लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) - https://www.mpsctoday.com/
लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५)

लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला.

कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत.

व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता.

१८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझामलेरियाची साथ पसरली.

दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्रगुजरातमध्ये होती.

दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली.

१९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला.

१९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला.

कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता.

1902 मध्ये प्रत्येक प्रांतातील पोलिस प्रशासनाची तपासणी करण्यासाठी ‘अँड्रयू फ्रेझर’ च्या अध्यक्षतेखाली
एक आयोग नियुक्त करण्यात आला.

1902 मध्ये एक विद्यापीठ आयोग स्थापन करण्यात आला. त्याआधारावर 1904 चा भारतीय विश्व विद्यालय
कायदा केला.

1904 मध्ये सहकारी पतसंस्था कायदा संमत करुन शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.

वाणिज्य व उद्योग विभाग स्थापन करण्यात आला.

1899 मध्ये भारतीय टंकण व पत्रमुद्रा अधिनियम संमत करुन इंग्लंडचा पौंड भारतात अधिकृत करण्यात आला.

1899 साली कलकत्ता महापालिका कायदा करण्यात आला.

1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा केला.

1905 साली बंगालची फाळणी केली.

1911 साली बंगालची फाळणी रद्द झाली.

1903 साली कर्नल यंगहजबंड यांस तिबेटमध्ये पाठविले.

कर्झनने नवा वायव्य सरहद प्रांत निर्माण केला.

१८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले.

पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली .

कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली.

१९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला.

१९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली.

१९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला.

१९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला.

कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले.

त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला.

त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय.

तिचा मुख्य उद्देश

प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता.

सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले.

कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या.

त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात.

लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.

कर्झनच्या शेती सुधारणा

१९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली.

१९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली.

त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली.

बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.

सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला.

कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले.

रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली.

कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले.

ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.

कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.