नामाऐवजी वापरल्या जाणा-या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनामाचे खालील प्रकार पडतात:
Personal pronouns : पुरुषवाचक सर्वनामे
नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामे वापरतात
पुरूषवाचक सर्वनामे इंग्रजीत एकूण आठ आहेत
Pronouns
I – मी एकवचन
He – तो एकवचन
She – ती एकवचन
It – ते एकवचन
You – तू एकवचन
You – तुम्ही अनेकवचन
They – ते,त्या,ती अनेकवचन
We – आम्ही अनेकवचन
Example: Ram was a king. He was very brave
Reflexive pronouns : आत्मवाचक सर्वनामे
कर्त्याने केलेली कृती त्याचा स्वत: वरच घडत असेल तर ती आत्मवाचक सर्वनामे दर्शवितात. अशा प्रकारच्या वाक्यात कर्ता व कर्म यांच्यसाठी वापरलेली सर्वनाम एकाच व्यक्तीसाठी असतात. आत्मवाचक सर्वनाम पूर्व उल्लेख असल्याशिवाय वापरता येत नाही म्हणून पूर्व उल्लेख नसताना myself,himself अशी सुरुवात न करता I myself, He himself अशी सुरुवात करावी
Demonstrative pronouns : दर्शक सर्वनामे
व्यक्ती किंवा वस्तूंचा निर्देश करण्यासाठी दर्शक सर्वनामे वापरतात.
Singular: This –these
Plural: That-those
Eample:
- This is a boy. These are boys
- That is a car . Those are cars
Indefinite Pronouns : अनिश्चित सर्वनामे
अनिच्छीत व्यकती किंवा वस्तू दर्शविण्या-या सर्वनामांना अनिच्छित सर्वनामे म्हणतात.
Example:
All, some, few, everyone, everybody, none, nobody, many, anyone, someone
- All were present.
- Some one has stolen my necklace
Interrogative pronouns : प्रश्नार्थक सर्वनामे
Interrogative pronouns : प्रश्नार्थक सर्वनामे
Who,whom,which, आणि what चा पावर प्रश्न विचारण्यासाठी केला असता उत्तर जर एखादे नाम येत असेल तर वरील प्रश्नसुचक शब्द प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.
Example:
- Who killed Ravana?
- Whose Lanka is this?
- What is your name?
Distributive Pronouns : विभाजक सर्वनामे
एका वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी विभाजक सर्वनामाचा उपयोग हातो
Eg. Each-प्रत्येक , either–दोन्ही पैकी एक, neither-दोन्हीपैकी एकही नाही.
- Each of the boys gets a prize
- Either of these roads leads to the railway station
- Neither of the girls is honest
Relative Pronouns : संबंधी सर्वनामे
Preposition नंतर Relative Pronoun वापरावयाचे झाल्यास
वयक्तीसाठी Whom
तर
वस्तू व प्राण्यांसाठी Which वापरतात.
Eample:
- This is the girl to whom I have given some clothes.
- This is the hostel in which I spent four years when I was in college.
Exclamatory Pronouns : उद्गारवाचक सर्वनामे
उद्गार दर्शविणा-या सर्वनामांना उदगारवाचक सर्वनामे असे म्हणतात.
Eg. What! Are you hungry
Emphatic Pronouns : परिणामकारी सर्वनामे.
आत्मवाचक व परिणामकारी सर्वनाम एकच आहेत. ज्या वेळी कर्त्याने स्वत: क्रूती केली हे जोर देऊन सांगितले जाते तेव्हा ते परिणामकारी सर्वनाम होते. परिणामकारी सर्वनामे नेहमी नाम किंवा सर्वनामानंतरच वापरली जातात.
Example:
- He himself said so
- This town itself is not very large
Reciprocal pronoun : परस्पर संबंधदर्शक सर्वनाम
जी सर्वनामे परस्पर संबंध दर्शवितात त्यांना Reciprocal pronoun म्हणतात. Reciprocal pronouns express a mutual or reciprocated relationship.
Each other: दोन व्यक्ती किंवा वस्तू यातील परस्पर संबंध दर्शविण्यासाठी
One another: दोन पेक्षा अधिक व्यक्ती अगर वस्तूंचा परस्पर संबंध दर्शविण्यासाठी
Example:
- The two girls hated each other
- We must all trust one another.
- They meet regurarly at each other’s house.