Raio Waves)
विविध प्रेषकयंत्राचा (Transmitter) वापर करून रेडिओ लहरी तयार केल्या जातात.
उपयोग :
1. रेडिओ लहरी या कमी वारंवारता असलेल्या लहरी आहेत, बहुतांश याचा वापर दूरसंचारासाठी (कम्युनिकेशन) होतो.
2. रेडिओमध्ये FM आणि AM असे दोन प्रकार पडतात.
FM म्हणजे Frenquecy Modulation म्हणजेच वारंवारतेचे अपरिवर्तन होय. तसेच AM म्हणजे Amplitude Modulation म्हणजेच आयामाचे अपरिवर्तन होय.
3.रडार RADAR (Radio Detection and Ranging) यामध्ये रेडिओ लहरीचा वापर केला जातो.
दुष्परिणाम :
1. रेडिओ लहरीच्या जास्त वापरामुळे रक्ताचा कर्करोग (Leukamia) होण्याची भीती असते.
2. सूक्ष्म लहरी (Microwaves)
सूक्ष्म लहरींना उच्च वारवारता असणाऱ्या रेडिओ लहरी म्हणतात.
उपयोग :
1. सूक्ष्म लहरींद्वारे पाणी आणि मेद यांचे कंपन (Vibration) घडवून आणले जाते म्हणून पदार्थ गरम करण्यासाठी सूक्ष्मलहरींचा वापर केला जातो.
2. मोबाईल फोन सुद्धा सूक्ष्म लहरींचा वापर करतात.
3. सूक्ष्मलहरींचा उपयोग Traffic Speed Camera आणि रडार सारख्या यंत्रात केला जातो.
दुष्परिणाम:
1. जास्त काळ सूक्ष्म लहरींचा सामना केल्याने मोतीबिंदु (Cataract) हा रोग होऊ शकतो.
२.नुकत्याच संशोधनानुसार मोबाईलपासून येणाऱ्या सूक्ष्मलहरींमूळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
3.अवरक्त किरणे (Infrared Rays)
अवरक्त किरणे हे दृश्य प्रकाशाच्या लागूनच खाली येतात.
येथे Infra म्हणजे bellow आणि Red म्हणजे लाल होय.
साधारणत: अवरक्त किरणे हे बाहेर पडताना उष्मा उत्सर्जित करतात.
उपयोग :
1. Infra Red किरणाचा उपयोग रिमोट कंट्रोल मध्ये केला जातो.
2. तसेच फिजीओथेरपीस्ट रोग्यासाठी सांधेदखी, स्नायू दुखी यावर उपाय म्हणून जे Heat Lamp वापरतात त्यात इन्फ्रा Red किरणाचा उपयोग केला जातो.
3. रिमोट कंट्रोल च्या व्यतिरिक्त या किरणांचा उपयोग घर/ऑफिस सुरक्षिततेसाठी केला जातो. ज्याला Burglar Alarm असे म्हणतात. या यंत्राद्वारे शत्रूद्वारे उत्सर्जित केलेले Infra Red, Detect केले जातात.
4. विविध गोष्टी घेण्यासाठी Infrared Camera ची निर्मिती करण्यात आली आहे.
दुष्परिणाम :
1. अवरक्त किरणांचा जास्त दुष्परिणाम दिसून येत नाही, यामूळे व्यक्तीला उष्मा जाणवतो.
4.दृश्य प्रकाश (Visible Light)
“विद्युत चुंबकीय पटट्यापैकी आपल्या डोळ्याला दिसणारा प्रकाश म्हणजेच दृश्य प्रकाश होय.”
साधारण: शुभ्र प्रकाश हा सात रंगांनी बनलेला असतो.
उपयोग :
1.प्रत्येक रंगाचे विविध दैनंदिन उपयोग तुम्हाला माहिती आहेत.
2 Laser Printer मध्ये दृश्य प्रकाशाचा उपयोग करतात.
दुष्परिणाम:
1. जास्त प्रकाश हा डोळ्यातील दृश्यपटला (Retina) खराब करतो.
5. अतिनील किरणे (ULtraviolet Rays)
विशिष्ट दिव्यांद्वारे अतिनिल किरणांचा वापर करतात.
यालाच UV Rays असे म्हणतात.
उपयोग :
1. कमी प्रमाणात अतिनील किरणे घेतल्याने आपल्या शरीरात ड-जीवनसत्त्व तयार होण्यास मदत होते.
2. आपणास काही पदार्थ चकाकताना दिसतात. जसे की, रात्रीच्या वेळी प्रवास करताना दिशादर्शक बोर्डवरील चिन्हे. प्रकाशातील अतिनील किरणांमुळे चमकतात.
3. विविध त्वचा रोगासाठी अतिनील किरणांचा मारा करून तो कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
4. अतिनील किरणांपासून बनलेल्या लेझर बीमचा उपयोग करून DVD आणि CD यावरील माहिती वाचली जाते.
5. अतिनील किरणांमूळेच हेलियम वायू भरलेल्या Fluroscense चमकतात आणि शुभ्र प्रकाश देतात.
6. गमा किरणाबरोबरच अन्न-पदार्थ निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनील किरणांचा वापर केला जातो.
7. बोटाचे ठशे घेतल्यानंतर त्याची पडताळणी करण्यासाठी अतिनील किरणे वापरतात.
8. हॉस्पिटल, शस्त्रक्रियागृह तसेच औषध कंपनीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनिल किरणांचा वापर करतात.
दुष्परिणाम :
1. अतिनील किरण जर जास्त प्रमाणात डोळ्यावर पडली तर दृष्टीपटल (Retina) खराब होऊ शकतो.
2. काही गॉगल्स (चष्मा) UV Rays ला डोळ्यांपर्यंत पोहचू देत नाहीत. परंतू स्वस्त आणि हलक्या दर्जाचे गॉगल्स वापरल्याने जास्त अतिनील किरण डोळ्यात जातात. म्हणून स्वस्त आणि हलक्या दर्जाचे गॉगल्स वापरण्यापेक्षा गॉगल्स नाही वापरले तर कमी अतिनील किरणे डोळ्यास इजा पोहचवतील.
३. तसेच जास्त प्रखर अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.
6. क्ष-किरण (X-Rays)
याचा शोध रोन्टजेन या शास्त्रज्ञानी लावला.
क्ष-किरण हे जास्त वारंवारता असणारे, खप ऊर्जा वाहणारे किरण होय,
क्ष-किरण हे बहुतांश वस्तूंना भेदतात म्हणूनच याचा उपयोग वैद्यकशास्त्रात तसेच कारखान्यात केला जातो.
जर इलेक्ट्रॉन मारा ऊर्जेसहीत केला तर क्ष-किरण तयार होतात,
उपयोग :
1. क्ष-किरणांचा वापर बहुतांश रोगाच्या निदानासाठी केला जातो.
2. क्ष-किरणांचा शरीरावर मारा केल्यानंतर ते मृदू ऊतींना भेदतात परंतू हाडाना न भेदता त्यांची प्रत तयार करतात.
3. तसेच कमी ऊर्जा असणारे क्ष-किरण हे मृदू अवयवाचे Film तयार करण्यासाठी वापरतात. उदा. क्षयरोगात फुप्फुसाचा X-Ray
4. तसेच काही वेळा डॉक्टर रोग्याला बेरिअम सस्फेट असलेले द्रावण पिण्यास देतात, जे की क्ष-किरणांना शोषून घेते.
या पद्धतीचा वापर आतड्याची पाहणी करण्यासाठी करतात.
5. तसेच रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळ या ठिकाणी सुरक्षा म्हणून बॅग्ज न खोलता आतील सामान पाहण्यासाठी क्ष-किरणांचा वापर करतात.
6. तसेच शुद्ध व अशुद्ध हिरे ओळखण्यासाठी क्ष-किरणांचा वापर केला जातो.
दुष्परिणाम
1. क्ष-किरणांच्या अति वापरामुळे कर्करोग होऊ शकतो.
7. गॅमा किरण (Gamma Rays)
गॅमा किरण हे अतिशय जास्त वारंवारता आणि खूपच जास्त ऊर्जा वाहणारे किरण आहेत.
उपयोग :
1. गॅमा किरणांचा उपयोग करून जीवंत पेशींना मारता येते. म्हणन कर्करोगातील पेशींना मारण्यासाठी यांचा वापर करतात. यालाच Radiotherapy असे म्हणतात.
2. अन्न पदार्थाचे निजंतुकीकरण करण्यासाठी गॅमा किरणांचा वापर केला जातो.
Cosmic Rays म्हणजे काय?
Cosmic Rays हे खूपच भेदनकारक अतिशय ऊर्जा असलेले किरण आहेत, जे की पृथ्वीच्या बाहेरील वातावरणातून येतात.
प्रत्येक सेकंदाला 10 18 Cosmic Rays पृथ्वीवर पाहोचतात ज्यात 10 9 to 10 18 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असते.
इलस्टर आणि गैटाल या शास्त्रज्ञांनी 1899 मध्ये या किरणांचा शोध लावला.