भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील म. गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे आणि दीर्घकालीन (१९३०-३४) जनता आंदोलन.
.१२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून इतिहास प्रसिद्ध दांडी यात्रा निघाली.
त्यानुसार गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातील ७८ स्त्री -पुरु अनुयायांसह दांडी यात्रा सुरू केली.
सरकारचा अन्यायकारक मिठाचा कायदा मोडण्यासाठी ही पदयात्रा होती.
गांधीजींनी आधीच पदयात्रेची माहिती व्हाइसरॉयला दिली होती.
पण सुरुवातीला ब्रिटिशांना यात गांभीर्य वाटले नाही.
‘दांडी यात्रा’ किंवा ‘दांडी मार्च म्हणूनही है आंदोलन ओळखले जाते.
या आंदोलनापूर्वी सायमन आयोगावर बहिष्कार घालून त्याचा निषेध करण्यासाठी सर्व देशभर निदर्शने झाली होती.
१९२९ च्या अखेरीस भरलेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनात जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर झाला
गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता.
यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले.
यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३० ला पोहोचली.
त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली.
दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले.
दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले.
पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली.
दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले.
मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता.
प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते.
गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.
मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले.
गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले.
मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,००० हून अधिक भारतीय तुरुंगात गेले.
दांडी यात्रेच्या सत्याग्रहाबद्दल ग.दि. माडगुळकरांनी एक अजरामर कविता लिहिली आहे, तिची सुरुवात अशी आहे :
उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया