मागेल त्याला शेततळे योजना
मागेल त्याला शेततळे योजना

सुरुवात – 2015

राज्य शासनाने ‘ मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतामध्येच जलसंधारणासाठी नवीन शेततळी निर्माण करण्याच्या हेतूने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने अनुदान देण्यात येत आहे.

शेतामध्ये कायमस्वरूपी पाणीसाठे निर्माण करण्यावर या योजनेचा भर आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पाणी साठवून त्याचा शेतीसाठी वापर करण्यास मदत झाली आहे.

या योजनेअंतर्गत अनुदान लाभास पात्र होण्यासाठी शेतकऱ्याकडे वैयक्तिक किंवा सामूहिक किमान 0.60 हेक्टर शेती क्षेत्र असणे गरजेचे आहे.

या योजनेअंतर्गत 2016 – 17 मध्ये 1,11,111 शेततळ्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.