दुसरी गोलमेज परिषद Second Round Table Conference
दुसरी गोलमेज परिषद Second Round Table Conference

Second Round Table Conference (7 Sept 1931 – 1 Dec 1931)

जानेवारी 1931 मध्ये चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी ब्रिटीश सरकारने कॉंग्रेस पक्षावरील बंदी उठवली आणि त्यांच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका केली.

७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या ‘राजपूताना’ ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ.बी.आर.आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले.

ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.

8 मार्च 1931 रोजी गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी झाली. या करारानुसार, महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ पुढे ढकलण्याचे आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचे मान्य केले.

पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली.

परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते.

गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.

जानेवारी १९३२ मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू झाली.

FAQs

दुसऱ्या गोलमेज परिषदेत कोण उपस्थित होते?

1931 मध्ये, महात्मा गांधी भारतातील घटनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते.

दुसरी गोलमेज परिषद का अयशस्वी ठरली?

सहभागींमधील अनेक मतभेदांमुळे दुसरी गोलमेज परिषद अयशस्वी ठरली.

दुसऱ्या गोलमेज परिषदेला दलित म्हणून कोण उपस्थित होते?

गांधींना भारतातून निमंत्रित करण्यात आले होते आणि सरोजिनी नायडू यांच्यासह मदन मोहन मालवीय, घनश्याम दास बिर्ला, मुहम्मद इक्बाल, सर मिर्झा इस्माईल (म्हैसूरचे दिवाण), एस.के. यांच्यासमवेत एकमेव अधिकृत काँग्रेस प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. दत्ता आणि सर सय्यद अली इमाम.

दुसऱ्या फेरीत कोण सहभागी झाले नाही?

जवाहरलाल नेहरू दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले नाहीत.

Also Read

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.