आजच्या या पोस्टमध्ये, सामान्य विज्ञान प्रश्न सराव चाचणी परीक्षा दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत

आपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा! MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.

 

Results

#1. हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे. अ) B6 ब) B8 क) B7 ड) B10

#2. चांदी (Silver) बद्दल खालील विधानांचा विचार करा. अ) चांदी हा सोन्यापेक्षा जड धातू आहे. ब) सर्व धातूंपेक्षा चांदी हा विजेचा उत्तम वाहक आहे. क) चांदी हा ऐतिहासिक धातू आहे. ड) पहिल्या पाच शोधलेल्या धातूंपैकी एक चांदी आहे.

#3. अ) ऊर्जा ही अदिश राशी आहे. ब) कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. क) जेम्स प्रेसकॉट ज्यूल या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ MKS पध्दतीत ऊर्जेचे एकक ज्यूल आहे. वरीलपैकी सत्य नसलेले विधान/ विधाने कोणते ?

#4. अ) अतिविशाल अंतरे किंवा ग्रहा-ग्रहांमधील अंतरे पारसेक या एककात मोजतात. ब) 3.26 प्रकाशवर्ष म्हणजे 1 पारसेक होय. क) अणुचा आकार Femtometer या एककात मोजतात.वरील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा.

#5. खाली काही अभिक्रिया दिल्या आहेत, त्यापैकी अयोग्य अभिक्रिया कोणती / कोणत्या?

#6. एफ्रोडाइटा या प्राण्याला समुद्री चूहा असेही म्हणतात.तर तो खालीलपैकी कोणत्या संघात येतो. अ) संघ निमॅटेडा ब) संघ पेरिफेरा क) संघ आर्थोपोडा ड) वरीलपैकी नाही

#7. खालील धातू विचारात घ्या. अ) प्लॅटिनम ब) सोने क) कॉपर ड) लेड चढत्या घनतेनुसार त्याची क्रमवारी लिहा.

#8. योग्य जोडया लावा. भौतिक गुणधर्म धातू 1) सर्वात जास्त तन्यता अ) टंगस्टन 2) सर्वांत जास्त अभिक्रियाशील ब) सोने 3) सर्वोत्तम उष्णतेचा वाहक क) पोटॅशिअम 4) सर्वांत जास्त उत्कलनांक ड) चांदी

#9. खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. अ) त्वरण ही सदिश राशी आहे. ब) एकक कालावधीत वेगात झालेला बदल म्हणजे ‘त्वरण’ होय. क) मीटर प्रतिसेकंद वर्ग हे त्वरणाचे एम.के.एस. पध्दतीतील एकक आहे. ड) सेंटिमीटर प्रतिसेकंद हे त्वरणाचे सी.जी.एस. पध्दतीतील एकक आहे. वरीलपैकी अयोग्य विधान / विधाने कोणते ?

#10. अ) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे घनता होय. ब) कि. ग्रॅ. प्रतिघनमीटर हे घनतेचे एकक आहे. वरीलपैकी असत्य विधान कोणते?

Previous
Finish

मित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा

कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.