लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६ )

वहाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता.

दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली.

१६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश *पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली.

तिलाच जातीय निवाडा म्हणतात.

गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला.

सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले.

भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला.

विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.