किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 – 99 मध्ये व्यापारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक व सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली.

ही योजना शेतकऱ्यांना वेळेवर अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  लागू करण्यात आली.

या योजनेमार्फत इतर क्रेडिट कार्ड प्रमाणे आर्थिक व्यवहारांची देवाण-घेवाण केली जाते.

ही योजना एक प्रकारे शेतकऱ्यांना विमा संरक्षण प्रदान करते.

ही योजना 27 व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व   334 सहकारी बँकेमार्फत कार्यरत आहे.

या योजनेअंतर्गत अल्पमुदतीची कर्जे 12 महिन्यांसाठी उपलब्ध केली जातात.

किसान क्रेडिट कार्ड मार्फत RBI निर्देशित बँकेतून चेक द्वारे किंवा एटीएमद्वारे रक्कम काढता येते.

या योजनेचा कालावधी तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे.

योजनेचा लाभ साधारण विमा निगम आणि राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत दिला जातो.

मार्च 2013 अखेर पर्यंत 12.98 कोटी किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आली होती.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.