उस्मानाबाद जिल्हा (Osmanabad District)
उस्मानाबाद जिल्हा (Osmanabad District)

उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा भागातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद येथे आहे.

उस्मानाबादचे पूर्वीचे नाव ‘धाराशीव’ असे होते. 1910 मध्ये तत्कालीन निजाम मीर-उस्मानअली याने या शहरास स्वत:चे नाव दिले. तेव्हापासून हे शहर ‘उस्मानाबाद’ म्हणून ओळखले जाते.

 उस्मानाबाद हा जिल्हा प्राचीन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. कुंथलगिरीची नैन लेणी, चांभार लेणी व धाराशीवलेणी या लेण्या प्रसिद्ध आहेत.

 या जिल्ह्यातील तेर येथे उत्खननात रोमन संस्कृतीशी जुळणार्‍या वस्तु सापडल्या. यावरून प्राचीन धाराशीवचा ग्रीक व रोमन संस्कृतीशी संबंध असावा.

प्रशासकीय विभागऔरंगाबाद विभाग (मराठवाडा)
मुख्यालय उस्मानाबाद शहर 
क्षेत्र 7569.00 चौ कि 
तालुके 8 परांडा, भूम, उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, उमरगा, वाशी, लोहारा.
तहसील ८ : उस्मानाबाद तुळजापूर उमरगा लोहारा कळंब वाशी भूम परंडा
पिनकोड 1, उस्मानाबाद, 02472, 413501. 2, भूम मीटर, 02478, 413504. 3,कळंब , 02473, 413507. 4, परांडा, 02477, 413502.
दूरध्वनी कोड 
 02472 
आर टी ओ कोड MH-25
प्रमुख नद्या  भोगावती नदी, सीना नदी 
प्रमुख पिके 
तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, इतर तृणधान्ये, एकूण तृणधान्ये, हरभरा, तूर, इतर डाळी, ऊस, कापूस, सोयाबीन, भुईमूग, कार्डी,
पर्यटन स्थळे 
श्री तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर,
नलदुर्ग किल्ला धाराशिव लेणी परांडा दुर्ग  तेर  तगार 
सीमाउत्तरेस बीड जिल्हा, पूर्वेस लातूर जिल्हा, दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस सोलापूर जिल्हा, वायव्येस अहमदनगर जिल्हा आहे.
वेबसाईट  osmanabad.gov.in

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख स्थळे

उस्मानाबाद जिल्हा (Osmanabad District)
उस्मानाबाद जिल्हा (Osmanabad District)
  • उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील हजरत ख्याजा शम्सुद्दीन गाझीचा दर्गा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
  • तुळजापूर – महाराष्ट्रचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी किंवा भवानी मातेच्या मंदिरामुळे राज्यात प्रसिद्ध.
  • नळदुर्ग – हे ठिकाण भुईकोट किल्यामुळे प्रसिद्ध आहे. ‘पाणी महल’ हे नळदुर्गाच्या किल्यातील प्रमुख आकर्षण आहे.
  • तेरणा – तेरणा हे ऐतिहासिक गाव बौद्धकालीन स्तूप व संत गोरा कुंभाराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
  • परांडा – एकेकाळची निजामशाहीची राजधानी. ऐतिहासिक किल्ला व संतकवी हंसराज स्वामीचा मठ.
  • डोणगाव – रामदास स्वामीचे पट्टाशिष्य कल्याणस्वामी यांचा मठ व ख्वाजा बद्रुद्दीन साहेबांचा दर्गा यासाठी प्रसिद्ध.

उस्मानाबाद जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • तेर वस्तुसंग्राहालय कोणत्या जिल्हयात आहे? – उस्मानाबाद
  • उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणकोणत्या नाद्या वाहतात? – गिरणा, सिना, मांजरा, तेरणा, बोरी, लावरज
  • उस्मानाबाद जिल्हयामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा कोणत्या? – उस्मानाबाद, उमरण, तुळजापूर, कळंब
  • उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या औधोगिक वसाहती आहेत? – उस्मानाबाद, भूम, कळंब
  • उस्मानाबाद जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी किती? – मिरज-लातूर (नॅरोगेज), 30 कि.मी.
  • उस्मानाबाद जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते कोणते? – पुणे-सोलापूर-हैद्राबाद (क्र.9)

उस्मानाबाद जिल्हा नकाशा

उस्मानाबाद जिल्हा नकाशा
उस्मानाबाद जिल्हा नकाशा

FAQs

उस्मानाबाद जिल्ह्यात किती तालुके आहेत?

8 – परंडा, भूम, उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, उमरगा, वाशी, लोहारा