महाराष्ट्र कृषी आणि फलोत्पादन
महाराष्ट्र कृषी आणि फलोत्पादन

अर्थव्यवस्थेत कृषिक्षेत्र नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक जालना ग्रामीण भागात उत्पादनात वाढ व शाश्‍वत अन्नसुरक्षा या तिन्ही महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो भारतातील 1965 पासून हरित क्रांतीनंतर कृषी क्षेत्रात कोणताही महत्त्वाचा तांत्रिक शोध लागलेला नाही सकस अन्नाची गरज भागविण्यासाठी आवश्यक असलेली कडधान्य तेलबिया फळे व  भाज्यांकडे विशेष लक्ष देऊन कृषी उत्पादनात व उत्पादकतेत वाढ होणे लक्षावधी नागरिकांच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे

कृषी उत्पादनाच्या वाढीस योग्य वेळी पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे सिंचनाखालील क्षेत्र क्षेत्रात वाढ करण्यात आली शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे

कृषी उत्पादन व उत्पादकतेत सुधारणा घडवून शेतकऱ्यांना दिलासा देणारे कृषी पतपुरवठा एक साधन आहे भारत सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना या महत्वकांक्षी योजनेंतर्गत येत्या दोन-तीन वर्षात 50% शेतकऱ्यांना सामावून घेण्याचे लक्ष ठेवले आहे

भूमी उपयोजन म्हणजे काय

जमिनीचा वेगवेगळ्या कारणांसाठी मानवाने केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन होय भूमी उपयोजन विशिष्ट वेळेला विशिष्ट ठिकाणी विकसित किंवा अविकसित अशा दोन्हीही जमिनीत केला जातो तसेच जर एखादी जमीन पूर्वी एखाद्या विशिष्ट कार्यासाठी वापरली जात असेल तर ती जमीन पूर्वीच्या कार्याऐवजी दुसऱ्या कार्यासाठी वापरली जाते

उपलब्ध जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचे जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला जातो अशाप्रकारे अनेक कारणांसाठी जमिनीचा वापर केला जात असतो हा जमीनीचा प्रत्यक्षात जो वापर केला जात असतो त्यालाच भूमी उपयोजन असे म्हणतात

सामान्य भूमी उत्पादन नागरी भूमी उपयोजन कृषी भूमी उपयोजन इत्यादी स्वरूपात भूमी उपाययोजनांचा विचार आपण करू शकतो वने कृषी वस्ती औद्योगिक क्षेत्र इत्यादी काही उद्देश एखाद्या प्रदेशात भुमीचा उपयोग

कोणकोणत्या उद्देशांसाठी केला आहे व त्यातील प्रत्येकासाठी किती जमीन वापरली आहे यावरून त्या प्रदेशातील भूमी उपाययोजनांचा आकृतिबद्ध ठरतो

महाराष्ट्रातील शेतीची वैशिष्ट्ये

1 महाराष्ट्रातील एकुण शेतीपैकी 56% पेक्षा जास्त क्षेत्र निवड लागवडीखाली आहे त्यानुसार महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो

2 राज्यातील दुबार पीक क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात 18 वा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा 8% भागच दुबार पिकाखाली आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी 83% क्षेत्र कोरडवाहू शेतीखाली आहे

3 राज्यात अन्नधान्याचे उत्पादन गरजेच्या 80% होतात व उर्वरित 20% उत्पादन आयात करून गरज भागवली जाते

4 ऊस उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहदेशातील 10% पेक्षा जास्त ऊस उत्पादन महाराष्ट्रात होते

5 भारतातील उससे क्षेत्राच्या 33% क्षेत्र महाराष्ट्रात आहे व त्यातून देशाच्या 37% साखर उत्पादन होते

6 देशातील अन्नधान्य क्षेत्राच्या 11% क्षेत्र महाराष्ट्रात असून येथे देशातील 7% पेक्षा कमी उत्पादन होते

7 महाराष्ट्रातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी केवळ 17. 80% क्षेत्र ओलिताखाली आहे तर हेच प्रमाण राष्ट्रीय पातळीवर 45% आहे

8 उसाच्या अपवाद वगळता इतर अन्नधान्याच्या बाबतीत राज्यातील शेतीची उत्पादकता राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे

9 निवड पेरणी खालील क्षेत्राच्या सुमारे  क्षेत्रात खरीप व 30% क्षेत्रात रब्‍बी पीक घेतले जाते या तांदूळ ज्वारी बाजरी  तूर मूग सूर्यफूल कापूस ऊस ही खरीप हंगामातील पिके आहेत तर गहू हरभरा शाळा करडई सूर्यफूल ही रब्बी पिके आहेत

10 महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 2011 नुसार 55% लोकसंख्या राहते त्यापैकी 85% लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे

11 कापसाखालील व अन्नधान्याखालील क्षेत्राच्या तुलनेत उत्पादन जास्त होत नाही ऊस वगळता सर्वच कृषी उत्पादनाची हेक्टरी उत्पादकता महाराष्ट्रातील राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे महाराष्ट्रातील कृषी मुख्यतः मोसमी पावसावर अवलंबून आहे

12 तापी वैनगंगा गोदावरी भीमा कृष्णा या नद्यांच्या खोर्‍याच्या प्रदेश हा शेतीचा मुख्य विभाग आहे सातपुड्याच्या रांगां   पश्‍चिम घाटाचेे क्षेत् एकूण शेतीच्या सुमारे 18 टक्के आहे व तेथील शेतीवर डोंगराळ भागामुळे मर्यादा पडल्या आहेत र

13 शेतीसाठी जमिनीची उपलब्धता उंच-सखलपणा आणि उतारावर यांच्यावर ठरते तर तिची शेतीसाठीची उपयुक्तता प्रदेशातील पर्जन्यमान व वृद्धांच्या स्थितीवर ठरते त्यावरून राज्यांमधील bhoomi संसाधनांचा वापरावरील विशेषतः शेतीकरीता वापरण्यातील मर्यादा लक्षात येतील ोकण व पश्‍चिम घाट या भागात उंचसखलपणा जास्त आहे त्यामुळे तेथील भूमीचा वापरावर मर्यादा पडतात

1 लागवडीखालील क्षेत्र

लागवडीयोग्य म्हणजे ज्या भूमीवर शेती करता येते किंवा भूमी कृषी योग्य आहे अशा सर्व भूमीस लागवडी योग्य भूमी असे म्हणतात यात निवड पिकाखालील क्षेत्र पडीक क्षेत्र व शेतीखालील नसलेली जमीन पडीत जमीन वगळून इत्यादींचा समावेश होतो

महाराष्ट्राला लाभलेल्या bhoomi पैकी 56th 6% क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो यालाच लागवडीखालील क्षेत्र म्हणतात प्राकृतिक रचना हवामान मृदा जलसिंचन सुविधा उताराचे स्वरूप यांचा परिणाम लागवडी खालील क्षेत्रावर होतो पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील 70% क्षेत्र लागवडीखाली आहे कोकण तसेच पूर्व विदर्भामध्ये जमिनीचे क्षेत्र तीव्र उतार व वनांची आच्छादनामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे आहे वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे जमिनीचा वापर घरांसाठी वस्त्यांसाठी होत असल्याने शहरी भागात जवळील लागवडीखालील क्षेत्रामध्ये वेगाने घट होत आहे

शेतीखाली नसलेली जमीन पडीत जमीन वरुण वगळून राज्यात जवळपास 24 लाख हेक्टर म्हणजे राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 7.9 present इतकी आहे यात कायम कुरण आणि चराऊ जमीन वृक्षांच्या बागा व मळे कृषी योग्य ओसाड जमीन इत्यादींचा समावेश होतो या जमिनीचा वापर जरी पीक उत्पादनासाठी केला जात नसला तरी आपणास या जमिनीवर पिक उत्पादन घेता येते तसेच लागवडीयोग्य जमिनीत पडीक जमिनीचाही समावेश होतो

2 वनक्षेत्र

महाराष्ट्रामध्ये पडणारा सरासरी पर्जन्यमान सुमारे हजार मिलिमीटर आहे पर्जन्याच्या वितरणामध्ये वनांचे क्षेत्र अवलंबून असते रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात एक हजार मिलिमीटर पेक्षा अधिक  पर्जन्य मिळतो सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात वने आढळतात मध्य महाराष्ट्र हे अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने वनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे तेथे सपाट भूमीचा वापर शेतीसाठी केला जातो

महाराष्ट्र शेती

अ शेतीचे पर्जन्य नुसार प्रकार

महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 2011 च्या जनगणनेनुसार 55% लोकसंख्या ग्रामीण भागात राहत यातील बहुतांशी लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कृषी वरच अवलंबून आहे म्हणजेच महाराष्ट्रात राज्यात कृषी हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो असे जरी असले तरी संपूर्ण राज्यात सारख्या प्रकारची शेती केली जात नाही कारण यावर अनेक घटकांचा प्रभाव पडलेला असतो

1 कोरडवाहू शेती (Dry Farming) :

मोसमी वार्‍याच्या पावसावर आधारित शेतीला कोरडवाहू शेती म्हणतात. ज्या भागात पावसाचे पाणी कमी असते व पाणीपुरवठ्याच्या इतर कृत्रिम सुविधा  उपलब्ध नसतात अशा प्रदेशात भरड धान्याचे उत्पादन घेतले जाते, अशा शेतीस कोरडवाहू शेती असे म्हणतात. महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात 50 सेंटिमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो व या ठिकाणी जलसिंचनाच्या सुविधाही फारशा उपलब्ध नाहीत.

राज्याचे जवळजवळ 82. 20% कृषीखालील क्षेत्र मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. अशा ठिकाणी कोरडवाहू शेती केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर जिल्ह्याचा संपूर्ण प्रदेश तर सांगली, सातारा, पुणे, नाशिक, धुळे या जिल्ह्याचा पूर्व भाग व बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्याच्या पश्चिम भाग इत्यादी प्रदेशात कोरडवाहू शेती केली जाते.

कोरडवाहू शेतीत प्रामुख्यान ज्वारी, बाजरी, मका,  रब्बी ज्वारी, हरभरा, करडई इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. कोरडवाहू शेतीतील  उत्पन्नाचा फारसा भरवसा नसतो. कारण हे उत्पादन पावसावर अवलंबून असते. पाऊस चांगला पडला तर भरपूर उत्पादन होते  व पाऊस कमी पडला तर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते.

2) ओली / सिंचित शेती (Well Farming) :

जी शेती पाण्यावर अवलंबून असते व निश्चित स्वरुपाचे कृत्रिम किंवा नैसर्गिक पाणी पुरवठा करून पिकांचे उत्पादन घेतले जाते अशा शेतीला ओली शेती असे म्हणतात.

उदाहरण:  बागायती शेती  महाराष्ट्रात ज्या भागात भागात भरपूर पर्जन्य पडते ( 200 सेंटिमीटरपेक्षा जास्त) अशा भागात ओली शेती किंवा सिंचित शेती करतात.

उदा. कोकणात व पूर्व महाराष्ट्रात ओली शेती केली जाते.

शिवाय जेथे कृत्रिमरित्या धरणे, कालवे, विहिरी, तलाव  याद्वारे शेतीला पाणीपुरवठा करून वर्षातून दोन किंवा तीन पिके घेतली जातात. ओल्या शेतीतील पिकात  भात, ऊस, कापूस, चहा, कॉफी, फळे, केळी इत्यादींचे उत्पादन घेतले जाते.

ब) शेतीचे स्वरूपानुसार प्रकार

1) उदरनिर्वाहाची शेती:

या प्रकारांमध्ये  भरणपोषण करण्याच्या उद्देशाने शेती केली जाते. अशा प्रकारच्या शेतीमध्ये परंपरागत साधनांचा फार मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्यामुळे शेतीमधील उत्पादन कमी असते.

2) यांत्रिक / विस्तारित शेती:

कॅनडा, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया या भागातील गवताळ प्रदेशामध्ये  मजुरांचा पुरवठा कमी असल्यामुळे शेतीची सर्व कामे या यंत्राच्या साहाय्याने पार पाडले जातात. या शेतीमध्ये दर हेक्टरी उत्पादन कमी असले तरी भांडवल, गुंतवणूक, मनुष्यबळ यांच्या मानाने एकूण उत्पादनात सर्वात जास्त असते. या प्रकारातील शेतीमध्ये जमिनीचे आकारमान जास्त असते तर मजुरांचा पुरवठा कमी असतो. या प्रकारांमध्ये कमीत कमी मानवी श्रमाच्या साह्याने जास्तीत जास्त शेती उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो.

3) सहकारी शेती:

सहकारी शेती म्हणजे तुकड्या-तुकड्यात विभाजित झालेली शेती एकत्रित करून शेतीचा आकार वाढविणे व त्याचबरोबर शेतकऱ्यांकडील भांडवल, श्रम, साधन सामुग्री इथे एकत्र करून आधुनिक पद्धतीने शेती करणे होय.

सहकारी शेतीची वैशिष्ट्ये

सहकारी शेती अंतर्गत लहान तुकडे मधील शेती एकत्रित करण्यात येते. एकत्रित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मिळून एका समितीची स्थापना करण्यात येते.

सहकारी शेतीचे संचालन सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत करण्यात येते.

सहकारी शेती अंतर्गत झालेला नफा सभासदांमध्ये ठरलेल्या प्रमाणात वाटून घेऊ देण्यात येतो.

शेतकऱ्यांमध्ये सहकाराची भावना रुजवणे, स्वतःच्या विकासाबरोबर त्यांना देशाच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी झाल्यास होण्यास प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे.

4) सामूहिक शेती:

या उपक्रमामध्ये शेतकरी आपली जमीन, अवजारे व जनावरे यांच्यावरील मालकी हक्क सोडून संयुक्तपणे शेती करतात. शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या व्यवस्थापन समितीकडे आपली उत्पादन साधने एकत्र करून या उपक्रमातील शेतकरी संयुक्तपणे श्रम करतात. शेतीची व्यवस्था पाहणे, कामाचे वाटप करणे, उत्पन्नाची वाटणी करणे, शेतमालाची वाटणी करणे, शेतमालाची विपणन व्यवस्था पार पाडणे इत्यादी कामे पार पाडली जातात

सामूहिक शेतीचे वैशिष्टे :

सामूहिक शेती उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची जमिनीवरील मालकी नष्ट होऊन संस्थेची मालकी प्रस्थापित होते या उपक्रमात जमीनधारकाला उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेत सामील होता येते. श्रम करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसाच्या आधारावर शेतकऱ्यांस मोबदला देण्यात येतो आणि संस्थेला होणाऱ्या वार्षिक फायदा सभासदांस सम प्रमाणात बोनस म्हणून वाटण्यात येतो.

5) सरकारी शेती :

या प्रकारांमधील सरकारी शेती ही पूर्णपणे शासनाच्या मालकीची असते. ह्या प्रकारांतर्गत येणाऱ्या शेती व्यवस्थेत, भांडवल, साधने व उत्पादनावर पूर्णपणे शासनाची मालकी असते. शेतीवर काम करणाऱ्या लोकांना वेतनाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. या उपक्रमात काम करणाऱ्या व्यक्तींना घरे, आवश्यक वस्तू व इतर सोयी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतात.

6) सखोल शेती :

भांडवल व मनुष्यबळ यांचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न या शेतीत केला जातो. या प्रकारात येणाऱ्या शेतीचे आकारमान कमी असते. कमी आकारमानाच्या शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरिता मर्यादित यांत्रिकी साधनांचा वापर, पिकांचा फेरबदल, उत्कृष्ट बियाणांचा वापर, रासायनिक खते व पीक संरक्षण उपाय व जलसिंचन इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात येतो. ज्या देशांमध्ये शेतजमिनीची उपलब्धता कमी असेल, अशा देशांमध्ये या प्रकारातील शेती केली जाते. युरोपियन राष्ट्रे, जपान, भारत इत्यादी राष्ट्रांमध्ये या प्रकारातील शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

7) मळ्याची शेती :

मळ्याच्या शेतीमध्ये कॉफी, रबर, चहा व फळबागा इत्यादी व्यापारी पिके घेतली जातात. या प्रकारामध्ये डोंगर उतारावर व्यापारी पिके घेतली जातात. या प्रकारातील शेतीमध्ये भांडवलाची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली जाते. बागायती शेती अंतर्गत अन्नधान्ये, ऊस, भाजीपाला इत्यादी अनेक पिके घेतली जातात.

पिक प्रारूप म्हणजे काय? पिक प्रारूपावर परिणाम करणारे घटक :

विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या पिकाखाली असलेले प्रमाण म्हणजे पिक प्रारूप होय. पिकाच्या प्रारूपावर शेतकऱ्यांच्या आवडीनिवडीचा परिणाम होत असला तरी पर्जन्यमान, जमीन, शेतीचा आकार, जमिनीचा मालकी हक्क व जमीन पद्धती, बाजारपेठेतील मालाच्या किमती इत्यादी घटकांचा अधिक परिणाम होत असतो.

1) बाजार पेठेतील मालाच्या किमती

2) अपुरे पर्जन्यमान

3) वैयक्तिक घटक

4) शेतीचा आकार

5) सुपीक व नापीक जमीन

6) जमीन मालकी हक्क

पिक प्रारूपाच्या अभ्यासाची गरज :

1)वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविणे

2) कृषी भूमीचा पर्याप्त वापर करणे

3) नियोजन आखणी

4) शेती उत्पादकता वाढविणे

5) योग्य पीक प्रारूप अंमलात आणणे

खत :

वर्षानुवर्षे त्याच त्याच जमिनीत घेत असलेल्या पिकामुळे आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या नवीन वाणामुळे जमिनीतील सर्वच अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी व पिकांच्या वाढीसाठी, अधिक उत्पादनासाठी खतांचा वापर करणे आवश्‍यक असते.

अ) अन्नधान्य पिके :

1)गहू :

हे रब्बी हंगामातील पीक आहे. गव्हाला गाळाची काळी कसदार मृदा आवश्यक आहे.

महाराष्ट्र पठारावर प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात काळया रेगूर मृदेत गव्हाचे उत्पादन घेतले जाते.

गव्हाला वाढीच्या काळात 10° ते 50° सेल्सिअस तापमान मानवते.

दाणे भरण्याच्या वेळेस 20 ते 25 सेंटिमीटर व कापणीच्या वेळी 25° ते 30° से. तापमान असावे लागते.

गहू समशीतोष्ण कटिबंधीय पीक आहे, म्हणून महाराष्ट्रात गहू रब्बी पीक म्हणून घेतले जाते. गव्हाला 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस व तापमान कमी लागते म्हणून हे पीक महाराष्ट्रात हिवाळ्यात घेतात.

महाराष्ट्रात कोकण सोडल्यास राज्यात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी गव्हाखालील 4.5% क्षेत्र आहे.

जिल्ह्याचा विचार केला तर महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात गव्हाखालील क्षेत्र सर्वात जास्त असून ते 89000 हेक्‍टर इतके आहे. यानंतर नाशिक, पुणे, नागपूर व सोलापूर जिल्ह्यांचा क्रमांक आहे.

महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे गहू संशोधन केंद्र असून गव्हाच्या नवीन संकरित जाती निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून येथे संशोधन केले जाते.

महाराष्ट्रात औरंगाबाद विभागात सर्वाधिक 26% क्षेत्र गव्हाखाली आहे. त्याखालोखाल 25% नाशिक विभागात आहे. गव्हाचे सर्वात कमी क्षेत्र अमरावती विभागात आढळून येते.

उत्पादनानुसार विचार करता नाशिक विभागात 30% सर्वाधिक उत्पादन होते.

त्याखालोखाल पुणे (24%) औरंगाबाद ( 22%) विभागात उत्पादन होते. हेक्टरी उत्पादनात राज्यात पुणे विभागाच्या (1500 किलोग्रॅम) प्रथम क्रमांक लागतो.

भारतातील गव्हाच्या एकूण क्षेत्रापैकी महाराष्ट्रात 4% क्षेत्र असून उत्पादन महाराष्ट्रात 2% होते.

2) तांदूळ ( भात) :

महाराष्ट्रात मावळ, पूर्वविदर्भ, कोकण या भागांत तांदळाचे उत्पादन घेतले जाते. राज्यात सर्वाधिक तांदूळ क्षेत्र नागपूर विभागात ( 40%) आहे. त्याखालोखाल कोकण (32%), पुणे (15%) या विभागाचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात तांदळाचे सर्वाधिक क्षेत्र गोंदिया (20%) जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल रायगड (10%), पालघर (8%) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

उत्तर कोकणात मृदा चिकणमातीयुक्त व पाणी धरून ठेवणारी असल्यामुळे हेक्टरी उत्पादन जास्त होते, तर दक्षिण कोकणात (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) लॅटेराईट व गाळाच्या मृदेमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते.

महाराष्ट्रात 2001 – 2002 च्या आकडेवारीनुसार तांदळा खालील क्षेत्र 15 लाख हेक्‍टर होते.

 तांदळाला उष्ण व दमट हवामान व जास्त पर्जन्याची आवश्यकता असते. तापमान सरासरी 27° ते 30° सें.ग्रे. च्या दरम्यान असावे लागते, म्हणून तांदूळ हे उष्णकटिबंधीय पीक म्हणून संबोधले जाते.

महाराष्ट्रातील लोक आहारात तांदळाचा बऱ्याच प्रमाणात वापर करतात. कोकणातील लोकांचे तर तांदूळ आणि मासे हे प्रमुख अन्न आहे. महाराष्ट्रात 100 सेंटिमीटरपेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. अन्यथा जलसिंचनाच्या सुविधा जेथे उपलब्ध आहेत अशा प्रदेशांत तांदळाचे उत्पादन घेतले जाते.

एकूण पिकाखालील क्षेत्राच्या तुलनेत तांदळाखालील क्षेत्र फक्त 8.5% इतकेच आहे. भारतातील एकूण तांदळाच्या क्षेत्रापैकी महाराष्ट्रात केवळ 3.7% इतकेच क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील कोकण, विदर्भातील वैनगंगेचे खोरे, मावळ (नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा पश्चिम भाग) हे तांदूळ उत्पादक प्रमुख प्रदेश आहेत.

एकूण पिकाखालील क्षेत्राच्या तुलनेत तांदळाखालील क्षेत्र फक्त 8.5% इतकेच आहे. भारतातील एकूण क्षेत्रापैकी महाराष्ट्रात केवळ 3.7% इतकेच क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील कोकण, विदर्भातील वैनगंगेचे खोरे, मावळ (नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भाग) हे तांदूळ उत्पादक प्रमुख प्रदेश आहेत.

महाराष्ट्रातील सर्वाधिक 52% तांदूळ उत्पादन कोकण विभागात होते व त्यातही रायगड जिल्ह्यात (17%) सर्वाधिक उत्पादन होते. त्यानंतर पालघर, गोंदिया या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात भारतातील तांदूळ क्षेत्रापैकी 3.7% क्षेत्र आहे,

तर देशाच्या 4% उत्पादन राज्यात होते.

3) ज्वारी :

ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात एकूण लागवडी पैकी 35% क्षेत्रात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. हे देशाच्या एकूण उत्पादनापैकी  46% आहे.

ज्वारी हे महाराष्ट्राचे प्रमुख पीक कोरडवाहू पीक म्हणून ओळखले जाते. हे पीक 25° ते 26° सेंटीग्रेड तापमान व 50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीत घेतली जाते.

महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र पठारी प्रदेशात आहेत. कोकण व पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे पीक घेतल्या जात नाहीत.

ज्वारीसाठी मध्यम खोलीची काळी मृदा आवश्यक आहे क***** भुसभुशीत मृदेत ज्वारीचे उत्पादन चांगले होते

महाराष्ट्रात खरीप ज्वारीची पेरणी जून मध्ये रब्बी ज्वारीची पेरणी ऑक्टोबरमध्ये करतात महाराष्ट्रात कोकण विभाग सोडला तर अन्य भागात ज्वारीचे उत्पादन कमी प्रमाणात जास्त प्रमाणात घेतले जाते

महाराष्ट्र सोलापूर जिल्हा ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीत प्रथम आहे यानंतर नगर व पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो मराठवाडा व विदर्भातही ज्वारीचे उत्पादन घेतले जाते

राज्यात एकूण लागवड क्षेत्रापैकी खरीप ज्वारी पिकाखालील 42% क्षेत्र आहे त्यापैकी औरंगाबाद विभागात 35% अमरावती विभागात 31% क्षेत्र आहे

खरीप ज्वारीच्या क्षेत्राच्या बाबतीत अकोला जिल्हा 10% प्रथम क्रमांकाचा आहे त्याखालोखाल नांदेड 9% जिल्ह्याचा क्रमांक लागतो

महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन अमरावती विभागात 36% होते त्याखालोखाल औरंगाबाद 31% व नाशिक 14% उत्पादन होते जिल्ह्यानुसार विचार करता सर्वाधिक उत्पादन अकोला जिल्ह्यात 11% होते त्याखालोखाल जळगाव बुलढाणा नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो

महाराष्ट्रात खरीप ज्वारी पेक्षा रब्बी ज्वारी क्षेत्र जास्त आहे राज्यातील एकूण ज्वारी पैकी रब्बी ज्वारी खाली 58% क्षेत्र आह यापैकी सर्वाधिक क्षेत्र पुणे विभागात  43 टक्के आहे त्याखालोखाल औरंगाबाद 30% विभागात आहे

सोलापूर जिल्हा रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात 20% प्रथम क्रमांक लागतो त्याखालोखाल अहमदनगर 16% पुणे 14% या जिल्ह्याचा क्रमांक लागतो

महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन पुणे विभागात 40 टक्के होते त्याखालोखाल औरंगाबाद 35% व नाशिक 20% उत्पादनात विभागात उत्पादन होते जिल्ह्यानुसार विचार करता सर्वाधिक उत्पादन सोलापूर जिल्ह्यात 18 टक्के होते त्याखालोखाल अहमदनगर पुणे बीड जिल्ह्याचा क्रमांक लागतो

एकूण ज्वारी खालील खरीप व रब्बी क्षेत्राचा विचार करता सर्वाधिक क्षेत्र औरंगाबाद 32% व त्याखालोखाल पुणे विभागात 28% क्षेत्र आहे

महाराष्ट्राचा ज्वारीच्या क्षेत्रात व उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो भारतातील ज्वारीखालील क्षेत्राच्या  46% टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यात असून एकूण ज्वारी उत्पादनाच्या 42 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते

4) बाजरी :

महाराष्ट्रात बाजरी हे पीक प्रामुख्याने हलक्या व दुष्काळी भागातील बोर्डाच्या जमिनीत घेतले जाते महाराष्ट्रात बाजरीच्या क्षेत्राच्या व उत्पादनाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो तर हेक्टरी उत्पादनाच्या बाबतीत जालना जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक लागतो येथे दर हेक्टरी 1273 किलोग्रॅम बाजरीचे उत्पादन होते

महाराष्ट्रात नाशिक शिवाय नगर बीड पुणे औरंगाबाद जिल्ह्यात बाजरीचे उत्पादन घेतले जाते महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात बाजरी खालील क्षेत्र सर्वात कमी आहे

5 सोयाबीन

6 तेलबिया

महाराष्ट्रात खास करून पठारी भागात तेलबिया वर्गातील अनेक पिके घेतली जातात त्यात मुख्यत्वे सोयाबीन सूर्यफूल करडई भुईमूग तीळ इत्यादी पिकांचा समावेश होतो महाराष्ट्रातील तेलबिया खालील क्षेत्रात नागपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो तर उत्पादनात कोल्हापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो लातूर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातही तेलबियांचे उत्पादन घेतले जाते भारतातील एकूण तेलबियांच्या उत्पादनापैकी 50 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात राज्यात होते

7 तुर दाळ

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात घेतले जाणारे खरीप हंगामातील हे एक प्रमुख डाळवर्गीय पीक आहे सर्वसाधारणपणे कापूस आणि खरीप ज्वारी या पिकामध्ये आंतरिक पिक म्हणून महाराष्ट्रात तुरीचे उत्पादन घेतले जाते तर काही भागांमध्ये पूर्ण तुरीचे पीक घेतले जाते

ब नगदी पिके

1) कापूस

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळवून देणारे कापूस हे देखील एक नगदी पीक म्हणून उसाच्या बरोबरीने घेतले जाते महाराष्ट्रातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी 14.5% क्षेत्र कापसा खाली आहे ते देशाच्या क्षेत्राच्या 33 टक्के इतके आहे देशात भारतातील एकूण कापूस उत्पादनाचा 16 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो

प्रथम गुजरात
दुसरा पंजाब

कापसाला 50 सेंटिमीटर इतका पाऊस लागतो हवामान कोरडे असावी लागते काळी कसदार सुपीक जमीन कापसासाठी अनुकूल समजले जाते कापसाला उष्णकटिबंधीय पीक म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्राचे वैशिष्ट्ये म्हणजे भारतातील एकूण कापसाखालील क्षेत्रापैकी सुमारे 42% क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे: परंतु उत्पादन मात्र फक्त 2% इतकेच होते.

महाराष्ट्रात कापूस उत्पादनात पठारी प्रदेशाचे स्थान महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या एकूण कापूस क्षेत्राच्या 62% क्षेत्र एकट्या विदर्भात आहे. मराठवाडा विभागात महाराष्ट्राच्या एकूण कापूस क्षेत्रापैकी 27% क्षेत्र आहे आणि खानदेशात महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी 9% क्षेत्र आहे.

महाराष्ट्रात अमरावती विभागात सर्वाधिक (55%) क्षेत्र आहे. यात यवतमाळ जिल्ह्य़ाचा प्रथम क्रमांक (16%) लागतो.

औरंगाबाद विभागात (25%) क्षेत्र आहे. त्यात परभणी जिल्हा प्रथम (10%) क्षेत्र असून त्या खालोखाल नांदेडचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात अमरावती विभागात सर्वाधिक (46%) उत्पादन होते. यात यवतमाळ जिल्ह्य़ाचा उत्पादनात राज्यात प्रथम (16%) क्रमांक लागतो, तर औरंगाबाद विभागाचा (34%) उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो.

2) ऊस :

सहकारी साखर कारखाने व जलसिंचनाची उपलब्धता, अनुकुल, हवामान यामुळे महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. ऊस महाराष्ट्राचे सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी उसाखालील क्षेत्र 2014 – 15 च्या आकडेवारीनुसार 9, 87, 000 हेक्टर इतके आहे. देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी 33% कारखाने महाराष्ट्रात असून देशातील 37% साखर महाराष्ट्रात उत्पादित होते.

ऊस या नगदी पिकाच्या वाढीसाठी 12 ते 18 महिन्याचा काळ लागतो. ऊसासाठी सामान्यपणे 20° ते 30° से. तापमान व 100 ते 150 सेमी पावसाची गरज असते. ऊस तोडीच्या वेळेस स्वच्छ सुर्यप्रकाश व कडक ऊन असल्यास उसातील साखरेचे प्रमाण वाढते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.