दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation (SAARC)
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation (SAARC)

सार्क संघटनेची कल्पना १९५०च्या दशकात Asian Relations Conference मध्ये मूळ धरू लागली. १९७०च्या दशकात बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी एकत्रपणे व्यापार व सहकार हेतू एका संस्थेची गरज भासू लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती  करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना  उभारण्यात आली.

सार्क (SAARC)साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन
स्थापना८ डिसेंबर १९८५
मुख्यालयकाठमांडू, नेपाळ
सदस्यता८ सदस्य ९ निरिक्षक
अधिकृत भाषाइंग्लिश
सरचिटणीसअर्जुन बहादुर थापा(डिसेंबर २०१५ )
सार्क (SAARC)

सदस्य देश : ८

 • भारत
 • पाकिस्तान
 • चीन
 • नपाळ
 • बांगलादेश
 • शरीलंका
 • मालदीव
 • भतान

सार्क राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांची आकडेवारी

 • लोकसंख्या : २१.३%
 • सकल गृह उत्पन्न : १.३%
 • निर्यात : ०.९%
 • आयात : १.०%
 • अन्नधान्याचे उत्पादन : ९.७%
 • आतरविभागीय व्यापार : ३.४%

सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.

सार्कची पहिली बैठक ढाका येथे झाली, १९८५ च्या सुरुवातीस ७ सदस्य राष्ट्रे होती. भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका ,भूतान ही ७ राष्ट्रे होती. नंतर अफगाणिस्तान चा समावेश १३ नोव्हेंबर २००५ रोजी झाला . त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8 आहेत.

अफगाणिस्तान हा मध्य आशियातील देश असल्यामुळे त्याला प्रवेश देताना सार्कच्या सदस्यदेशांमध्ये खूपच वाद झाले होते. दक्षिण आशियाई देश कुणाला म्हणायचे, यावरून हा वाद निर्माण झाला होता.

सार्कमधील सर्वच देशांना विकासासाठी खूप वाव असल्याने अनेक देश निरीक्षक म्हणून या संघटनेत सहभागी झाले आहेत. धोरण आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्याबाबत सार्कचा प्रभाव हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.