वाकाटक घराणे
वाकाटक घराणे

सातवाहन सत्ता इसवी सनाच्या तिसर्या शतकापासून क्षीण होण्यास सुरुवात झाली होती.

त्याचा फायदा घेऊन स्वतंत्र राजसत्ता प्रस्थापित करणार्यांमध्ये वाकाटक घराणे महत्त्वाचे होते.
राजसत्तेच्या संस्थापकाचे नाव ‘विंध्यशक्ती’ असे होते.

विंध्यशक्तिनंतर ‘प्रवरसेन‘ हा राजा गादीवर आला. त्याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार उत्तरेस माळवा आणि गुजरातपासून दक्षिणेस कोल्हापूर, कर्नूल (आंध्र प्रदेश) पर्यंत केला होता.

कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल‘ असे होते.

प्रवरसेनाने चार अश्वमेघ यज्ञ केले आणि सम्राट ही पदवी धारण केली.


प्रवरसेनानंतर वाकाटक राज्याचे विभाजन होऊन दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या.

त्यांतील एका शाखेची राजधानी’नंदीवर्धन’ ( नगरधन-रामटेक, जिल्हा नागपूर) येथे होती.

दुसर्या शाखेची राजधानी ‘वत्सगुल्म’ म्हणजे सध्याचे वाशिम (जिल्हा वाशिम) येथे होती.

गुप्त सम्राट, दुसरा चद्रगुप्त याची कन्या प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रूद्रसेन याच्याशी झाला होता.

याचा उल्लेख यापूर्वी आला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.