कोयना धरण

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्‍यात हेळवाकजवळ बांधण्यात आलेले कोयना धरण हे महाराष्ट्रातल्या मोठ्या धरणांपैकी एक महत्त्वाचे धरण आहे.

तब्बल 105 टीएमसी पाणीसाठा असलेल्या शिवाजीसागर जलाशयाची व्याप्ती ही साधारणपणे 400 चौकिमी इतकी मोठी आहे.

महाबळेश्‍वला उगम पावणाऱ्या या नदीच्या पाण्याचा फुगवटा महाबळेश्‍वरच्याच पायथ्याशी असलेल्या तापोळ्यापर्यंत आहे.

कोयना हे जलविद्युत निर्मितीचे मोठे केंद्र असून इथे सहा टप्प्यात सुमारे 2100 मेगावॅट्‌स वीजनिर्मिती केली जाते.

तयामुळे या धरणाच्या पाण्याचा सिंचनापेक्षा वीजनिर्मितीसाठी सर्वाधिक वापर केला जातो