रिपनच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे लॉर्ड डफरिनची व्हाइसरॉयपदी नियुक्ती झाली.
डफरिनच्या काळात उत्तर ब्रम्हदेश जिंकून संपूर्ण ब्रम्हदेश (१८८६) इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला.
मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले जावे म्हणून व्हाइसरॉयने चार्ल्स ऍचीसन समिती नेमली.
चार्ल्स ऍचीसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग (पब्लिक सर्व्हिस कमिशन)ची स्थापना झाली.
१८८७ मध्ये चार्ल्स ऍचीसनने लोकसेवा आयोगाच्या शिफारशी (अहवाल) सादर केल्या.
डफरिनच्या काळात ऍलन ह्यूम (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी) ने इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला.
डिसेंबर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली.
लॉर्ड डफरिनने इंपेरियल सर्व्हिस क्रॉप्सची स्थापना केली.
बंगाल, पंजाब, औंधमध्ये नवीन कुळकायदे व कुळासाठी अधिक उदार धोरण स्वीकारले.