रामसर साइट्स पाणथळ जमिनींचे संवर्धन
रामसर साइट्स पाणथळ जमिनींचे संवर्धन

१९७१ साली इराणमधील ’रामसर’ शहरात ‘रामसर परिषद’ पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. यासाठी पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा करण्यात आला. भारताने ’रामसर’ करारावर १९८२ साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील २,४१० पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे. आजवर भारतातील ४१ पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे.

फारुक नाईकवाडे

पाणथळ जमिनींसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर कराराकडून महाराष्ट्रातील लोणार सरोवरास रामसर स्थळाचा (साइट) दर्जा देण्यात आल्याची माहिती रामसर माहिती प्रणालीवर मागील आठवडय़ामध्ये प्रसिद्ध करण्यात आली. सन २०१९पासून भारतातील एकूण १४ पाणथळ प्रदेशांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणसंबंधी चालू घडामोडींच्या दृष्टीने हा मुद्दा बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. याबाबतच्या परीक्षोपयोगी मुद्द्यांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

रामसर साइट्स

पाणथळ जमिनींसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर करारांतर्गत पाणथळ जमिनी किंवा प्रदेशांना आंतरराष्ट्रीय दृष्टय़ा महत्त्वाचे म्हणून मान्यता मिळाल्यावर त्यांना रामसर साइट्स असे म्हटले जाते.

आंतरराष्ट्रीय सहकार्य व राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील उपक्रमांच्या माध्यमातून पाणथळ प्रदेशांचे संवर्धन व समंजस वापर करणे आणि त्यांचा शाश्वत विकास घडवून आणण्यामध्ये योगदान देणे हा या कराराचा मुख्य हेतू आहे,

इराणच्या रामसर शहरामध्ये २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ जमिनींवरील आंतरराष्ट्रीय करारास मान्यता मिळाली आणि तो १ डिसेंबर १९७५ रोजी अमलात आला. भारतामध्ये हा करार १ फेब्रुवारी १९८२ रोजी लागू झाला. तेव्हापासून आतापर्यंत भारतामधील एकूण ४१ पाणथळ प्रदेशांना रामसर साइट्स म्हणून मान्यता मिळाली आहे. या प्रदेशांमध्ये एकूण १०,७१,८६१ हेक्टर इतके क्षेत्र गोडय़ा पाण्याने व्यापले आहे.

रामसर करारामध्ये सहभागी देशांनी आपल्या क्षेत्रातील किमान एक पाणथळ प्रदेश रामसर साइट म्हणून (आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा पाणथळ प्रदेश म्हणून) घोषित करणे आवश्यक असते. आणि अशा प्रदेशाचा शाश्वत पद्धतीने विकास व व्यवस्थापन करणे अपेक्षित असते.

रामसर साइट्स म्हणून मान्यता मिळाल्यावर अशा प्रदेशांचे संवर्धन व व्यवस्थापनामध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक व तांत्रिक सहकार्य उपलब्ध होते. तसेच या प्रदेशांचा शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य व त्यातून रोजगार निर्मिती, पर्यटन विकास अशा बाबी साध्य करणे शक्य होते.

भारतातील पाणथळ प्रदेश

भारतातील पाणथळ प्रदेशांचे भौगोलिक भिन्नतेच्या आधारावर चार प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे-

1) हिमालयीन आर्द्र प्रदेश
2) गंगेच्या मैदानातील पाणथळ प्रदेश
3) वाळवंटातील आर्द्र प्रदेश आणि
4) किनारी ओलसर जमीन

भारतातील रामसर साइट्स

  • सद्य:स्थितीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक आठ रामसर साइट्स आहेत.
  • नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यतील नांदूर मधमेश्वर धरणाच्या तलावाचे क्षेत्र महाराष्ट्रातील पहिली रामसर साइट आहे तर लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी रामसर साइट आहे.
  • लोणार सरोवर ही देशातील ४१वी आणि जगातील एकूण रामसर स्थळांपैकी २४४१वी साइट आहे.

भारतातील रामसर साइट्स (कालानुक्रमे)

#नावस्थानवर्ष
चिल्का सरोवरओडिशा (Odisha)1981
केवलादेव राष्ट्रीय उद्यानराजस्थान (Rajasthan)1981
हरीकेपंजाब1990
लोकटाक सरोवरमणिपूर1990
सांबर सरोवरराजस्थान1990
वुलर सरोवरजम्मू व काश्मीर1990
कांजळीपंजाब2002
रोपडपंजाब2002
अष्टमुदीकेरळ2002
१०भितरकणिका खारभूमीओदिशा2002
११भोजमध्य प्रदेश2002
१२दीपोर बीलआसाम2002
१३पूर्व कोलकातापश्चिम बंगाल2002
१४कोलेरु सरोवरआंध्र प्रदेश2002
१५कालिमर अभयारण्यतमिळनाडू2002
१६पोंग दाम सरोवरहिमाचल प्रदेश2002
१७सष्टमकोट्टाकेरळ2002
१८त्सोमोरीरीलडाख2002
१९वेंबनाड झ्र् कोईकेरळ2002
२०चंद्र तालहिमाचल प्रदेश2005
२१होक्केराजम्मू व काश्मीर2005
२२रेणुका सरोवरहिमाचल प्रदेश2005
२३रुद्रसागर सरोवरत्रिपुरा2005
२४सुरीनसार झ्र् मानसर सरोवरेजम्मू व काश्मीर2005
२५उध्र्व गंगा (ब्रिजपूर ते नरोरा प्रवाह)उत्तर प्रदेश2005
२६नल सरोवर पक्षी अभयारण्यगुजरात2012
२७संदरबनपश्चिम बंगाल2019
२८नांदूर मधमेश्वरमहाराष्ट्र2019
२९नवाबगंज पक्षी अभयारण्यउत्तर प्रदेश2019
३०सरसाई नवार सरोवरउत्तर प्रदेश2019
३१बियास संवर्धित क्षेत्रपंजाब2019
३२केशोपूर मियानीपंजाब2019
३३नानगल वन्यजीव अभयारण्यपंजाब2019
३४सांदी पक्षी अभयारण्यउत्तर प्रदेश2019
३५समासपूर पक्षी अभयारण्यउत्तर प्रदेश2019
३६पार्वती अरंगा पक्षी अभयारण्यउत्तर प्रदेश2019
३७समन पक्षी अभयारण्यउत्तर प्रदेश2019
३८आसन बॅरेजउत्तराखंड2020
३९कंवर ताल/ कबर ताल सरोवरबिहार2020
४०सुर सरोवरउत्तर प्रदेश2020
४१लोणार सरोवर (महाराष्ट्र)महाराष्ट्र2020
४२त्सो कर लेकलद्दाख2020
४३भिंडावास वन्यजीव अभयारण्यहरियाणा2021
४४सुल्तानपुर राष्ट्रीय उद्यानहरियाणा2021
४५थोल झील वन्यजीव अभयारण्यगुजरात2021
४६वाधवाना आर्द्रभूमिगुजरात2021
४७हैदरपूर वेटलॅडउत्तरप्रदेश2021
४८खिजाड़िया पक्षी अभ्यारण्यगुजरात2022
४९बखीरा वन्यजीव अभ्यारण्यउत्तर प्रदेश2022
५०कारीकिली पक्षी अभयारण्य (61.21-hectare)तमिळनाडू26.07.2022
५१पल्लिकरणाई  पाणथळ राखीव अभयारण्य (56.27 एकरस)तमिळनाडू26.07.2022
५२पिचावरम कांदळवन (1100 hectare)तमिळनाडू26.07.2022
५३पाला पाणथळ प्रदेश (250 acres )मिझोरम26.07.2022
५४सख्य सागरमध्य प्रदेश26.07.2022
भारतातील रामसर साइट्स

2019 पूर्वी 26 रामसर क्षेत्र होते. 2019 मध्ये सुंदर वन डेल्टा (पश्चिम बंगाल) च्या समावेशाने, त्यांची संख्या 27 पर्यंत वाढली आणि या वर्षात (2020), आणखी 15 प्रदेशांच्या समावेशासह भारतातील रामसर क्षेत्रांची संख्या 42 पर्यंत वाढली आहे. या वर्षी (2021) 5 नवीन रामसर क्षेत्र त्यात सामील झाले आणि 2022 मध्ये या वर्षी 2 फेब्रुवारी रोजी आणखी 2 क्षेत्रांचा समावेश करून त्यांची संख्या आता 49 झाली आहे.

मांत्रू रेकॉर्ड (Montreux Record)

रामसर साइट्सपैकी ज्या ठिकाणी तांत्रिक विकास, प्रदूषण किंवा मानवी हस्तक्षेपामुळे परिस्थितिकीय बदल घडले आहेत, घडत आहेत किंवा घडण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची विशेष यादी म्हणजे मांत्रू रेकॉर्ड.

भारतातील केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि लोकटाक सरोवर ही दोन ठिकाणे मांत्रू रेकॉर्डमध्ये समाविष्ट आहेत. चिल्का सरोवर यामध्ये समाविष्ट होते मात्र कालांतराने काढण्यात आले.

पाणथळ प्रदेशांचे महत्त्व

  • पाणथळ जमिनींमध्ये नद्या, सरोवरे, किनारी प्रदेश, मानव निर्मित जलसाठे, मीठागरे, खारजमिनी, प्रवाळ भित्ती अशा बहुविध पाणथळ प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे.
  • या प्रदेशांना मानवी आणि एकूणच जीवसृष्टीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगातील सजीवांच्या प्रजातींपैकी ४० टक्के प्रजाती या पाणथळ जमिनींमध्ये राहतात किंवा ती त्यांची प्रजनन क्षेत्रे आहेत.
  • या प्रदेशांमध्ये मोठय़ा प्रमाणात जैवविविधता सामावली आहे.
  • प्राणी व वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातींना अधिवास पुरविणे, पुरांची तीव्रता कमी करणे, गोडय़ा पाण्याची गुणवत्ता राखणे, किनारी प्रदेशांचे संरक्षण, प्रदूषके अवशोषित करणे अशा माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते.
  • वाहतूक, पर्यटन, शेती व मत्स्यपालन अशा आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या बाबी बहुतांशपणे पाणथळ जमिनींवर अवलंबून आहेत.

FAQs

रामसर साईट कशाला म्हणतात?

जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पृथ्वीवरील अशा पाणथळ प्रदेशांचे क्षेत्र. त्या महत्त्वाच्या स्थळांना रामसर करारानुसार रामसर साइट म्हणून नोंदवले जाते, जेणेकरून त्यांचे संरक्षण करता येईल, जिथे रामसर साइट जाते.

भारतात किती रामसर साइट्स आहेत?

भारतात सध्या ५४ रामसर साइट्स आहेत.

भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे?

1981 मध्ये घोषित केलेले, चिल्का तलाव हे भारतातील पहिले रामसर साइट आहे जे ओडिशामध्ये आहे.

भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे?

पश्चिम बंगालमध्ये स्थित सुंदरबन वेटलँड हे भारतातील सर्वात मोठे रामसर साइट आहे. हे सुमारे 4230 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.

रामसर परिषद कधी झाली?

रामसर परिषद 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणच्या रामसर शहरात झाली.

जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो?

2 फेब्रुवारी

भारतातील सर्वात लहान रामसर साइट कोणती आहे?

हिमाचल प्रदेशातील रेणुका वेटलँड क्षेत्र हे भारतातील सर्वात लहान रामसर साइट आहे. हे सुमारे 0.2 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.

भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स कोणत्या राज्यात आहेत?

भारतातील सर्वात जास्त 10 रामसर साइट्स उत्तर प्रदेश राज्यात आहेत.

जगात किती रामसर साइट्स आहेत?

जगात सुमारे 2400 रामसर स्थळे घोषित करण्यात आली आहेत.

जगातील पहिले रामसर स्थळ कोणते म्हणून घोषित करण्यात आले?

जगातील पहिले रामसर स्थळ 1974 मध्ये ऑस्ट्रेलियात कोबोर द्वीपकल्पावर घोषित करण्यात आले.

जगातील सर्वात जास्त रामसर साइट्स कोणत्या देशात आहेत?

युनायटेड किंगडममध्ये रामसर साइट्सची जगातील सर्वात जास्त संख्या आहे, युनायटेड किंगडममध्ये एकूण 175 रामसर साइट आहेत.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.