महाराष्ट्रातील जलसिंचनाची साधने खालीलप्रमाणे Irrigation Source in Mahahrastra
महाराष्ट्रातील जलसिंचनाची साधने खालीलप्रमाणे Irrigation Source in Mahahrastra

१) विहीर जलसिंचन

राज्यातील जलसिंचनाचे प्रमुख साधन म्हणजे विहीर जलसिंचन. राज्यातील एकूण जलसिंचित क्षेत्रापैकी विहीरीद्वारे होणारे जलसिंचन (५५% हून अधिक आहे. राज्यातील कोकण व पूर्व विदर्भात विहीर जलसिंचनाचे प्रमाण कमी आहे. राज्यात ९०% हून अधिक भाग बेसॉल्ट या कठीण खडकापासून बनलेला आहे. हा खडक अछिद्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे हा खडक भूजल साठ्याच्या दृष्टीने अनुकुल नाही. परंतु या खडकात असणारे जोंड व भेगा यातून काही प्रमाणात पाणी झिरपते व त्यामुळे या खडकात काही पाण्याचे साठे आहेत.

२) तलाव सिंचन

नैसर्गिक व कृत्रीमरित्या तयार करण्यात आलेल्या तलावातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. राज्यातील नैसर्गिक तलावांची संख्या कमी आहे, राज्यातील एकूण जलसिंचित क्षेत्रापैकी तलावाद्वारे होणारे जलसिंचन १५% च्या जवळपास आहे. राज्यात पूर्व विदर्भात तलाव सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

३) कालवा जलसिंचन

राज्यातील नद्यांवर बांधण्यात आलेल्या धरणांमुळे निर्माण झालेल्या जलाशयांपासून दोन्ही बाजूला उजवा व डावा असे कालवे काढण्यात येवून या कालव्यातून शेतीपर्यंत पाणी पोहोचविले जाते व जलसिंचन केले जाते. राज्यातील एकूण जलसिंचित क्षेत्रापैकी सुमारे (२२%) क्षेत्र हे कालव्यांनी जलसिंचित होते. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या धरणांची सख्या जास्त असल्याने या भागात कालवा जलसिंचन मोठया प्रमाणावर होते.

राज्यातील प्रमुख कालवे :
प्रवरा कालवा, निरा कालवा, पैठण डावा कालवा, गंगापूर कालवा, मुळा कालवा, मुठा कालवा.

४) उपसा जलसिंचन

नद्या, तलाव, सरोवर, जलाशय इ. स्त्रोतांमधून अधिक उंचीवरील शेताला पंपाद्वारे पाणी उपसून दिले जाते. त्यास उपसा जलसिंचन असे म्हणतात. उपसा जलसिंचन हे सिंचनाचे साधन नसून पद्धती आहे असे म्हटले जाते. परंतु नदी, तलाव, धरण व पाण्याचा स्त्रोत जेव्हा शेतीला थेट पाणी पोहोचवू शकत नाही तेव्हा उपसा जलसिंचन प्रकल्प राबवावा लागतो. राज्यातील एकूृण जलसिचन क्षेत्रापैकी८% क्षेत्र हे उपसा जलसिंचनाने ओलिताखाली आणले आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.