ईश्वरचंद्र विद्यासागर
ईश्वरचंद्र विद्यासागर

जन्म: २६ सप्टेंबर १८२० बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी

मृत्यू: २९ जुलै १८९१

बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक.

१८३९ साली हिंदुधर्मशास्त्रविषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे ‘विद्यासागर’ ही उपाधी लावली होती.

फोर्ट विल्यम कॉलेज मध्ये संस्कृत प्राध्यापकाची नोकरी.

संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राह्मणेतर विद्यार्थांना शिक्षण मिळत नसे. ते धोरण रद्द करून त्यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश दिला.

पराशर संहितेत विधवाविवाहास मान्यता असल्याचा दाखला त्यांनी काढून दाखविला.

१८५६ साली विधवाविवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

कुलीन ब्राह्मणवर्गातील बहुपत्नीकत्वाची चाल, बालविवाह,  मद्यपान इ. अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंगालमध्ये चळवळी केल्या.

आधुनिक बंगाली गद्याचे जनक

पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ
त्यांनी विधवाविवाह(१८५५) हा ग्रंथ लिहिला.

१८७७ साली कलकत्त्यास भरलेल्या दरबारात ईश्वरचंद्र यांना इंग्लंडच्या राणीकडून बहुमानाची सनद मिळाली व पुढे ‘सी. आय. इ.’ ही पदवीही मिळाली.

 ‘मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो’, असे ते म्हणत.

बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना ‘दयासागर’ म्हणूनच अधिक ओळखते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.