वृद्ध कलावंत मानधन योजना
वृद्ध कलावंत मानधन योजना

वृद्ध कलावंत मानधन योजना सन 1954 – 55 पासून राबविण्यात येत आहे

पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून सर्वसमावेशक सुधारित नियमावली दिनांक 7 फेब्रुवारी 2014 रोजी तयार करण्यात आली आहे

योजनेच्या अटी व शर्ती

वृद्ध साहित्यिक कलावंत यांनी जिल्हास्तरावर समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे या योजनेअंतर्गत मानधन घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे

प्राप्त अर्जांची जिल्हा परिषदेमार्फत खालील निकषांच्या आधारे छाननी करण्यात येईल

साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे अशी व्यक्ती

कला आणि वांग्मय शेतजमीन किमान पंधरा ते वीस वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे अश्या व्यक्ती

ज्या स्त्री पुरुष कलाकारांचे व साहित्यिकांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती

जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायू क्षय कर्करोग कृष्ठरोग या रोगाने आजारी असतील सेच ज्यांना 40% पेक्षा जास्‍त शारीरिक व्यंग असेल किंवा अपघाताने 40% पेक्षा जास्‍त अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय करू शकत नसतील असे साहित्यिक कलावंत त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात येईल

वयाने वडील असणाऱ्या व विधवा परित्यक्त्या वृद्ध साहित्यिक व कलावंत त्यांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल

ज्या साहित्यिक व कलावंतांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न 48 हजार पेक्षा जास्त नाही

छाननीअंती योजनेचा निकषानुसार पात्र ठरणारे अर्ज जिल्हास्तरीय निवड समितीच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येतील

जिल्हास्तरीय निवड समिती पात्र अर्जातून प्रतिवर्षी इष्ट यांच्या मर्यादेत 60 लाभार्थ्यांची मांडण्यासाठी निवड करू शकेल

निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना 2014 अन्वये सुधारित दराने खालील प्रमाणे मानधन दिले जाईल

लाभार्थ्यांचा निधनानंतर त्यांच्या विधवा पत्नी विदुर पती हयात मानधन मिळेल

योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा

संबंधित जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.