J._Michael_Lane
J._Michael_Lane
BornJohn Michael Lane
February 14, 1936
Boston, Massachusetts, U.S.
DiedOctober 21, 2020 (aged 84)
Atlanta, Georgia, U.S.
Known forGlobal efforts to eradicate smallpox
 • देवी रोग हा ‘करोना’पेक्षाही घातक होता. देवीने लाखो बळी घेतले होते. पण आता हा रोग पूर्ण नष्ट झाला आहे.
 • त्या रोगाचे उच्चाटन करण्याची लढाई लढणाऱ्या साथरोग तज्ज्ञांपैकी एक म्हणजे डॉ. जे. मायकेल लेन. डॉ. लेन यांचे अमेरिकेतील अ‍ॅटलांटा येथील निवासस्थानी नुकतेच निधन झाले.
 • देवी रोग निर्मूलन संस्थेचे ते शेवटचे संचालक. देवी रोगाचा शेवटचा रुग्ण सोमालियात १९७७ मध्ये सापडला.
 • त्यानंतर हा रोगही संपला. वैद्यकीय हस्तक्षेपातून एखादा साथरोग आटोक्यात आणण्याचे ते पहिलेच उदाहरण. देवी रोग व्हॅरिओला विषाणूमुळे होत असे. त्यात किमान एकतृतीयांश रुग्ण दगावत.
 • ब्रिटिश वैज्ञानिक एडवर्ड जेन्नर यांनी त्यावर लस शोधून काढली. अमेरिकेत देवी रोगाचा शेवटचा उद्रेक १९४९ मध्ये झाला, तर डॉ. लेन हे साथरोग माहिती सेवेत १९६३ मध्ये दाखल झाले.
 • तरुण, महत्त्वाकांक्षी व आशावादी अशा या तरुणाने त्या काळात देवी रोगाला आटोक्यात आणण्यात चांगले काम केले. सरसकट सगळ्यांना लस टोचत बसण्यापेक्षा साखळी पद्धतीने लसीकरण करण्याची एक पद्धत त्या काळी होती
 • त्यात डॉ. लेन यांनी पुढाकार घेऊन जिथे साथ असेल तिथे प्रत्यक्ष जाऊन काम केले. त्यामुळे थेट संपर्कव्यक्ती शोधल्या जाऊन त्यांना लस दिली गेली. लसीकरणाचे महत्त्व डॉ. लेन यांनी आदिवासी, धार्मिक नेते, ग्रामीण लोक यांना पटवून दिले. त्यामुळे त्यात साथरोग नियंत्रणातील सामाजिक प्रयत्नांचे महत्त्वही अधोरेखित झाले.
 • १९८० मध्ये जग देवी रोगापासून मुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. लेन यांचा जन्म बोस्टनचा. त्यांच्या आईचेच नाव त्यांनी लावले. बौद्धिक व सामाजिक वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यांचे कुटुंब समाजवादी होते.
 • येल विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांनी सार्वजनिक आरोग्यात कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी घेतली. त्यांना पक्षिनिरीक्षण, ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग यात रस होता.
 • देवी रोगाचा प्रसार कमी झाल्यानंतरही अमेरिकेत लस टोचली जात होती त्याला मात्र त्यांनी विरोध केला. कारण त्याचे काहीच प्रयोजन नव्हते. त्यातून लसीकरण १९७२ मध्ये थांबवण्यात आले.
 • मात्र १९७३ पासून जागतिक आरोग्य संघटना व अन्य संस्थांमार्फत ‘देवीचा रोगी कळवा आणि १००० रु. मिळवा’ असे अभियान चालवण्यात आले.
 • १९८७ पर्यंत ते साथरोग संस्थेचे संचालक होते. देवी रोगाचे विषाणू अजूनही अमेरिका व रशियात प्रयोगशाळेत ठेवण्यात आले आहेत त्यालाही त्यांचा विरोध होता, कारण त्याचा वापर जैवयुद्धात केला जाऊ शकतो.
 • त्यामुळे कठीण काळात दीपस्तंभाप्रमाणे उभा राहणारा एक जागरूक व नैतिकता असलेला वैज्ञानिक व साथरोगतज्ज्ञ आपण गमावला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.