उद्देश – महाराष्ट्र सुजल आणि निर्मल अभियानांतर्गत अनुसूचित जाती व घटकातील कुटुंबांना नळ जोडणी उपलब्ध करून देणे.
महाराष्ट्र गोल्डन ज्युबली नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजने अंतर्गत 90% अनुदान राज्य सरकार व 10% हिस्सा लाभार्थी किंवा नागरी स्थानिक संस्था यांचा असतो.
नळजोडणी व शौचालय बांधकामासाठी अनुक्रमे 4000 व 12,000 इतके अनुदान मिळण्यास लाभार्थी कुटुंब पात्र आहे.
या योजनेंतर्गत 98 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 135, 91 कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये 70,000 लाभार्थींचा समावेश आहे.