भारतातील पहिली वॉटर टॅक्सी - मुंबई
भारतातील पहिली वॉटर टॅक्सी - मुंबई

देशातील पहिली वॉटर-टॅक्सी सेवा मुंबईत सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीमध्ये या सेवेचा औपचारिक शुभारंभ होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट (MbPT), शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (MMB) यांचा संयुक्त उपक्रम आहे.

=> मबई बंदर प्राधिकरण (MbPA)ने जलमार्ग टॅक्सी सेवा सुरु केली असून, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वांनंद सोनोवाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी 2022 रोजी आभासी पद्धतीने या सेवेचे उद्‌घाटन झाले.

भारतातील पहिली वॉटर टॅक्सी - मुंबई
भारतातील पहिली वॉटर टॅक्सी – मुंबई

=> सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईला बेलापूर येथे अत्याधुनिक जेट्टी मिळाली आहे.

=> कद्र सरकार आणि राज्य यांचा समसमान वाटा असलेल्या 8.37 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची मुंबई मेरिटाईम बोर्डाने यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

=> परकल्पाची सुरुवात जानेवारी 2019 मध्ये झाली होती आणि सप्टेंबर 2021 पर्यन्त हा प्रकल्प पूर्ण झाला.

=> यामुळे देशांतर्गत क्रूझ टर्मिनल दरम्यानच्या जलमार्ग टॅक्सी सेवेमुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई दरम्यानचा साधारण दीड तासांचा प्रवासाचा वेळ, अर्ध्या तासापर्यंत कमी झाला आहे; या सेवेमुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल आणि मुंबई बंदराचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यास प्रोत्साहन मिळेल.

FAQs

भारतातील पहिली वॉटर-टॅक्सी सेवा कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश आयोजित करणार आहे?

महाराष्ट्र. देशातील पहिली वॉटर-टॅक्सी सेवा मुंबईत सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीमध्ये या सेवेचा औपचारिक शुभारंभ होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट (MbPT), शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (MMB) यांचा संयुक्त उपक्रम आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.