सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना

योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी योजना सुरू केली

उद्देश

मुलींच्या संदर्भात कुटुंबाच्या दृष्टिकोन बदलणे त्याचबरोबर मुलीच्या नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडणे

मुलींच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहविषयक आर्थिक गरजा भागविणे

सुकन्या समृद्धी योजना हरियाणातील पानिपत मध्ये

BBBP योजनेबरोबर सुरू करण्यात आली असून SSY ही BBBP योजनेचाच एक भाग आहे

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली साठी बँक खाते उघडले जाणार आहे हे खाते न्यूनतम 1000 रुपयात उघडता येते

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खात्यातील जमेवर

9.1% व्याज दिले जाईल या खात्यातील रकमेवर उत्पन्न करातून सूट देण्यात आली आहे

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत व्यापारी बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाती उघडली जातील या खात्यांमध्ये एका वर्षात 1.5 लाखापर्यंत रक्कम जमा केली जाऊ शकते

सुकन्या समृद्धी योजनेतील 50% रक्कम मुलीच्या वयाच्या अठरा वर्षानंतर व उर्वरित रक्कम 21 वर्षानंतर काढता येऊ शकते

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत एक पालक आपल्या केवळ दोन मुलींकरिता हे खाते उघडू शकतो आणि दोघींचा खात्यात एका वर्षात 1.50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाही

मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्या झाल्यास तीन मुलींकरिता हे खाते उघडले जाऊ शकते

सुकन्या समृद्धी योजना ही योजना मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे

सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे पासबुक काढताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे

  • मुलीचा जन्म दाखला
  • ओळखपत्र
  • निवासी दाखला

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या परिपक्वते नंतर यामध्ये जमा झालेली रक्कम ही संबंधित मुलीच्या मालकीची असते

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत भारतात हे खाते कुठेही काढता येऊ शकते  तसेच सोयीनुसार खाते कुठेही स्थानांतरित करता येऊ शकते

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातेधारक मुलगी वयाच्या दहा वर्षानंतर स्वतःची आपले खाते हाताळू शकते

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत किमान एक हजार रुपये दर वर्षी न भरू शकल्यास त्यासाठी पन्नास रुपये दंड आकारला जाईल मात्र दंडाच्या रकमेसह 14 वर्षांपर्यंत कधी ही हे खाते पुन्हा सुरू करण्याची यामध्ये तरतूद आहे

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींच्या पालकांना मुलीच्या जन्मानंतर वयाच्या 10 वर्षांपर्यंत हे खाते  केव्हाही उघडता येऊ शकते

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ज्या मुलीच्या नावे खाते आहे ती मुलगी देशातील कोणत्याही भागात केली तर तिचे खाते तिथे हस्तांतरित करता येते

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे नावे खाते उघडल्यानंतर भरलेली रक्कम मुलगी 14 वर्षांची होईपर्यंत ठेवणे बंधनकारक राहील

सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्याच्या एक वर्ष अगोदर ज्या मुली 10 वर्षाच्या झाल्या आहेत अशा मुलीही या योजनेस पात्र ठरतील

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.