परभणी जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय परभणी आहे. हा जिल्हा मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी एक आहे.
परभणी पूर्वी “प्रभावतीनगर” म्हणून ओळखले जात असे. जिल्हयाच्या उत्तरेला हिंगोली, पुर्वेला नांदेड, दक्षिणेला लातुर आणि पश्चिमेला बीड आणि जालना जिल्हा आहे.
या शहरात प्रभावती देवीचे प्राचीन मंदिर आहे, या देवीच्या नावावरूनच या शहराचे परभणी हे नाव पडले. जिल्हा निजामानंतर मुंबई प्रांताचा आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याचा घटक बनला.
संत जनाबाईचा जन्म याच जिल्ह्यातील गंगाखेड येथे झाला होता.
विभाग | औरंगाबाद विभाग |
क्षेत्र | 6,511.58 km2 (2,514.14 sq mi) |
मुख्यालय | परभणी |
तालुके | 9 – जिंतूर, पाथ्री, परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत |
तहसील | १. परभणी, २. गंगाखेड, 3. सोनपेठ, 4. पाथरी, 5. मानवत, 6. पालम, 7. साईलू, 8. जिंतूर, 9. पूर्णा |
महामार्ग | NH 222 |
जिल्हयातील मुख्य भाषा | मराठी |
एकुण गावं | 848 |
साक्षरतेचे प्रमाण | 77.75% |
Sex Ratio | 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 958 |
नद्या | गोदावरी, पूर्णा, दुधना |
पिके | ज्वारी, बाजरा, कापूस, ऊस |
पर्यटन स्थळे | श्री मृत्युंजय परदेश्वर महादेव मंदिर उगडा महादेव मंदिर त्रिधार श्रीशेकत्र |
सीमा | उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर व बीड हे दोन जिल्हे, पश्चिमेस बीड व जालना हे दोन जिल्हे आहेत. |
वेबसाईट | https://parbhani.gov.in/ |
परभणी जिल्हयातील तालुके
परभणी जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत
- परभणी
- गंगाखेड
- सोनपेठ
- पाथरी
- मानवत (या तालुक्याचे पुर्वीचे नाव मणिपुर असे होते)
- पालम
- सेलु
- जिंतुर
- पुर्णा
परभणी जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
- परभणी – मराठवाडा कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण आहे. येथील शिवाजी उधान प्रेक्षणीय असून येथील रोशनखान गाढीही प्रसिद्ध आहे.
- मानवत – मानवत ही कापडाची मोठी बाजारपेठ आहे.
- गंगाखेड – तालुक्याचे मुख्य ठिकाण ‘दक्षिण काशी’ नावाने ओळखले जाते. येथे संत जनाबाईची समाधी आहे.
- चारगणा – जिंतुर तालुक्यात दगडी झुलता मनोरा आहे.
- जिंतुर – तालुक्याचे ठिकाण . येथील गुहा व जैन शिल्पे प्रसिध्द.
- पूर्णा – पूर्णा व गोदावरी या दोन नद्यांचा संगम.
- जांभूळभेट – मोरसाठी प्रसिध्द.
परभणी जिल्ह्याची वैशिष्ट्ये:
- परभणी जिल्ह्यातून कोणत्या नद्या वाहतात ? गोदावरी, पूर्णा, पैनगंगा, दूधणा
- मराठवाडा कृषि विद्यापीठ कोठे आहे? परभणी
- परभणी जिल्ह्यामध्ये प्रमुख ओद्योगिक उत्पादन कोणते? साखर, हातमाग, कापड, कातडी कसावणे.
- परभणी जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी किती ? मनमाड-काचीकुडा (मिटरगेज), परळी-परभणी (मिटरगेज), पूर्णा-हिंगोली-अकोला (मिटरगेज)
परभणी जिल्हा नकाशा
परभणी जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती
- लोकसंख्या (Population) 18,36,086
- क्षेत्रफळ 6,250.58 वर्ग कि.मी.
- जिल्हयातील मुख्य भाषा मराठी
- एकुण गावं 848
- साक्षरतेचे प्रमाण 77.75%
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 958
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 हा या जिल्हयातुन गेला आहे.
- परभणीत मराठवाडा कृषी विद्यापिठ असुन याचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ असे आहे.
- शिर्डीच्या साईबाबांचा जन्म याच जिल्हयातल्या पाथरी गावचा.
- शहराजवळ दत्तधाम हे दत्तपीठ आहे.
- नर्साी चे नामदेव महाराज, गंगाखेड येथील संत जनाबाई, बोरी चे गणिती भास्कराचार्य याच जिल्हयातले.
- राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराज जिंतुर तालुक्यात पाचलेगांव या ठिकाणी जन्माला आले.
- हजरत शाह तुराबुल हक दरगाह नावाचा मुस्लिम संतांचा मकबरा परभणी मधे आहे.
- जिंतुर तालुक्यात जैन धर्माच्या निमगिरी नावाच्या गुफा आहेत.
FAQs
परभणीत किती वॉर्ड आहेत?
परभणी महापालिकेत एकूण ६५ प्रभाग आहेत.