योजनेची सुरुवात – 10 ऑगस्ट, 2010
योजनेत कार्यवाही – अकरावी पंचवार्षिक योजना
उद्देश – दारिद्र्यरेषेखालील व असुरक्षित शहरी व ग्रामीण भागातील व्यक्तींना विम्याचा लाभ मिळवून देणे.
जनश्री विमा योजना या योजनेच्या लाभार्थ्यास 200 रुपये वार्षिक हप्ता असे. यातील 100 लाभार्थ्यांद्वारे व 100 रुपये जीवन विमा निगम (LIC) च्या सामाजिक सुरक्षा निधीतून (SSF) पुरविले जातील.
जनश्री विमा योजना या योजनेतील लाभार्थ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30,000 रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास 75,000 रुपये वारसदारास मदत म्हणून दिले जाते. अपंगत्व आल्यास 75,000 रुपये व आंशिक अंपगत्व आल्यास 37, 500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते.
योजनेचे व्यवस्थापन जीवन विमा निगम (LIC) च्या सामाजिक सुरक्षा निधी मार्फत पाहिले जाते.
या योजनेंतर्गत 18 ते 59 वयोगटातील 45 प्रकारच्या व्यवसायिकांची निवड केली जाते.