आम आदमी विमा योजना
आम आदमी विमा योजना

सुरुवात – 2 ऑक्टोबर, 2007

लाभार्थी – ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमीहीन शेतमजूरांना तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकरपेक्षा कमी जिरायती शेती जमीन धारण करणार्‍या या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो.

वार्षिक विम्याचा हप्ता रुपये 200 इतका असून केंद्र शासनामार्फत रूपये 100 इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना रुपये 100 प्रति महा प्रतिविद्यार्थी देण्यात येते.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास खालील सुविधा पुरविण्यात येतात.

नैसर्गिक मृत्यू – 30,000 रुपये

अपघाती मृत्यू – 75, 000 रुपये

अपघातामुळे येणारे पूर्ण अपंगत्व – 75, 000 रुपये

अपघातामुळे येणारे आंशिक अपंगत्व – 37,500  रुपये

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.