पूर्ण नाव | माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन |
जन्म | ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ डुंबार्टनशायर, स्कॉटलंड |
मृत्यू | २० नोव्हेंबर, इ.स. १८५९ सरे, इंग्लंड |
Nationality | British |
यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ रोजी झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला लागले.
तिथे त्यांचे काका संचालक होते.
इ.स. १७९६ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुय्यम पदावर नियुक्त केले.
बनारसचे (आताचे वाराणसी) मॅजिस्ट्रेट डेव्हिसयाचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले.
इ.स. १७९९ मध्ये कंपनी सरकारने अवधचा नवाब वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात ब्रिटिश लोकांची कत्तल करण्यास सुरु झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.
इ.स. १८०१ मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.
एल्फिन्स्टन सरे (इंग्लंड) येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी मरण पावला. आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार ही उपाधी एल्फिन्स्टनला लावली, तर अतिशयोक्ती होणार नाही. नोकरीत प्रवेश केल्यानंतर त्याने सतत वाचनाने व अभ्यासाने आपली बौद्धिक पातळी उंचावली आणि ग्रीक, रोमन, फार्सी आदी भाषांची ज्ञानोपासना केली. काही ग्रंथांचे समीक्षणही त्याने आपल्या खासगी रोजनिशीमध्ये करून ठेवले आहे. दुर्दैवाने त्याची बरीच कागदपत्रे आणि पुस्तके १८१७ साली पुणे येथील संगम रेसिडेन्सी बंगल्याला लागलेल्या आगीत नष्ट झाली. एक श्रेष्ठ प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार म्हणून भारतीय इतिहासात त्यास एक विशेष स्थान आहे.