डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड
(इ.स. १८२४ – मे ३१, इ.स. १८७४) हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. लाडांचा जन्म १८२4 साली तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते. बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक … Read more