महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात हिंगोली जिल्हा आहे.
परभणी जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1999 ला महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर हिंगोली हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.
धार्मिक जनांची अनेक श्रध्दास्थाने जपणारा हा जिल्हा आहे. याला संत नामदेवाचा जिल्हा संबोधल्या जाते.
विभाग | औरंगाबाद |
मुख्यालय | हिंगोली |
तहसील | हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमतनगर |
क्षेत्र | 4,526 km2 (1,747 sq mi) |
भाषा | मराठी, हिंदी, उर्दू |
प्रमुख पिके | कापूस, ज्वारी |
तालुके | 5 – हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी |
उपविभाग | ३ कळमनुरी हिंगोली बसमत |
पिनकोड | औंध नागनाथ – 431705 बासमथ – 431512 हिंगोली – 431513 कळमनुरी – 431702 सेनगाव – 431542 |
दूरध्वनी कोड | औंध नागनाथ – 02456 बसमथ – 02454 हिंगोली – 02456 कळमनुरी – 02455 सेनगाव – 02456 |
नद्या | पैनगंगा, गोदावरी, सिंधेश्वर |
पर्यटन स्थळ | संत नामदेव संस्थान, मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर, औंध नागनाथ |
सीमा | उत्तरेस बुलढाणा व वाशिम हे दोन जिल्हे, पूर्वेस नांदेड व यवतमाळ हे दोन जिल्हे, दक्षिणेस नांदेड व परभणी हे दोन जिल्हे, पश्चिमेस परभणी व जालना हे दोन जिल्हे आहेत. |
वेबसाईट | hingoli.nic.in |
हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
- हिंगोली – हिंगोली येथे जनावरचा मोठा दवाखाना आहे. येथील दसरा महोत्सव प्रसिध्द आहे.
- वसमत – येथे प्लायवूडचा कारखाना आहे. येथे हातमागावरील व यंत्रमागावरील कापडाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते.
- औंढा नागनाथ – हे स्थान देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाते. येथे संत नामदेव व त्यांचे गुरु विठोबा खेचर यांच्या समाध्या आहेत.
- येलदरी – या ठिकाणी वीजनिर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे.
- नरसी – येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिध्द आहे. हे संत नामदेवाचे जन्मस्थान मानले जाते.
- शिरडशहापूर – येथील जैन मंदिर प्रसिध्द आहे.
- भाटेगाव – कळमनुरी तालुक्यात मत्स्यबीज केंद्र आहे.
हिंगोली जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- हिंगोली जिल्ह्यातील नरसी हे ठिकाण संत नामदेवांचे जन्मस्थान मानले जाते.
- हिंगोली जिल्ह्यात सिध्देश्वर व येलदरी येथे पूर्णा नदीवर धरणे बाधण्यात आली आहेत.
- औरंगाबाद प्रशासकीय विभागास मराठवाडा म्हटले जाते.
- मराठवाड्यात 8 जिल्हे आहेत.
- मराठवाडयातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – बीड
- मराठवाडयातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – हिंगोली
- मराठवाडयातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा – औरंगाबाद
हिंगोली जिल्हा नकाशा
हिंगोली जिल्ह्याचा मोठा नकाशा डाउनलोड करा
FAQs
हिंगोलीत किती तालुके आहेत
५ – हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी