लातूर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. लातूर शहर जिल्हा मुख्यालय आहे आणि हे महाराष्ट्र राज्यातील 16 वे सर्वात मोठे शहर आहे. जिल्हा हा प्रामुख्याने शेती आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून 16 ऑगस्ट 1982 ला स्वतंत्र ‘लातूर’ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
पुरातनकाळात लातूरला सत्पुर, श्रीपूर, रत्नापूर अशी नवे होती. कालांतराने त्याचा लोप होऊन लातूर हे नाव पडले असावे. पेशवाईमध्ये ‘लातूरी नाणे’ चलनात होते.
‘लातूर पॅटर्न’ मुळे शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी क्रांती घडून आली.
विभाग | औरंगाबाद विभाग |
मुख्यालय | लातूर |
क्षेत्र | 7,157 km2 (2,763 sq mi) |
स्थापना | 16/08/1982 |
उप विभाग | लातूर निलंगा उदगीर औसा-रेणापूर अहमदपूर |
तालुका | 10 – लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, चाकूर, देवणी, शिरूर-अनंदपाळ, जळकोट, रेणापुर. |
पिनकोड | लातूर – 413512,413531 अहमदपूर – 413515 औसा – 413520 उदगीर – 413517 चाकूर – 413513 जळकोट – 413532 निलंगा -413521 देवानी – 413519 शिरूरअनंतपाल – 413544 रेणापूर -413527 |
दूरध्वनी कोड | लातूर – 02382 अहमदपूर – 02381 औसा – 02383 उदगीर – 02385 चाकूर – 02381 जळकोट – 02385 निलंगा – 02384 देवानी -02385 शिरूरअनंतपाल – 02384 रेणापूर – 02382 |
नद्या | मांजरा नदी, सीना नदी, तेरणा नदी |
पिके | तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्ये, हरभरा, तूर (कबूतर वाटाणे), हरभरा, काळा हरभरा, इतर डाळी, एकूण डाळी, एकूण धान्य, ऊस कापूस, भुईमूग, कुसुमा, |
आर ति ओ कोड | MH24 |
महामार्ग | NH-363, NH-61 |
पर्यटन स्थळे | वृंदावन पार्क चाकूर उदगीर किल्ला सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर लातूर औसा किल्ला उदगीर हत्तीबेट-देवरजन सुरत शावली दर्गा लातूर जगदंबा माता मंदिर गंजगोलाई श्री केशव बालाजी मंदिर श्री विराट हनुमान मंदिर बुद्ध गार्डन मंदिर खारोजा लेणी |
शेजारी जिल्हे | उत्तरेस परभणी आणि पूर्वेस परभणी जिल्हा असून पूर्वेस व उत्तरेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस व पश्चिमेस उस्मानाबाद जिल्हा, वायव्येस बीड जिल्हा असून आग्नेयेस कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा आहे. |
वेबसाईट | https://latur.gov.in/ |
लातूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
- लातूर – हे शहर मराठवाड्यातील ‘विधेचे माहेरघर’ गणले जाते. येथील सुरताशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर व पार्श्वनाथ मंदिर प्रसिद्ध आहेत.
- उद्गीर – उदगीरचा यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
- ओस – औरंगजेबाने बाधलेली मास्जिद प्रसिद्ध आहे.
- खरोसा – हे गाव हिंदू व बौद्ध लेण्यासाठी प्रसिद्ध आहे.
- रेणापुर – येथील रेणुकादेवीचे मंदिर व हलती दीपमाळ प्रसिद्ध आहे.
- वडवळ – अहमदपूर तालुक्यातील या गावालगत औषधी वनस्पती असलेली टेकडी आहे.
- निलंगा – नीलकंठश्वरचे प्रसिद्ध मंदिर व दूधभुकटीचा कारखाना.
- हत्ती बेट – हतीच्या आकाराचा हा डोंगर ‘हत्ती बेट’ म्हणून प्रसिद्ध आहे. डोंगरावर हत्तीच्या आकाराचे भरपूर दगड, प.पू. गंगाराम महाराजांचे समाधीस्थान आहे.
लातूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी – मांजरा नदी.
- लातूर हे शहर मराठवाड्यातील विधेचे माहेर घर गणले जाते.
- लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग एकही नाही.
- लातूर जिल्ह्यातील देवणी, शिरूर-अनंतपाळ व जळकोट हे तीन तालुके 26 जून 1999 पासून अस्तित्वात आली.
- 30 सप्टेंबर 1993 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर व लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावांना भूकंपामुळे फार मोठ्या संकटाला तोंड धावे लागले.
- सूर्यफुलाच्या उत्पादनात आशिया खंडात लातूर जिल्ह्यात पहिला क्रमांक आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत भारतामध्ये आघाडीवर आहे.
लातूर जिल्हा नकाशा
FAQs
लातूर जिल्ह्यात किती तालुके आहेत
10 – लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, चाकूर, देवणी, शिरूर-अनंदपाळ, जळकोट, रेणापूर